कोणाच्या घरी जन्माला येतात मुली यामागे आहे मोठे कारण सुंदर भाषेत

कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते याचा खूप सुंदर उत्तर आज तुम्हाला मिळेल

नमस्कार मित्रांनो आमच्या mimarathiupdates.in ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो असे म्हणले जाते कि मुलगी झाली कि लक्ष्मी घरी येते. पहिली बेटी धनाची पेटी. भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत. जे नशीबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात. ज्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाहीत. ज्यांच्या देण्याची दान करण्याची नीती असते अश्याच घरी मुली जन्म घेतात. आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते.

एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्यांच्यासोबत २ मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसरी मुलगीचा हाथ धरून ते डोंगर चढत होते. तर विवेकानंद त्या शेकऱ्याला म्हणाले कि बाबा तुम्ही कोठे निघाले आहेत तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे.

त्यावेळी स्वामी विवेक त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा कि तिचा भार माझ्या खान्द्यावर तीला द्या आणि वरती मंदिरात गेले कि मी तिला तुमच्याकडे देतो. त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांदयावर भार असत नाही उलट वडिलांच्या खांदयावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते. अश्या असतात मुली ओझे नसतात मुली ज्या माणसाला मुली ओझी वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही. एकवेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच नाही.

आई वडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलींचे हृदय कासावीस होते. जोपरेंत मुलगी घरात असते टोपरेंत घरात बागडत असतेपरंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली कि आपण तिची वेळोवेळी आठवण करत राहतो. जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल. वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल. काही हवे नको ते पाहिल. वडीलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचरेल.

मुलगी म्हणजे वडिलांना आई सारखीच असते. ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते, वेळप्रसंगी रागावेन तर काही वेळा लाडात येऊन बोलेल. चूक असेल तर त्यांना दाखवून देईल परंतु ती जर सून असेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेनार नाही. मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल. अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही.

मुलीला सासरी जाताना वडील दरवाजाआड राहून रडतात. जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा. अश्या मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते अश्या नशीबवान लोकांच्याच घरी जन्माला येतात.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *