कागदावर लिहा हे शब्द, त्वरित मनातल्या भावना पूर्ण होतील आणि सर्व ईच्छा पूर्ण
आपल्या आयुष्यात आणि जीवनात सतत त्याच गोष्टी घडत असतात ज्यांचा विचार आपण करत असतो अथवा तो विचार आपल्या मनात असतो. ज्या गोष्टींची इच्छा आपण व्यक्त करतो, त्या कधी ना कधी आपल्या जीवनात नक्की घडतात. जर आपण एखाद्याच हित केलं किंवा चांगलं केलं तर आपल्या जीवनात सुद्धा चांगल्या गोष्टी घडू लागतात. त्याउलट एखाद्याच वाईट व्हावं किंवा एखाद्यासाठी आपण नकारात्मक विचार केला तर आपल्या आयुष्यात सुद्धा वाईटच घडत. याचा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव आला असेल.
दिवसभरात एक वेळ अशी असते, जेव्हा आपल्या तोंडातून पडलेले शब्द वाईट असो अथवा चांगले ते खरे ठरू लागतात. त्यामुळे सकाळी ब्रम्ह मुहूर्तावेळी आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी कधीही तोंडातून अपशब्द काढू नयेत. त्यामुळे नेहमी अश्या गोष्टी बोलाव्यात किंवा अश्या गोष्टींचा विचार करावा ज्याने आपले व समाजाचे हित होईल आणि त्या आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे असतील. असे केल्यास हळूहळू आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडू लागतील. आपल्या इच्छा हळूहळू पूर्ण होतील.
आज जाणून घेऊया, कागदावर असे कोणते शब्द लिहिल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतील. हे शब्द आपल्याला दररोज कागदावर लिहायचे आहेत. दररोज एक वेळ निश्चित करा ज्यामध्ये आपल्याला कामाचा व्याप नसेल. सलग एक्केचाळीस दिवस आपण हा उपाय करावा. एकही दिवसाचा खंड यामध्ये पडू देऊ नये.
आपल्यापैकी बरेच लोक सुरुवातीला उत्साहाने सुरुवात करतात आणि नंतर सोडून देतात, अस करू नये. जर आपल्याकडून खंड पडला तर पुन्हा पहिल्या दिवसापासून याची सुरुवात करावी. हा उपाय करताना पांढऱ्या रंगाचा एक चौकोनी कागद आणि निळ्या अथवा हिरव्या रंगाचा पेन घ्यावा. पहिल्या दिवशी आपण जी वाक्य लिहिणार आहात, तीच वाक्य आपल्याला सलग ४१ दिवस कागदावर लिहायची आहेत.
वाक्य १- मी खूप खुश आहे, आनंदी आहे. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. मला जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढा पैसा मला मिळणार आहे. तेवढ्या पैशांसाठी मी पात्र आहे.
वाक्य २- मला जो पैसा, वस्तू मिळत आहे, जो ऐशोआराम मिळत आहे त्यामध्ये माझे कुटुंब मला सहकार्य करत आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो.
वाक्य- ३. मला जे काही मिळत आहे आणि मिळणार आहे, त्यासाठी ब्रह्मांडातील त्या शक्तींचे मी मनापासून आभार मानतो ज्या माझ्यासाठी अनुकूल आहेत.
तुमचा विश्वास बसणार नाही, अश्या गोष्टी आपल्या जीवनात घडू लागतील. काही लोकांना १५-२० दिवसातच याचा अनुभव येईल पण हा उपाय करणे सोडू नका. शेवटपर्यंत म्हणजेच ४१ दिवसांपर्यंत हा उपाय आपण करत राहा. जी वाक्ये आपण या कागदावर लिहिली आहेत, ते ते आपल्या जीवनात घडल्याचा चांगला अनुभव आपल्याला येईल. आपल्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी अस आपल्याला वाटत असेल तर ती इच्छासुद्धा आपण या कागदावर लिहुन पहा, याने आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होईल.
Recent Comments