घरात कोणत्याही दिवशी ठेवा मीठ घरातील गरिबी दरिद्री कायमची संपेल..

नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ..

मित्रांनो कोणत्याही दिवशी घरात या ठिकाणी ठेवा फक्त एक वाटी मीठ घरातून गरिबी दरिद्री कायमची निघून जाईल. मित्रांनो तुम्ही फक्त या ठिकाणी एक वाटी मीठ ठेवा आणि हे मीठ तुम्ही जे घरात वापरत आहात स्वयंपाकामध्ये, जेवणामध्ये वापरत आहात तेच मीठ तुम्हाला एक वाटी ठेवायचे आहे. तुमच्या घरात नकारात्मकता असेल तुम्हाला असे वाटत असेल की घरात गरिबी आली आहे, पैसा टिकत नाही, यश मिळत नाही, मेहनतीचे फळ मिळत नाही, किंवा खूप पैसा तर येतो पण तो टिकून राहत नाही मग तुम्ही हा उपाय करा. मित्रांनो लोकांचे आरोग्य, तुमचे आरोग्य चांगले राहत नाही, घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहत नाही, सतत भांडणे वाद विवाद कटकटी होत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक वाटी मीठ लागेल त्यासाठी जास्त खर्च देखील येणार नाही. तर मित्रांनो कोणत्याही एका वाटीत तुम्हाला मीठ घ्यायचे आहे जर ती वाटी काचेची असेल तर तिचे शुभ परिणाम लवकर आणि जास्तवेळ तुम्ही प्रयत्न करू शकता. जर तुमच्याकडे काचेची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता, प्लॅस्टिकची वाटी घेऊ शकता जी असेल ती वाटी घेऊ शकता. पण काचेच्या वाटीला तुम्ही प्राधान्य द्या, तर तुम्ही वाटीमध्ये मीठ घेतल्यानंतर हे मीठ तुम्हाला तुमच्या घरातील स्वयंपाक घरामध्ये ठेवायचे आहे. स्वयंपाक घरात हे मीठ आशा ठिकाणी ठेवा की घरातील जो शेवटचा कोपरा असेल म्हणजे किचनच्या आशा कोपऱ्यात तुम्हाला हे मीठ ठेवायचे आहे जिथे कोणाचे लक्ष जाणार नाही, कोणाचाही हात लागणार नाही किंवा कोणी तुम्हाला विचारणार नाही की तुम्ही हे मीठ कशासाठी ठेवले आहे.

तर तुम्ही हे मीठ नक्की तुमच्या घरातमध्ये किचनमध्ये नक्की ठेवा. हे मीठ लपवून कोणत्या तरी कोपऱ्यात ठेवले तरी चालेल, मित्रांनो खास करून हे मीठ लपवूनच तुम्हाला एका कोपऱ्यात ठेवायचे आहे. हे असे कायमस्वरूपी ठेवा निदान कमीत कमी एक महिना तरी हे मीठ नक्की ठेवून बघा. व हा उपाय कोणत्याही दिवशी केलात तरी चालेल कोणत्याही वेळी केला तरी चालेल पण तुम्ही किचनमध्ये हे मीठ नक्की ठेवा तुम्हाला लगेचच फरक जाणवून येईल तुमच्या घरात सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही नांदेल घरात पैसा येईल, आणि घरातील वातावरण ऐश्वर्य संपन्न राहील. घरातील लोक एकमेकांशी मिळून मिसळून आनंदी वागतील आणि सगळे गुण्या गोविंदाने राहतील.

मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही आम्हाला हिंदूधर्म शास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवत असतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *