किचनमध्ये या ५ वस्तु कधीही संपू देऊ नका, होतील अनेक नुकसान, घारामधली लक्ष्मी सुद्धा निघून जाऊ शकते..
वास्तुशास्त्रानुसार देवघरानंतर सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर.वास्तुशास्त्रामध्ये किचन ला अनन्यसाधारण महत्त्व आहे.किचनचा आणि आपल्या घरातील सुख शांतीचा अत्यंत जवळचा संबंध आहे.वास्तुशास्त्रानुसार किचन बांधण्यासाठी अग्नेय दिशा ही सर्वोत्तम आहे.कारण या दिशेत अग्निदेव विराजमान आहेत.जर आपले किचन आग्नेय दिशेला असेल तर घरात सुख आणि शांतीचे वातावरण असते.यामुळे घरातील गृहिणी नेहमी प्रसन्न असते.आणि परिणामस्वरूप घरातील सर्वांची आर्थिक ,सामाजिक प्रगती होते.
याचउलट नैऋत्य दिशा ही खुप अशुभ आहे.जर आपण या दिशेला किचन बांधल तर घरात अनेक समस्या निर्माण होतात.आर्थिक नुकसान होतात. घरात नैराश्य पसरते.सोबतच घरात अनेक रोग येतात आणि सगळ्यांची चिडचिड होते. आपल्या स्वयंपाक घरातील स्टो किंवा सेगड़ी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे.या दोन्ही दिशा अत्यंत शुभ असतात.
आपल्या स्वयंपाक घरात देवी लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा चा वास असतो म्हणून स्वयंपाकघर हे दूसरे मंदिरच आहे.शक्यतो स्वयंपाक घरात आंघोळ केल्याशिवाय प्रवेश करु नये हे खुप चुकीचे आहे.ज्या घरातील लोक स्वयंपाकघरात चप्पल किंवा बूट घालून जातात.त्यांच्यावर माता अन्नपूर्णा नाराज होते आणि त्या घरात सुख,समृद्धी कधीही येत नाही.
अनेक लोक स्वयंपाकघरात भंगार चे तुटके-फुटके सामान , खराब झालेल्या वस्तु ठेवतात.यामुळे आपल्या किचनचे पावित्र्य संपते आणि घरात रोगराई पसरते.अनेक गृहिणींना सवय असते की त्या किती तरी दिवसांची कनिक फ्रीज मध्ये मळून ठेवते आणि खुप दिवस तेच ते वापरत असते.हे आरोग्यासाठी तर घातक तर असतेच सोबत वास्तुशास्त्र मध्येही गडबड करते आणि आपल्या आजुबाजुच्या परिसरामधील नकारात्मक शक्तींना आकर्षित करते.
स्वयंपाकघरासोबच घरातील कुठल्या नळामधून पाणीची गळती नसायला पाहिजे. जर आपल्या घरातील कुठल्याही नळामधून असे पाणी जात असेल तर परिणामस्वरूप आपल्याला आर्थिक नुकसान होते. नको त्या गोष्टींवर आपले पैसे खर्च होऊन जातात.किचनच्या बेसिन मध्ये कधीही थूंकु नये.याकारणांमुळे किचनचे पावित्र्य संपते.
किचनमध्ये आरशा ही लावू नये यामुळे आपल्या सर्वकामात अडथळा निर्माण होतात.घरात दरिद्रता येते. किचनमध्ये तवा आणि कढाई ही कधीही पालथी ठेवू नका ,हे दोन्हीही भांडी थेट राहु आणि केतुशी संबंधित असतात.तवा नेहमी लपवून ठेवावे, त्यावर बाहेरच्या व्यक्तिची नजर पडता कामा नये.तवा आणि कढाई नेहमी स्वच्छ ठेवावे.यामुळे राहु आणि केतु चे दोष दूर होतात.
आता आम्ही अशा ५ गोष्टी सांगणार आहोत, जे कधीही संपू देऊ नका.नाहीतर जर हे संपले तर खुप नुकसान होते.
:- तांदूळ, तेल, मीठ, हळद आणि मोहरी.वास्तुशास्त्रानुसार जर आपल्या किचन मधून संपल्या तर घरातील सुख-समृद्धी ही संपून जाते.किचनमध्ये या 5 वस्तू चुकूनही संपवू नका लक्ष्मी निघून जाईल
Recent Comments