घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजून जा लवकरच पालटणार आहे नशीब…

अनेक लोकांसोबत अस घडत की, कपडे घालताना खिशातून अचानक पैसे पडतात, घरामध्ये आपोआप तुळस उगवते किंवा घरातील नारळ तडकतो. तस पाहायला गेलं तर या सामान्य घटना वाटतात पण ज्योतिष शास्त्राच्या शकुन अपशकुन मध्ये हे अत्यंत शुभ मानलं जातं. शकुनशास्त्र हा एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो. आजदेखील कुठेना कुठे या गोष्टींच अस्तित्व आहेच. या छोट्या घटना आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. घरात किंवा घराजवळ काही अशा घटना घडतात त्यावरून आपण स्वतः ला भविष्यासाठी तयार करू शकतो. जाणून घेऊया असे कोणते संकेत आहेत…

१. खिशातून नाणे खाली पडणे-
कपडे घालताना खिशातून नाणे खाली पडणे हा शुभ संकेत मानला जातो. यामुळे भविष्यात आपल्याला धनलाभाचे संकेत मिळतात.

२. घरातील नारळ आपोआप तडकने-
घरात एखादा नारळ ठेवलेला असेल आणि त्याला आपोआप तडा गेला तर समजून घ्यावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. आता आपल्याला जास्त अडचणी येणार नाहीत.

३. आपोआप दुर्वा उगवणे-
आपण ज्या दुर्वा गणेशजींना वाहतो, त्या जर आपोआप घरात उगवल्या तर कामात कोणताही अडथळा येणार नाही.
४. घरामध्ये मध पडणे-
घरामध्ये असलेले मधाचे भांडे पडून जर मध फरशीवर पसरला तर समजावं आता घरात नकारात्मक ऊर्जा राहिलेली नाही.

५. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे-
घरासमोरील बागेत आपोआप तुळस उगवल्यावर समजून घ्यावे की आपल्या घरात श्री विष्णू आणि लक्ष्मीचा वास आहे.
६. घरामध्ये चिमणीने घरटे बांधणे-
जेव्हा चिमणी आपल्या घरामध्ये घरटे बांधते आणि त्यात आपल्या पिल्लांना जन्म देते तेव्हा समजून जावं की घरामध्ये मंगलदायी कामे घडणार आहेत.

७. सकाळच्या वेळी मांजरीची पिल्ले दिसणे-
एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्या उठल्या जर मांजरची पिल्ले दिसली तर तो अतिशय शुभ संकेत मानला जातो. आपल्यासोबत अस घडत असेल तर समजून जावं की घरात खूप साऱ्या शुभ घटना घडणार आहेत.

८. मुंग्यांचे समूह दिसणे-
मुंग्या जितके कष्ट करतात तेवढेच कष्ट क्वचितच एखादा दुसरा प्राणी करत असेल. मुंग्यांना एकोप्याचे व समूहाचे प्रतीक मानले जाते. असाच घरात आपल्याला मुंग्यांचा समूह दिसला तर तो शुभ संकेत मानला जातो.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *