घराच्या उत्तरेकडील भिंतीवर लटकवा हे गाडी, बंगला, पैसा सर्व काही मिळेल.. फरक लगेच

ओम नमो नारायण, बाळू मामांच्या नावाने चांगभलं, गुरुदेव दत्त.. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.. मित्रांनो प्रत्येकालाच श्रीमंत होण्याची इच्छा असते धनप्राप्ती, पैसा प्राप्ती, व्हावी असे प्रत्येकालाच वाटते.. चांगले घर किंवा मोठा बंगला असावा, गाडी असावी असे प्रत्येकालाच वाटत असते…! मित्रांनो हे सर्व प्राप्त करण्यासाठी तंत्र – मंत्र शास्त्रात काही टोटके सांगितलेले आहेत,

त्यातीलच एक अत्यंत प्रभावशाली टोटका आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, खरतर हे एक यंत्र आहे, व हे यंत्र आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो आणि हे यंत्र बनवून त्याला सिद्ध करून आता प्रसिद्ध करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

यासाठी तुम्हाला फक्त पंधरा ते वीस मिनिटे लागणार आहेत. मात्र पूर्ण विश्वासाने श्रद्धेने हे यंत्र तुम्हाला तयार करायचे आहे. एक सफेद रंगाचा कागद आणि तीन झाडांची पाने त्यामध्ये पिंपळ, वड आणि औदुंबर.. औदुंबर म्हणजे उंबराचे झाड अशा तीन वृक्षांची पाने आपण घ्यायचे आहेत. सामग्री इतकीच लागते एक सफेद रंगाचा कागद या तीन वृक्षांची पाने आणि आपलं हे यंत्र तयार होईल. मित्रांनो हे यंत्र तयार होणार आहे, ते तयार झाल्यानंतर त्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या दुकानांमध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर लावू शकता.. आणि प्रत्येक सोमवारी, गुरुवारी आपण त्याला अगरबत्ती ओवाळायची आहे.

अत्यंत प्रभावशाली असे हे यंत्र आहे, या यंत्रावर भगवान श्री हरी श्री विष्णूचा महादेवांचा आणि सोबतच नवनाथांचा आशीर्वाद जोडलेला आहे…! आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात कोणी काही केलेले असेल, एखादी बाधा उत्पन्न केली असेल, तर ती नवनाथांच्या कृपेने दूर होते. कोणत्याही प्रकारचे दोष असतील भगवान शिवशंकर या सर्व दोषांचे निराकरण करण्यास समर्थ आहेत, आणि या जीवनामध्ये जे काही प्राप्त करण्याची जी सुख तुम्हाला उपभोगायचे आहे, गाडी-बंगला, पैसा-ऐश्वर्य, वैभव-धन या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी भगवान श्रीहरी यांचा आशीर्वाद या यंत्रामध्ये येणार आहे.

तर थोडक्यात आपण पूर्ण श्रद्धेने हे यंत्र तयार करायचे आहे, यासाठी सर्वोत्तम दिवस हा सोमवार मानला जातो. आता काही जण प्रश्न उपस्थित करतील की सोमवारचाच का..? हे पहा कोणताही उपाय करताना टोटका करताना कृपया विनंती आहे, प्रश्न उपस्थित करत जाऊ नका.. शंका उपस्थित करू नका.. तुम्ही आतापर्यंत हजारो प्रकारचे प्रयत्न करून पाहिले असतील मात्र तुम्हाला त्या प्रयत्नात यश येत नसेल. पण बघा छोटासा आणि सोपा उपाय करून पाहायला काय हरकत आहे..? हे तोटके करताना हे तंत्र मंत्र यंत्र सिद्ध करताना केवळ संपूर्ण आत्मबल आत्मविश्वास असणं फार महत्त्वाचे असते.

ज्या व्यक्ती अगदी पहिल्यापासून मनामध्ये शंका ठेवून अशा प्रकारचे उपाय करून पाहता त्यांना यश कधीच मिळालेले नाही व मिळणार सुद्धा नाही. तर मित्रांनो आम्ही सांगितले आहे की, सोमवारचा दिवस अत्यंत प्रभावशाली आहे. हा उपाय करण्यासाठी सोमवारी आपण स्वच्छ स्नान करा या दिवशी मांसाहाराचे सेवन करणे किंवा कोणतेही व्यसन करणे टाळायचे आहे हे कृपया लक्षात ठेवा…! मांसाहार सेवन करून हा उपाय तर करत असाल तर त्याचा काही फायदा होणार नाही. आदल्या दिवशी सुद्धा एक दोन दिवस आधी आपण मांसाहार टाळा, आपण नवनाथांचे यंत्र स्थापित करत आहात हे लक्षात ठेवा.

तर आपण स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर सफेद कपडे आपण परिधान करायचे आहेत. महिलांना हा नियम वर्ज आहे त्यांनी सफेद कपडे परिधान नाही केले तरी चालेल, पुरुषांनी शक्यतो सफेद रंगाचे कपडे घालायचे आहेत. या तीन वृक्षांची पाने घेऊन यायची आहेत आता हे सगळं करताना कुणी तुम्हाला विचारू शकतात त्यांना या तोटक्याबदल्या उपायाबद्दल सांगू नका याची वाच्यता करू नका. कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र यंत्र उपाय हे गुपचूप करायचे असतात गुप्तपणे करायचे असतात. तर या झाडाची पाने आपण घेऊन यायची आहेत, नंतर आपल्या घरामध्ये एखाद्या रूम मध्ये किंवा अगदी निवांत ठिकाणी स्थानापन्न बसायचे आहे.

ही पाने थेट जमिनीवरती न ठेवता, एखाद्या टेबलवर, पाटावर किंवा ताटामध्ये ठेवायची आहेत. नंतर खाली एक कापड अंतरा व त्याच्या खाली धूळ कचरा वगैरे नसावा याची काळजी घ्या. नंतर ही या तीन झाडाची पाने घेऊन ते प्रत्येकी तीन तीन पाने असली तरी चालतील. ती पाने व्यवस्थित कुटून घ्यायची आहेत बारीक करायची आहेत व त्यांचा रस काढायचा आहे. ही प्रत्येकी तीन तीन पाने एकत्र घेऊन त्यांचा रस काढल्यानंतर, एक सफेद रंगाचा कागद घेऊन या सफेद कागदावरती आम्ही सांगू त्या प्रमाणे एक यंत्र तुम्हाला तयार करायचे आहे …! हे यंत्र तयार करण्यासाठी प्रथम एक चौकोन म्हणजे चौरस काढा नंतर त्यामध्ये एक उभी आणि एक आडवी रेषा मारा..

म्हणजे त्या चौरस मध्ये चार चौकोन तयार होतील चौरस तयार होतील. नंतर या चार चौकोनात तुम्हाला एक एक अंक लिहायचा आहे व ते अंक असे लिहा.. पहिल्या चौकोनात 6, दुसऱ्या चौकोनात 1 नंतर तिसऱ्या चौकोनात 9 आणि शेवटच्या चौकोनात 8 या प्रमाणे अंक लिहा…! काही व्यक्ती हा उपाय घाई गडबडीत कराचा म्हणून करून टाकतात, परंतु त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही कागद कोठून आणता ते देखील महत्वाचे आहे.. म्हणून त्या कागदाची शुद्धी होण्यासाठी त्या कागदावर गौमातेचे म्हणजे गाईचे कच्चे दूध म्हणजे न तापावलेले दूध अगदी थोडेशे शिंपडायचे आहे त्या सोबत थोडे गोमूत्र देखील शिंपडावे.

नंतर त्या कागदावर या तीन झाडांच्या पानांच्या रसाने ते यंत्र काढायचे आहे. मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही तोटके करताना आम्ही तुम्हाला जे लहान सहान नियम सांगतो ते पाळणे खूप महत्वाचे आहे, नाहीतर चुकीच्या पद्धतीने केलेले काही तांत्रिक उपाय तुम्हाला अडचणीत देखील आणू शकतात. नंतर आपण ज्या कागदावर हे अंक लिहले आहेत ते चांगले वाळूद्या आणि नंतर त्या कागदाजवळ जवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा, एक धूप बत्ती किंवा अगरबत्ती लावायची आहे, व नैवेद्य म्हणून काही तरी गोडधोड दाखवायचे आहे.

