एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका ही 5 कामे
नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी वा आषाढी एकादशी म्हणतात. या दिवशी रात्री भगवान विष्णूच्या शयनकालाचा आरंभ होतो. देवशयनी एकादशी आज आहे. या दिवशी विष्णूची उपासना केली जाते. यातून भगवान विष्णूचे ध्यान आणि पुजा केली जाते.
या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेसाठी गेले होते. यानंतर तब्बल चार महिन्यानंतर जेव्हा ते उठतात तेव्हा सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करतात. यादरम्यान शुभ कार्ये विवाह, यज्ञ, गोदान, गृहप्रवेश सारखी कार्ये करत नाहीत. याचप्रमाणे आजच्या एकादशीच्या दिवशी ५ प्रकारची कामे करु नयेत.
१. उपवास करणाऱ्या लोकांनी अन्नाचे सेवन करु नये. घरी भात शिजवू नये. वृद्ध आणि रोगी व्यक्तींसाठी भोजन करणे गरजेचे आहे.२. या दिवशी खोटं बोलू नये. एखाद्याची चुगली वा निंदा करु नये. बोलताना सौम्य भाषेत बोलावे. सर्वांशी चांगले वागावे,जप करावा.
३. हिंसा करु नये. मन, वचन आणि कर्माने कोणालाही त्रास होईल असे वागू नये. ४. ब्रम्हचर्येचे पालन करा. पती-पत्नीने याचे पालन करावे.
५. केस कापू नयेत. नखे कापू नयेत. घर स्वच्छ ठेवावे. कोणत्याही प्रकारची घाण घरात ठेवू नये.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Recent Comments