गरुड पुराणातील या काही गोष्टी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मदत करतील, चुकून देखील करू नका ही काही पाच कामे !!

मित्रांनो प्रत्येकाला असे वाटत असते की आपण श्रीमंत व्हायला हवे. आपली परिस्थिती बदलायला हवी. आपल्याकडे भरपूर पैसा असायला हवा. लवकरच गरिबी संपायला हवी, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते परंतु बहुतेक वेळा या सगळ्या इच्छाच राहतात. अनेकांचे श्रीमंत बनण्याचे स्वप्न साकार होत नाही, तसे पाहायला गेले तर स्वप्न पाहणे नेहमी चांगले आहे परंतु त्यासाठी प्रयत्न करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आपली कृती देखील त्याच पद्धतीने असायला हवी आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व गरिबी लवकरच नष्ट होणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास करत असतो. शास्त्रांचा आधार घेत असतो. असेच एक शास्त्र म्हणजे गरुड पुराण. या गरुड पुराणांमध्ये मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच मानवी वृत्तीने कोणती चुकीचे कामे करू नये याबद्दल देखील सांगण्यात आलेले आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण असेच काहीतरी कामे जाणून घेणार आहोत, ज्या तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबवतात आणि म्हणूनच हे काही काम आपल्याला भविष्यात चुकून देखील करायचं नाही अन्यथा माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही.

जर तुम्हाला भविष्यात श्रीमंत व्हायचे असेल आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर आपल्याला पुढील काही कामे चुकून देखील करायचं नाही पाहिजे त्यातील पहिले काम म्हणजे मळके किंवा अस्वच्छ कपडे परिधान करणे. जी व्यक्ती नेहमी घाणेरडे कपडे परिधान करते व स्वच्छता पाळत नाही अशा व्यक्तीला कधीच माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, असे विधान गरुड पुराणांमध्ये करण्यात आलेले आहे. अस्वच्छ कपडे व मळलेले कपडे परिधान करणे हे अत्यंत चुकीचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहायला गेले तर हे अगदी बरोबर आहे. जी व्यक्ती मळलेले कपडे परिधान करते त्याच्या आजूबाजूला खूपच नकारात्मक शक्ती वावर करत असतात तसेच त्या व्यक्तीच्या अंगाचा वास देखील येत असतो आणि परिणामी त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच एकंदरीत नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या आजूबाजूला पसरत असते. शरीर आजारी पडल्यामुळे पैसा देखील तितकाच खर्च होत असतो आणि अशा आरोपी माता महालक्ष्मी त्या व्यक्तीकडे वास्तव्य करणे ऐवजी हळूहळू त्या व्यक्तीपासून दूर होत जाते. जर तुम्हाला देखील मळके आणि अस्वच्छ कपडे परिधान करण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला सोडायला हवी अन्यथा माता महालक्ष्मीचा रोष तुमच्यावर होऊ शकतो.