हे सर्व झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्या जवळचे बोट 6 या अंकावर ठेवायचा आहे आणि ।। ओम नमः शिवाय ।। ओम नमः शिवाय ।। या मंत्राचा 108 वेळा एक माळ जप करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये जपमाळ असेल त्यावर करू शकता मात्र 108 वेळा या मंत्राचा जप करा. महिलांनी किंवा मुलींनी “।। नमः शिवाय ओम।।”, नमः शिवाय ओम ।। नमः शिवाय ओम ।। या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो अंक आहे 1.. या अंकावर पुन्हा तेच बोट, उजव्या हाताच्या अंगठ्या जवळचे बोट ठेवायचे आहे, आणि “।।ओम नमो भगवते वासुदेवाय।।” ।।ओम नमो भगवते वासुदेवाय।। या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.

त्यानंतर तिसरा अंक 9 त्यावर पुन्हा एकदा तेच बोट ठेवून “।।ओम श्री विष्णवे नमः।।” ओम श्री विष्णवे नमः।। ओम श्री विष्णू आय नमः।। या मंत्राचा जप करा. व सर्वात शेवटी जो 8 अंक आहे त्यावरती तेच बोट ठेवून “।।ओम नमो नवनाथाय नमः।।” ओम नमो नवनाथ आय नमः।। ओम नमो नवनाथ आय नमः।। मित्रांनो या मंत्रांचा जप केल्यानंतर जी आपण मिठाई किंवा गोड नैवेद्य म्हणून ठेवा. नंतर आरती ओवाळा कापुराने किंवा दिव्यांनी आरती ओवाळायची आहे त्यानंतर हे यंत्र आपण आपल्या घराच्या उत्तरेकडील भिंतीवर, एखादी फ्रेम वगैरे बनवून ते फिट करून ठेवू शकता जेणेकरून ती खराब होणार नाही.

दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण कोणत्याही गोरगरिबांना अन्नदान करायचे आहे. हे फार महत्त्वाचं आहे हा उपाय तुम्ही यापूर्वी ऐकला असेल तर तो अर्धवट आहे लक्षात ठेवा. अन्नदान करायचे आहे, एखाद्या गोरगरिबाला अन्नदान करायचे आहे. आपल्या घरातील या दिवशीची पहिली भाकरी बनवलेली किंवा चपाती असेल तर ही पहिली भाकरी किंवा चपाती गोमातेला खाऊ घालायची आहे. तुमच्या जवळपास गाई नसेल तर कोठूनही गाईला उपलब्ध करावरच लागेल, त्याला पर्याय नाही…! तुम्ही सकाळी खाऊ घाला, दुपारी घाला, हे यंत्र तयार करून झाल्यानंतर घाला, मात्र पहिली भाकरीही गायला जाईल आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबीयांच्या पोटात अन्न जाणार आहे.

नंतर ही शेवटची भाकरी उरलेली असेल ती शेवटची भाकरी आपण कुत्र्यासाठी राखून ठेवायची ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. मधल्या काळात आम्ही गाईला खाऊ घातलं तर मधल्या काळात आपण गोरगरिबांना अन्नदान करायचा आहे. शेवटची भाकरी कुत्र्यासाठी ठेवायची आहे, आणि हे यंत्र स्थापित केल्यानंतर प्रत्येक सोमवारी त्याला अगरबत्ती किंवा धूप दाखवायची आहे.

जेणेकरून ते आपण जी सिद्धी केली आहे ती सिद्ध राहील, सोमवारी आणि गुरुवारी जेव्हा जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हा ती पूजा झाल्यानंतर या यंत्रामध्ये तीन देवतांचा वास आहे हे लक्षात ठेवा…! त्यामुळे यंत्राला सुद्धा आपण हात जोडायचे आहेत. मित्रांनो सर्व काही प्राप्त करून देणारे हे यंत्र आहे. मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोवा त्यांचेही भलं होऊ द्या. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *