गणेश जयंतीला दिवसभरात कधीही बोला हा 1 मंत्र पैसा कधीच कमी पडणार नाही
मित्रांनो गणेश जयंतीमध्ये आपल्या सर्व संकटांना दूर करण्यासाठी नक्की करा हे एक काम.. शास्त्रानुसार चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार आजच्या दिवशी श्री गणेशाची उपासना खूपच लाभदायक ठरते आणि त्याचा प्रभाव हजार पटीने अधिक असतो. मागमास चतुर्थी मोक्षप्राप्तीसाठी खास मानली जाते. माग महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे, म्हणून या दिवशी श्री गणेश मंदिरात गणपती बाप्पांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
या दिवशी श्री गणेशाची उपासना सर्वाधिक लाभकारी ठरते, श्री गणेश बुद्धीचे देवता आहे. सुखकर्ता दुखहर्ता आहेत म्हणूनच गणेश जयंतीच्या दिवशी जर आपण काही छोटेसे उपाय केले तर आपल्या जीवनातील अनेक अडचणी संकटे दूर होतील. हा उपाय करण्यासाठी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी प्राथककाळी लवकर उठून नित्यकर्म आट पावी व सूर्योदयाच्या वेळी श्री गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करावी.
आपल्या सर्वांना माहीतच आहे की दूर्वा श्री गणेशांना अतिशय प्रिय आहेत. या 21 दुर्वा आपल्याला श्री गणेशाला वहायच्या आहेत.आणि लक्षात ठेवा या दुर्वा आपण श्रीगणेशाच्या मस्तकावर व्हायचे आहेत, यामुळे श्री गणाराय आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. या दुर्वा अर्पण केल्यानंतर मनातल्या मनात आपली इच्छा बोलावी श्री गणेश विघ्नहर्ता तुमची मनोकामना नक्की पूर्ण करतील.
यानंतर श्री गणरायाच्या पुढे हात जोडून एक मंत्र म्हणायचा आहे, मंत्र आहे. ” इदं दुर्वदलम ओम गं गणपतये नमः” या मंत्राचा एकवीस वेळा मनोभावे जप करा, आणि पहा खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. तुमच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा भरेल, हाती घेतलेले प्रत्येक काम सफल होईल.
अशा प्रकारे हा उपाय तुम्ही श्री गणेश जयंतीला केला. तर तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल, विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करतील.
Recent Comments