दुसरी गोष्ट म्हणजे घाणेरडे दात आणि शरीर आपल्या सर्वांना माहिती आहे आपले शरीर हे पंचतत्वांनी बनवलेले आहे आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये एक विशेष ऊर्जा वास्तव्य करत असते. ही ऊर्जा आपल्याला नवीन जीवन जगण्यास प्रेरणा देत असते. जर तुम्ही तुमचे शरीर अस्वच्छ ठेवत असाल, तुमचे दात घाणेरडे असतील, शरीर स्वच्छ नसेल तर यामुळे देखील तुम्हाला भविष्यात खूप सार्‍या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांचे शरीर स्वच्छ नसते शरीरावर खूप मळ साचलेला असतो यामुळे तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा पसरते आणि परिणामी त्याचा त्रास इतरांना देखील होतो. ज्या व्यक्तींच्या तोंडातून वारंवार घाण वास येतो अशा व्यक्तीपासून लोक दुरावतात आणि अशा व्यक्तींना माता महालक्ष्मी कधीही जवळ करत नाही. जर तुम्हाला लवकरच श्रीमंत व्हायचे असेल तर प्रत्येकाने आपले दात व्यवस्थित स्वच्छ करायला हवे. दातामुळे कोणत्याही प्रकारची केळ निर्माण होऊ द्यायची नाही व त्याचबरोबर आपले शरीर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे अन्यथा शरीराला कोणत्याही आजाराची लागण होऊ शकते. आजाराची लागण झाल्यावर तुमच्याकडे पैसा येण्याऐवजी डॉक्टरांकडे द्यावा लागेल त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अति प्रमाणात अन्न सेवन करणे. अतिप्रमाणात अन्न सेवन करणे हे अत्यंत चुकीचे आहे. गरुड पुराणांमध्ये देखील ही चुकीचेच मानले गेलेले आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे जर आपण एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त भोगली तर त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर होऊ शकतो त्याचप्रमाणे जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन केले तर तुम्हाला ऍसिडिटी पित्त व अनेक पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात त्याचबरोबर जर आपण इतरांच्या वाटेला आलेले अन्न सेवन केले तर त्याचा रोष किंवा त्याच्या भाग्याचे जे काही दुष्कर्म असतं ते तुम्हाला लागू होतं आणि म्हणूनच तुमच्या वाटेचे जे काही अन्न असेल ते सेवन करणे नेहमी चांगले जी व्यक्ती इतरांच्या वाटेला असलेले अन्न सेवन करते त्यांच्यावर माता महालक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही कारण की त्या अन्नामध्ये इतरांचा रोष असतो आणि जर तुम्ही हे अन्न सेवन केले तर तुम्हाला ती नकारात्मक ऊर्जा शरीराला लागू होते व तुम्ही आजारी पडतात.
गरुड पुराण असे म्हणते की जी व्यक्ती सूर्योदय किंवा सूर्यास्त झाल्यावर झोपते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देखील माता महालक्ष्मी प्रवेश करत नाही..त्या व्यक्तीच्या जीवनात आळस आणि अंधकार निर्माण होतो हे तितकेच खरे आहे जी व्यक्ती सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठते व सूर्यास्ताच्या वेळी झोपत नाही अशा व्यक्तीच्या जीवनात माता महालक्ष्मी नेहमी टिकून राहते, त्या व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळ्या संधी स्वतःहून निर्माण होत असतात त्या व्यक्तीला व्यवसायाच्या व करिअरच्या व नवीन वाटा मिळतात परंतु झोप ही वाईट आहे झोप ही नकारात्मकतेचे प्रतिक आहे. ज्या व्यक्तीला वारंवार झोप लागते त्या व्यक्तीचे प्रगती कधीच होत नाही आणि म्हणूनच व्यक्तींनी जास्त प्रमाणात झोपू नये शरीराला जितकी गरज आहे तितकीच झोपणे बरोबर आहे अन्यथा तुम्ही दिवसं दिवस आळशी बनाल. आळशी स्वभावामुळे तुम्हाला प्राप्त होणाऱ्या अनेक संधी हातातून निसटून जाईल आणि परिणामी तुमच्या जीवनाची अधोगती होईल.

पुढील गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे लोक कठोर व्यवहार करतात त्यांच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी कधीच वास्तव्य करत नाही. हे अगदी बरोबर आहे मित्रांनो नेहमी प्रत्येकाशी प्रेमाने आणि मृदय स्वभावाने वागायला हवे. आपल्यापैकी अनेक जण एकमेकांशी संवाद साधत असताना कठोर शब्दांमध्ये बोलत असतात हे अत्यंत चुकीचे आहे कारण की व्यक्तीने त्याच्या मुखातून काढलेले शब्द हे बाणाप्रमाणे असतात एखाद वेळी जखम भरून निघते परंतु बोललेले शब्द लवकर भरून निघत नाही आणि म्हणूनच एकमेकांशी व्यवहार करत असताना कठोर शब्द चुकूनही वापरायला नाही पाहिजे जिथे चुकते आहे तिथे बोलायला हवे परंतु शब्दांचे भान देखील आपल्याला असायला हवे. जी व्यक्ती नेहमी एकमेकांशी कठोरपणे बोलते रागावून बोलते संतप्त भावनेने बोलते त्या व्यक्तीला माता महालक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. आजच्या या लेखांमध्ये सांगितलेल्या या गोष्टी जर तुम्ही देखील आच रणात आणत असाल तर आत्ताच सावधान व्हा. भविष्यात या चुका अजिबात करू नका अन्यथा माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. जर माता महालक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचा व्यवहार सुधारायचा आहे कारण की जिथे सकारात्मक ऊर्जा नेहमी वास्तव्य करते त्या ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी राहते, हे नेहमी लक्षात ठेवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *