कोणत्याही प्रकारच्या भावनांमध्ये न अडकून भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या असतात या काही पुढील राशी पुढील राशी!

नमस्कार मंडळी!

भावनिक बुद्धिमत्ता ही एक स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांना ओळखण्याची व त्यानुसार प्रतिक्रिया देण्याची कला आहे. आसपासच्या वातावरणानुसार आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी व विचार करण्यासाठी तसेच व्यवहार करण्यासाठी उपयोगात आणण्याची क्षमता देखील आहे. काही व्यक्ती असे असतात ज्यांना त्यांच्या भावनांबद्दल काहीही काळजी नसते व इतरांच्या भावनांशी देखील देणंघेणं नसते. पण काही व्यक्ती अशा आहेत ज्या भावनिक दृष्ट्या खूपच बुद्धिमान असतात, त्यांचं त्यांच्या भावनांवर उत्तम नियंत्रण असतं. हे व्यक्ती स्वतःच्याच नाहीतर इतरांच्या ही भावना चांगल्या पद्धतीने समजून घेतात. हे सर्व त्या व्यक्तीची रास कोणती आहे यावर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या राशीप्रमाणेच असतो, त्यामुळे अशा पाच राशी कोणत्या ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्यामधील पहिली रास म्हणजे मीन. मीन राशीचे व्यक्ती हे स्वभावाने साधे असतात, ते इतरांच्या भावना आणि स्वतःच्या भावना योग्यरीत्या समजून घेऊ शकतात. तसेच ते इतरांना भावनात्मक संकटातून दिलासा देतात, समजून घेतात, सहजा कोणाला दुखवत नाहीत पण त्यांच्या सहनशक्तीला सुद्धा मर्यादा असतात. यानंतरची दुसरी रास म्हणजे कर्क. ही रास असलेले व्यक्ती देखील जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या भावनांमध्ये गुंतलेले पाहतात, त्यांना चिंतेत किंवा दुःखी पाहतात तेव्हा ते त्यांना भावनात्मक दृष्टीने दिलासा देतात आणि त्याला स’मस्येवर मात करण्यास ही मदत करतात. कर्क रास ही शांत स्वभावाची रास आहे.

आता तिसरी रास आहे तुळ. तूळ रास ही संतुलित रास तुळ. जे कोणत्याही भावनिक अवस्थेत व्यावहारिक दृष्ट्या प्रत्येक ठिकाणी निष्पक्षता आणण्यासाठी प्रयत्न करीत असते. आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय हवा असतो. म्हणून जेव्हा एखाद्याला भावनिक वेदना होत असतील तर तूळ राशीच्या व्यक्तींना त्यामुळे चिंता होते त्या व्यक्तीबद्दल काळजी वाटते आणि ती भावनिक वेदना काय आहे व कोणत्या प्रकारची आहे हे समजून घेण्याचा तर प्रयत्न करतात व त्यांना मदत करतात. आता चौथी रास म्हणजे कन्या. कन्या राशीचे व्यक्ती हे प्रेरित कष्टाळू समर्पित तसेच विश्लेषणात्मक असतात पण ते भावनिक दृष्ट्या ही चांगले असतात. कन्या राशीचे व्यक्ती हे कुटुंबासाठी जगणारे असतात जे भावनिक स’मस्येच्या वेळी आणि प्रियजनांना मदत करण्याच्या वेळी नेहमी पुढे असतात.

आणि आता शेवटची आणि सर्वात तीव्र रास म्हणजे वृश्चिक. वृश्चिक राशीचे व्यक्ती केवळ स्वतःच्याच भावनांनी संतुलित नसतात तर ते इतरांच्या न कळत त्यांच्या भावनिक स’मस्या देखील जाणून घेत असतात. वृश्चिक राशीचे व्यक्ती अत्यंत दयाळू असतात ते आपल्या प्रियजनांना भावनिक रित्या योग्य प्रकारे न्याय देतात आणि जसं ते इतरांना समजून घेतात तसेच इतरांनी ही त्यांना समजून घेतले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. तर मंडळी यापैकी तुमची कुठली रास असेल किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींपैकी कोणाची असेल तर नक्की कळवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *