घरामध्ये सुख शांती प्रगती आणि समृद्धीसाठी करा हा एक उपाय वास्तुशास्त्र देवता होईल प्रसन्न!
मित्रांनो आपले जीवन सुखी असावे असे वाटत असते. प्रत्येकाला आपले स्वप्न पूर्ण व्हावे असे देखील वाटत असते. आपली प्रगती कशी होईल याचा प्रत्येक जण विचार करत असतो आणि वेगवेगळे उपाययोजना देखील करत असतो. आपल्यापैकी अनेक जण स्वप्न साकारण्यासाठी प्रचंड प्रमाणात मेहनत करतात परंतु आपल्याला हवे तितके यश प्राप्त होत नाही आणि अशावेळी आपण नशिबाला दोष देऊ लागतो परंतु असे अजिबात नसते. आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याकडे वेगवेगळे शास्त्र आहेत. या सर्व शास्त्रांच्या मदतीने देखील आपण आपले भाग्य उजळू शकतो त्यासाठी आपल्याला मनापासून त्या शास्त्रांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका शास्त्राबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहोत, ते शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी कोणत्या जागेवर असाव्यात कोणत्या घटनांचा परिणाम आपल्या जीवनावर काय काय होतो या सर्वांचा अभ्यास या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि आपण या वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण आपले जीवन अगदी सहज आणि सुलभ सोपे बनवू शकतो. जर तुम्हाला तुमचे जीवन प्रगतिशील बनवायचे असतील तर वास्तुशास्त्रातील काही महत्त्वाचे उपाय त्यासाठी लाभदायक ठरतात, चला तर मग आज आपण वास्तुशास्त्रातील काही महत्त्वाचे नियम जाणून घेऊया ज्यामुळे तुमचे जीवन अगदी सोपे होईल. तुमच्या जीवनामध्ये नेहमी प्रगती होईल घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागले आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही.
ज्या पद्धतीने माणसे आपल्या घरात जे मुख्य द्वार असते त्यातूनच आत मध्ये प्रवेश करते त्याच पद्धतीने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत असते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रांमध्ये अनेक वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहेत या उपायाच्या मदतीने आपण सकारात्मक ऊर्जा घरामध्ये सहजच आणू शकतो चला तर मग काही छोटे मोठे उपाय आता आपण जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये काही चिन्ह प्रतिके यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेलेला आहे त्यातील एक चिन्ह म्हणजे स्वास्तिकचे चिन्ह. स्वास्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे म्हणूनच आपल्याला हे चिन्ह घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हळदीकुंकू यांच्या मिश्रणाने काढायचे आहे, असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव मांगल्य नांदू लागते घरातील सदस्यांना चांगले आयुष्य लाभते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. स्वास्तिक हे चिन्ह माता महालक्ष्मीचे मानले असल्याने आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने माता महालक्ष्मी वास्तव्य करते.
जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर अशावेळी घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केळ्याचे झाड लावायचे आहे आणि त्या झाडाच्या बाजूला तुळशीची रोप लावायचे आहे, असे केल्याने घरातील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जातो. घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभते. घरातील सदस्यांची प्रगती दिवसेंदिवस होते. खूप दिवसापासून तुम्ही एखादी जमीन घेतलेले आहे परंतु त्या जागेवर तुम्हाला प्लॉट बांधायला काही वेळ मिळत नाही किंवा असा एखादा प्रसंग जुळून येत नसेल तर अशावेळी पुष्प नक्षत्रामध्ये आपल्याला त्या जागेवर एक डाळिंबाचे झाड लावायचे आहे, असे केल्याने त्या जागेवर लवकरच घर बांधण्याचे योग जुळून येतात आणि त्या जमिनीवर एक नवीन प्लॉट तुम्ही सहज बांधू शकता. घरामध्ये कधीच तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नका तसेच तुटलेला पलंग देखील वापरू नका, असे केल्याने आपले नशीब भंगून जाते व त्या सर्वांचा दोष आपल्या जीवनावर होतो त्याचबरोबर तुटलेल्या ताटलीत कधीच जेवण करू नका यामुळे अन्नदोष लागतो आणि आपले आरोग्य देखील खराब होते. आपल्याला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.
आपल्या घरातील स्वयंपाक घर हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जर तुमचे स्वयंपाक घर घरामध्ये योग्य दिशेला असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो परंतु जर स्वयंपाक घरी चुकीच्या दिशेला असेल तर अशावेळी आपल्याला फायर अँगल मध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला सकाळी संध्याकाळ लावायचा आहे. हा दिवा म्हणजे विजेचा दिवा आपल्याला लावायचा आहे असे केल्याने स्वयंपाक घरातील दोष नाहीसे होतात. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या देवघरांमध्ये दिवसभरातून दोन वेळा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायला हवा त्याचबरोबर दिवसभरातून तीन वेळा शंख नाद करायला हवा, असे केल्याने आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि घरामध्ये प्रवेश सकारात्मक ऊर्जा करते त्याचबरोबर संध्याकाळी घरामध्ये धूप पेटवायला हवा कापूर प्रज्वलित करायला हवा यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होऊन जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवांना फुलहार चढवत असाल तर दुसऱ्या दिवशी ते हार फुल आपल्याला काढून टाकायचे आहे तसेच देणाऱ्यांमध्ये ठेवायचे नाही यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते जे निर्माण झालेले आहे ते आपल्याला निर्माल्य कलश मध्ये टाकायचे आहेत अशा प्रकारे काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करते.
Recent Comments