आता घराची देव धुणे होईल अतिशय सोपे.. पारंपरिक पद्धतीने देवांना करा स्वच्छ, देवांच्या मूर्ती होतील नव्या !
आपल्या सर्वांच्या घरी देव्हारा असतो. या देव्हाऱ्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मुर्त्या पाहायला मिळतात. या मूर्ती अनेकदा पितळेच्या आणि वेगवेगळ्या धातूंच्या असतात. काहींच्या घरात चांदीच्या असतात तर काहींच्या घरातील या मुर्त्या पितळेच्या, तांब्याच्या असतात. अनेकदा जास्त दिवस मुर्तींची साफसफाई न केल्यामुळे किंवा मूर्तींना स्वच्छ न केल्यामुळे मूर्तींवर काळा थर जमा होतो. हा काळा थर मूर्तींवर पडल्यावर त्यांना साफ करणे अनेकदा जिकीरीचे ठरून जाते आणि यासाठी गृहिणी मंडळींना खूप मोठे प्रयत्न देखील करण्यात अपयश येत असते. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे बाजारामध्ये उपलब्ध असणारे पदार्थ वापरल्याने मूर्ती खराब होण्याची शक्यता असते आणि अनेकदा देवी-देवतांच्या मुर्त्या भंग पावतात. अनेकदा मुर्त्या झिजून देखील जातात.
अनेकांच्या घरातील देवांच्या मूर्त्या ह्या पिढ्यांना पिढ्या जपलेल्या असतात आणि अशावेळी जर आपण चुकीच्या काही वस्तूंच्या मदतीने देव साफ केले तर त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आणि तुम्हाला देवघरच्या घरी व्यवस्थित कशा पद्धतीने स्वच्छ करायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत. या माहितीच्या उपयोगाने तुमच्या घरातील देव अगदी जपले जातील आणि पिढ्याच्या पिढ्यांनी जपलेले देव अगदी पुढच्या पिढीपर्यंत देखील राहतील चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल… आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती, माता अन्नपूर्णा, लक्ष्मी, बाळगोपाळ यांच्या मुर्त्या असतात. या मुर्त्या आपण रोज स्वच्छ धुवत असतो परंतु या मूर्तींवर हळद-कुंकवांचा काळा थर जमा होऊन जातो. हा थर काही जाण्याचं नाव घेत नाही आणि म्हणूनच या काळ्या थरामुळे आपल्या मूर्तीचे सौंदर्य बिघडून जाते. आजच्या लेखांमध्ये मूर्तीचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी आपण कोणत्याही कोलगेटच्या पेस्ट चा वापर करणार आहोत.
तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा ब्रँड असेल तरी चालेल.त्याची पेस्ट आपल्याला लागणार आहे. ही पेस्ट आपल्याला मूर्तींवर लावण्याआधी आपल्याला देवांच्या मुर्त्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत जेणेकरून कुंकू किंवा हळद असेल तर ते धुतले जाईल त्यानंतर आपल्याला या मूर्तींवर टूथपेस्ट लावायचे आहे. मूर्तींवर टूथपेस्ट लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक नवीन ब्रश घ्यायचा आहे आणि त्या ब्रशने मूर्ती अलगद घासायची आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवायची आहे. अनेक जण मूर्ती धुताना देवतांच्या मुर्त्या गरम पाण्यामध्ये ठेवतात असे करणे चुकीचे आहे. जर आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवले तर कसे होईल? चटका लागेल ना… त्याच पद्धतीने देवांना देखील चटका लागतो, म्हणूनच आपल्याला त्या मुर्त्या गरम पाण्यामध्ये अजिबात ठेवायच्या नाही. देवांच्या मुर्त्या साफ करताना आपल्याला मनामध्ये एक सद्भावना असलेला भाव ठेवायचा आहे आणि मुर्त्या साफ करायचे आहे.
देवांच्या मुर्त्या साफ केल्यानंतर आता आपल्याला एका वाटीमध्ये हळद आणि मध हे यांचे मिश्रण तयार करायचे आहे आणि हे मिश्रण मूर्तींना लावायचे आहे, जेणेकरून मूर्ती घासल्यावर जर देवांना कोणत्याही प्रकारची ज’खम झाली असेल किंवा काही त्रा’स झाला असेल तर तो हळद आणि मध यांच्यामुळे दूर होऊन जातो. हळद आणि मध यांचे मिश्रण लावल्यानंतर आपल्याला थोडा वेळ तसेच मुर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ कापडाने पुसायचे आहे आता तुम्हाला फरक दिसून येईल. पूर्वीची मूर्ती आणि आताचे मूर्ती यांच्यामधील अंतर तुम्हाला लगेच ओळखायला येईल अशा प्रकारे कोणत्याही रा’सायनिक पदार्थांचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी सहजच देव्हाऱ्यातील मुर्त्या अगदी चमकवू शकता.
Recent Comments