आषाढी एकादशीला चुकूनही करू नका हे काम आयुष्यभर पश्चा’ताप होईल

नमस्कार जय जय राम कृष्ण हरी

या दिवशी मनोभावे श्रीहरी विष्णुच्या कोणत्याही रुपाची मग त्यामध्ये विठ्ठल माऊली, भगवान श्रीकृष्ण, बालाजी, बाळकृष्ण अशा भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मित्रानो आपण व्रत उपवास करत आहात तर या दिवशी काही गोष्टींचं पालन आवश्य करा.

काही गोष्टी अशा असतात ज्या एकादशी तिथीस, आषाढी एकादशीस, देवशयनी एकादशीस आपण चुकूनही करू नयेत. या गोष्टी केल्याने त्या व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्याचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीस देवपूजा करताना किंवा विठ्ठल माऊलीची पूजा करताना निळ्या किंवा काळ्या वस्त्रांचा वापर करू नये. म्हणेजच निळे किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आपण देवपूजा करू नका. सोबतच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने तामसिक पदार्थांपासून दूर रहावं.

तामसिक पदार्थ म्हणेज कांदा, लसूण, मसालेदार पदार्थ, मांस, म दिरा किंवा कोणत्याही प्रकारची व्य सन या पदार्थांचं सेवन आपण चुकूनही करू नका. मित्रानो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवंताच्या चरणी लिन होण्याचा दिवस असतो. काही मंत्रांचा जप देखील आपण या दिवशी करू शकता.

मंत्र जप करण्यासाठी किंवा भगवंताच्या चरणी तल्लीन होण्यासाठी जी एकाग्रता लागते जे पूर्ण ध्यान आवश्यक असत हि एकाग्रता अशा तामसिक पदार्थांचं सेवन केल्याने साध्य होत नाही. आणि आपण भगवंतांशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणूनच अशा पदार्थांच्या सेवनापासून आपण शक्य तितके लांब राहणे फायदेशीर ठरेल.

आषाढी एकादशीस आपल्या तोंडून खोटं बोललं जाणार नाही याची काळजी घ्या. कोणासोबत सुद्धा खोटे बोलू नका, खोटे वर्तन करू नका त्यामुळे सुद्धा व्रताचं फळ आपल्याला पूर्ण रूपाने प्राप्त होणार नाही. हिंदू धर्म शास्त्र असेही मानते कि या दिवशी कोणत्याही झाडाच्या फांद्या आपण तोडू नयेत.

आपण जर काही विशिष्ट प्रयोग करणार असाल किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करणार असाल तर हा नियम त्या ठिकाणी वर्ज आहे. मात्र विनाकारण झाडांच्या फांद्या तोंडन या गोष्टींपासून लांब राहावं. एकादशीच्या आधल्या दिवसापासून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रम्हचर्याचं पालन करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *