कासव घरात ठेवण्याचे जाणून घ्या आत्ताच फायदे नुकसान अन्यथा जीवनामध्ये घडू शकतील नको ते प्रसंग!

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला कासवा बद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. मित्रांनो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे छंद असतो. अनेकांना घरामध्ये कासवाच्या प्रतिमा लावायचे आवडत असते तर काहीजण देव्हाऱ्यामध्ये धातूच्या प्रतिमा किंवा मूर्ती ठेवत असतात अशावेळी जर देव्हाऱ्यामध्ये कासवाची मूर्ती असेल तर ती पाण्यामध्ये ठेवायची की नाही तसेच धातूची मूर्ती असल्यास तिची काही विशेष पूजाविधी असते का? अशाबद्दल आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देखील सांगणार आहोत. ही माहिती तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो कासव हे असे प्राणी आहे ज्याचा अध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

कासवाला साक्षात माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच समुद्रमंथनामध्ये देखील कासवाचा उल्लेख आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो त्याचबरोबर आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा कासव पहिल्या पायरीवर आपल्याला पाहायला मिळते. कासव हे आपल्या पिल्लांचे रक्षण करते आणि म्हणूनच देवी-देवतांप्रमाणे आपले देखील रक्षण व्हायला पाहिजे, या हेतूने देखील कासवाची प्रतिमा व कासवाच्या मुर्त्या आपल्या घरामध्ये अनेक जण ठेवत असतात कासवाला वास्तुशास्त्रा मद्ये एक वेगळे महत्त्व आहे ,चला तर मग जाणून घेऊया जर आपल्या घरामध्ये कासवाची धातूची मूर्ती असेल तर ती पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे की नाही याबद्दल…

मित्रांनो कासवाला वास्तुशास्त्र, फेंगशुई शास्त्र मध्ये महत्त्व तर आहे पण त्याचबरोबर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये देखील खूपच महत्त्व देण्यात आलेले आहे. कासवाचा उल्लेख वेगवेगळ्या शास्त्रात सांगण्यात आलेला आहे. कासवाला श्री विष्णू यांचा अवतार मानला गेलेला आहे. ज्या व्यक्तीच्या घरामध्ये कासवाची मूर्ती किंवा कासवाचे चित्र असते अशावेळी त्या घरामध्ये प्रत्यक्ष श्री विष्णू यांचा अवतार तसेच वास्तव्य राहते. अनेक पूर्ण ग्रंथांमध्ये कासवाला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे तसेच कासव हा दहा हजार वर्षापेक्षा जास्त जिवंत राहतो. आनंद आणि शुभ नशीब याचे प्रतिकदेखील कासवाला मानण्यात आलेले आहे आणि समुद्र मंथन वेळी कासवाने आपल्या पाठीवर खूप मोठे फार वजण घेतले होते आणि म्हणूनच कासव, संयम प्रजनन आणि सुखी जीवनाचे प्रतीक देखील मानले जाते. घरामध्ये कासवाची धातूची मूर्ती अनेक म्हणजेच बनवून ठेवतात.

कासवाची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने आपल्या जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो तसेच तुम्ही पाहिले असतील की अनेक जण हातामध्ये कासवाची अंगठी देखील परिधान करतात, असे केल्याने आपल्या जीवनात आत्मविश्वास वाढतो. कासवाला नशीब याचे प्रतीक देखील मानले असते जाते जर तुम्ही खूप मेहनत करत आहात परंतु तुम्हाला कामाच्या विविध संधी जर मिळत नसेल तर अशावेळी आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही धातूच्या कासवाची अंगठी देखील हातामध्ये परिधान करू शकता किंवा घरामध्ये कासवाची प्रतिमा तसेच प्रस्थापित करू शकता. कासव घरामध्ये ठेवल्याने तुमच्या घरामध्ये शांतता राहते तसेच तुमचे मन देखील एकाग्र बुद्धीने कायमस्वरूपी टिकून राहते. तुमचे लक्ष विचलित होत नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या मनामध्ये एक प्रश्न कायमचा निर्माण होत असतो तो प्रश्न म्हणजे जर आपल्या घरामध्ये धातूची कासवाची प्रतिमा असेल तर ती पाण्यामध्ये ठेवायची किंवा नाही ठेवायची? अनेकदा पाण्यामध्ये प्रतिमा ठेवल्याने प्रतिमा काळी होऊन जाते, अशावेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुमच्या घरामध्ये धातूची कासवाची छोटीशी मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर ती नेहमी पाण्यामध्येच ठेवायला हवी, यासाठी चांगल्या गुणवत्तेची प्रतिमा घरामध्ये आणा म्हणजेच ती काळी पडणार नाही परंतु हे पाणी आपल्याला रोजच्या रोज बदलायचे आहे. पाणी तसेच तीन-चार दिवस ठेवायचे नाही.

असे करणे अशुभ मानले जाते कारण की पाणी आणि कासवाचा संबंध खूपच जवळचा आहे. घरामध्ये आपल्याला कासवाची प्रतिमा अवश्य ठेवायची आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये कासवाच्या संदर्भातील अनेक गोष्टी देखील सांगण्यात आलेल्या आहेत. जर तुमच्याकडे कासवाची धातूची प्रतिमा असेल तर ती आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचे आहे व तसेच तुम्ही जास्तीत जास्त वेळ ज्या ठिकाणी व्यतीत करतात अशा ठिकाणी आपल्याला कासवाची धातूची प्रतिमा ठेवायची आहे, असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत आणि तुमची प्रगती देखील लवकर होणार आहे. कासव हा स्वभावाने शांत आहे आणि जी व्यक्ती नेहमी शांत राहते त्या व्यक्तीला भविष्यात खूप सारे यश लवकर प्राप्त होते. जर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत असेल तर अशावेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कासवासी प्रतिमा ठेवा तसेच तुम्ही तुमच्या बिछाना च्या वरच्या बाजूला कासवाची प्रतिमा ठेवली तर तुमच्या घरातील सर्व चिंता लवकरच दूर होऊन जातील.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *