आषाढी एकादशी विशेष व्रत , मंत्र , स्रोत्र साधना आपलं नशीब बदलून टाकणारी

नमस्कार, जय हरी विठ्ठल.

आषाढी देवशयानी एकादशी या दिवसापासून चतुर्थ मासास प्रारंभ होतो. भगवान विष्णू शिर सागरात शेषशेये वर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवशी दिवस भर कोणत्या व्रताची पूजा करायची कोणते मंत्र जप करायचे. कोणते व्रत आचरणात अनायचे. ही सर्व सविस्तर माहिती आजच्या या लेखा मध्ये मिळणार आहे. त्या साठी हा लेख शेवट पर्यंत नक्की पाहा.

एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या कुल दैवताची श्री विष्णूची पूजा करावी. विष्णूसहस्त्रनाम ,रामरक्षा स्तोत्र , गीतेचा १५ वा अध्याय, गीतेचे १८ नावे यांचे पठण करावे. दिवसभर उपवास करावा. उपवास म्हणजे परमेश्वराच्या जवळ निवास करणे.

पुण्य प्राप्ती बरोबरच शरीरातील इंद्रियांना विश्रांती मिळावी. हा उपवासाचा मुळ हेतू असतो. भगवान विष्णूंना शक्य असेल तर १००० हजार किंवा १०८ तुळशीची पाने वाहावित. तसेच श्री विष्णूचा चक्र, गदा, कमल व पायाजवळ लक्ष्मी असा मंचकावर निजलेला फोटो पुजावा. आणि पूजन करत असताना पुढे लहीलेला मंत्र म्हणावा हा मंत्र प्रर्थना पूर्वक म्हणूनच पूजन करावं. हा मंत्र अश्या प्रकारे आहे.

*सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत सुप्तं भवेदिदम।
विबुद्धे त्वयि बुध्येत जगत सर्वं चराचरम।*

ह्या मंत्राचे प्रार्थना पूर्वक पठण करत आपल्याला श्री हरी विष्णुच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे.त्याच बरोबर आजचा दिवस हा एकादशीचा सुधा आहे म्हणून या दिवशी भगवान पांडुरंगाचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा कमीत कमी एक माळ जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे वत्सं धारयन वक्शे | मुक्ता मला षडाक्षरम हा मंत्र भगवान पांडुरंगाचा आहे या मंत्राचा १०८ वेळा म्हणजेच एक माळ जप करायचा आहे.

मित्रांनो या दिवसापासून चातूर्थ मास चालू होतो. या कालखंडात मध्ये शक्य असेल तर सर्वांनी गोपद्म व्रत करायला हवे. गोपद्म व्रत म्हणजे आपल्या देव घरासमोर रोज सकाळी रांगोळीने ३३ गोपद्म म्हणजेच गायीचे पावले काढायची आहेत. कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत हे व्रत करायचे आणि त्या नंतर या व्रताची सांगता करायची.

शक्य असेल तरच हे व्रत करा. त्याच प्रमाणे चातुर्थ मासमध्ये अनेक व्रत करतात जसे की पिंपळ तुळशी यांची पूजा , प्रदशिना, दीपदान, भगवान विष्णूच्या मंत्रंचे पठण , गीता पठण , विष्णू पुराण श्रवण त्याचबरोबर पठण हे करायचे आहे. फक्त ही माहिती तुम्ही आचरणात आना दिवस भर उपवास करा. मंत्र जप करा. आणि आजच्या या पुण्य पावन दिवशी पुण्य कर्मामध्ये वाढ करा. आणि हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा…

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *