गोमूत्र शिंपडण्याचे हे आहेत फायदे जाणून घ्या आत्ताच!
मित्रांनो हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या गोष्टींचे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तसेच अध्यात्मशास्त्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे, असेच एक महत्त्वाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते म्हणजे गोमूत्र. गोमूत्र हे अनेकदा पूजा विधी करण्यामध्ये वापरली जाते. आपल्या सर्वांना माहितीच आहे गाय ही हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असे मानले जाते आणि म्हणूनच या 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक जण गायीची मनोभावे पूजा करत असतात. अनेकजण गाईला नैवेद्य अर्पण करत असतात. अनेक जण गायीच्या गोमूत्र चा वापर देखील दैनंदिन जीवनामध्ये करत असतात म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला गोमूत्र शिंपडण्याचे नेमके महत्त्व काय काय आहे त्याचे फायदे मानवी जीवनावर काय होतात याबद्दल माहिती सांगणार आहोत ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया गोमूत्र शिंपडण्याचे फायदे…
मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण पूजाविधी करत असताना. गोमूत्र चा वापर हमखास करत असतात. गोमूत्र हे हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानले गेले आहे. गोमूत्रामुळे आपल्या घरातील अनेक नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की, आपल्या घरामध्ये अनेक अशा काही घटना घडतात ज्या सर्वांचा परिणाम आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक होत असतो, अशावेळी नकारात्मक परिणाम दूर करण्यासाठी गोमूत्र अत्यंत लाभदायक ठरत असतात. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये वारंवार नकारात्मक ऊर्जा असल्याची जाणीव होत असेल, ग्रहदोष, पत्रिकेमध्ये काही दोष असेल तर अशावेळी शुक्रवारच्या दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, असे केल्याने तुमच्या पत्रिकेतील ग्रहदोष शांती होते आणि तुम्हाला भविष्यात अनेक चांगल्या घटना घडताना दिसून येतील. गोमूत्र ला वैज्ञानिक तसेच अध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील महत्त्वाचे मानले गेलेले आहे. गाईपासून बनवलेली प्रत्येक गोष्ट पवित्र असते कारण की गाईला आपण पवित्र मानत असतो आणि म्हणूनच गोमूत्र देखील गाईपासूनच तयार झालेले असते वास्तुशास्त्रामध्ये गोमुत्राल एक वेगळेच महत्त्व देण्यात आलेले आहे.
जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये एखादी दिशा जर योग्य नसेल तर अशावेळी तुम्ही गोमूत्र चा वापर करून दिशादोष दूर करू शकता. जर तुम्हाला एखादे टेन्शन आलेले असेल, मानसिक ताणतणाव झालेला असेल घरातील सदस्य जर तुमच्या सोबत व्यवस्थित वागत नसेल व घरातील अन्य सदस्यांना नेहमी मानसिक तणाव जाणवत असेल तर अशावेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडून पाहणे योग्य ठरते यामुळे देखील तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन जाते आणि तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडू लागतात. आपल्या समाजामध्ये अनेक अशा वेगवेगळ्या परंपरा, रूढी आहेत यापूर्वी पार चालून आलेल्या आहेत त्यातील एक पद्धत म्हणजे घरामध्ये गोमूत्र शिंपडणे. घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते यामुळे आपले घर नेहमी टवटवीत आणि शुद्ध होते. गोमूत्र सेवन केल्याने आपल्या शरीरातील वेगवेगळे आजार देखील दूर होतात त्याचबरोबर आपण हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फळ सेवन करत असतो. या फळांवर अनेकदा रासायनिक पदार्थांचा मारा केलेला असतो, यामुळे देखील आपले शरीर बाधित होते.
अशावेळी आपले शरीर स्वच्छ व पवित्र करण्यासाठी गोमूत्र चा उपयोग तुम्ही हमखास करू शकता आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला असणारे अनेक लोक सकाळी उठल्यावर गोमूत्र प्राशन देखील करतात. जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा पाण्यामध्ये जर काही सूक्ष्म दूषित जंतू असतील तर यामुळे देखील आपल्याला पोटाचे विकार होण्याची शक्यता असते अशावेळी जर आपण गोमूत्र सेवन केले तर आपल्याला पोटासंबंधी कोणतीही विकार होत नाही तसेच आपल्या घरामध्ये जर काही सूक्ष्मजंतू असतील तर ते सूक्ष्मचंतू देखील गोमूत्र वापराने दूर होऊन जातात आणि म्हणूनच घरातील ऊर्जा देखील सकारात्मक होण्यास मदत होते. असे म्हटले जाते ज्या घरामध्ये नियमितपणे गोमूत्र शिंपडले जाते अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी नेहमी प्रवेश करते माता महालक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते आणि अशा घरांमध्ये कधीच धनाची कमतरता निर्माण होत नाही. पैसा हा नेहमी हसत खेळत राहतो आणि माता महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद त्या घरामध्ये नेहमी राहतो आणि म्हणूनच जर तुम्हाला कोणताही प्रकारच्या आर्थिक अड’चणी वारंवार सत्तावत असतील तर आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकर बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी वास्तव्य करेल.
Recent Comments