उंबराची ‘ही’ गोष्ट कायम जवळ ठेवा अचानक धनलाभ होईल व सुखशांती मिळेल.

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या दारी औदुंबर अर्थात उंबराचे झाड असते. या झाडाची ही एक गोष्ट नेहमी घरात ठेवल्याने पैसा आपोआप येईल, नशीब आपली कायम साथ देऊ लागेल, सुख समाधान मिळेल आणि त्याचबरोबर चांगले आरोग्य देखील लाभेल. आपल्या अनेक समस्या संपून जातील आणि देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. जर आपल्याला कसली बाधा झाली असेल तर याने तिचे निवारण होईल. ग्रहदोष तर जाईलच पण सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्याचप्रमाणे ही वस्तू घरात ठेवल्याने घरातील कलह बाहेर जातील व मनशांती मिळेल.

पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूनी हिरण्यकश्यपुला मारण्यासाठी नरसिंह अवतार घेतला होता. हिरण्यकश्यपुने प्रल्हादाला विचारले, कुठे आहे तुझा देव? तेव्हा प्रल्हाद उत्तरला की, देव चराचरात आहे. त्याचक्षणी क्रोधीत होऊन हिरण्यकश्यपुने शेजारी असलेल्या उंबराच्या लाकडाच्या खांबावर लाथ मारली. त्याचक्षणी त्या खांबामधून भगवान नरसिंह प्रगट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याला ठार केले. परंतु हिरण्यकश्यपुच्या पोटमध्ये असलेल्या कालीकुंड विषामुळे भगवान नारसिंहांच्या नखांमध्ये खूप दाह होत होता. हे पाहताच देवींनी जवळच असलेल्या उंबराच्या झाडाची फळे तोडून आणली व नरसिहांना त्यामध्ये त्यांची नखे खुपसायला लावली.

उंबराच्या फळातील रसामुळे त्यांच्या नखातील दाह थांबला. प्रसन्न होऊन भगवान नरसिहांनी उंबराच्या झाडाला आशीर्वाद दिला की, त्यामध्ये नेहमी त्यांचा व देवी लक्ष्मी यांचा वास असेल. याचप्रमाणे महाराज नरसिंह सरस्वती यांना देखील भगवान नरसिंह यांचा अवतार मानले जाते. अवतारकार्यामध्ये अमरापूर मध्ये जेंव्हा ते पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमावर ध्यानाला बसत, तेव्हा देखील ते औदुंबर वृक्षाच्या सावलीतच बसत. तेथे ध्यान करताना रोज ६४ योगीनी तेथे त्यांच्या पूजेसाठी येत असत. जेव्हा नरसिंह सरस्वती अमरापूर सोडून निघाले तेव्हा त्या ६४ योगिनींनी त्यांना तेथेच थांबण्याची विनंती केली. तेव्हा नरसिंह सरस्वतीनी त्यांना सांगितले, काळजी करू नका मी सदैव या वृक्षामध्ये राहील. जेव्हा तुम्ही माझी आठवण काढाल तेव्हा मी तुम्हाला दर्शन देईल.

औदुंबर वृक्षामध्ये भगवान नरसिंह, माता लक्ष्मी सोबतच नरसिंह सरस्वती यांचा देखील वास असतो. औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रह हा धनसंपत्ती आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तींचा शुक्र ग्रह मजबूत असतो, त्यांच्या जीवनात धन, ऐश्वर्य आणि संपत्ती यांची कधीच कमतरता भासत नाही.

आपल्याला करायचा असलेला उपाय- कुठल्याही शुभ मुहूर्तावर शुक्रवारी किंवा गुरूपृष्य मुहूर्तावर करायचा आहे. मित्रांनो जर आपण हा उपाय शुक्रवारी करणार असाल तर गुरुवारच्या औदुंबर वृक्षाची पूजा करून प्रार्थना करावी. आणि गुरुवारच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाला पिवळे तांदूळ, पिवळे फुल आणि पाणी अर्पण करून मनोभावे पूजा करावी.

शुक्रवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी व औदुंबर वृक्षाच्या मुळाचा बारीक तुकडा कापून घ्यावा. हे मूळ नंतर गंगाजल किंवा साफ पाण्याने स्वच्छ करावे. हे मूळ आपल्या देवघरात किंवा एखादे पिवळे वस्त्र ठेऊन त्यावर थोडी चना डाळ ठेवावी आणि त्या डाळीवर हे मूळ ठेवावे. नंतर त्याची रोज पूजा करावी आणि मनोभावे प्रार्थना करावी. या उपायांमुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील. माता लक्ष्मीची कृपा होईल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *