चुकूनही झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नका अन्यथा भोगावे लागतील हे गंभीर परिणाम !
मित्रांनो अध्यात्म शास्त्रांमध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. या छोट्या-मोठ्या गोष्टींचे जर मनुष्याने पालन केले तर त्याचे जीवन समृद्ध बनू शकते तसेच आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना या गोष्टींच्या वापराने तुम्ही तुमचे जीवन देखील उपयुक्त बनू शकता. अनेकदा आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती झोपलेली असते आणि त्या झोपलेल्या व्यक्तीला उठवू नये किंवा त्या व्यक्तीला ओलांडू नये असे. आपल्या घरातील जेष्ठ नागरिक सांगत असतात त्यामागील कारणे देखील वेगवेगळ्या आहेत आणि या सर्व कारणांचा समावेश अध्यात्मशास्त्रांमध्ये देखील करण्यात आलेले आहेत. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाणे हे योग्य असते की अयोग्य असते? याबद्दल सांगणार आहोत याचे गंभीर परिणाम होतात की चांगले परिणाम होतात. हे देखील आम्ही तुम्हाला आजच्या लेखांमध्ये सांगणार आहोत आणि म्हणूनच आजचा लेख हा तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बहुतेक वेळा आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला अनेक सल्ले देत असतात, जसे की रात्री केस विंचरू नये.
झाडू मारू नये. नखे कापू नये. झाडांना हात लावू नये किंवा पाणी टाकू नये यामागील काहीतरी सद्भावना असते तसेच काही हेतू देखील असतो, अशावेळी आपण या अनेक गोष्टींबद्दल जाणून घेतो किंवा अनेकदा काही गोष्टींकडे दुर्लक्ष देखील करत असतो परंतु या सर्वांच्या मागे आपला एक चांगला फायदा व्हावा असा हेतू नक्कीच असतो यात कोणतीही शंका नाही. जरी यासारख्या अनेक गोष्टींच्या मागे असणाऱ्या कथा, कारणे जर आपण जाणून घेतली तर आपल्या मनामध्ये वाढ होते आणि ज्ञानामध्ये वाढ झाल्याने आपल्याला भविष्यात अनेक फायदा देखील होतो म्हणूनच आज च्या लेखांमध्ये आपण एखादी व्यक्ती जर झोपलेली असेल तर त्याला ओलांडणे चांगले असते का की वाईट असते याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. प्रत्येक गोष्टीला काही ना काही पौराणिक कथा कारणीभूत असते. या पौराणिक कथेच्या माध्यमातून देखील आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. एखादी व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा त्या व्यक्तीला ओलांडणे या घटनेचा संबंध एका पौराणिक कथेशी जोडण्यात आलेला आहे.
तसेच ही कथा महाभारतातली आहे. महाभारतातील कथेनुसार भिमाचे गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्ण यांनी बजरंग बली यांना आज्ञा दिली. अशावेळी बजरंग बली यांनी वृद्ध वानराचे भले मोठे रूप घेऊन भीमाचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. अशावेळी भीम त्या वृद्ध वानराला ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्या वृद्ध वाणराने भीमला सांगितले की मला ओलांडून न जाता मला बाजूला केले तर तू सहज रस्ता पार करू शकतो अशावेळी भीम त्या वानराला म्हणजेच वृद्ध रूप घेतलेल्या बजरंग बली यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला परंतु तसे काही घडत नव्हते त्यानंतर वृद्ध वानराने भीमाला सांगितले की तू माझी शेपूट बाजूला करून देखील जाऊ शकतो, असे केल्याने देखील भीमाला काही शक्य होत नव्हते तेव्हा भीमाला कळाले की हे वानर कोणीतरी असाधारण आहे, त्यानंतर वृद्ध वानराजे रूप घेतलेले बजरंग बली प्रत्यक्ष अवतारामध्ये प्रगटले आणि बजरंग बली यांचे रूप पाहता भीम नतमस्तक झाले. तेव्हा बजरंग बली यांना यांनी भीमाला सांगितले की, भीम प्रत्येक व्यक्ती ही समृद्ध असते आणि म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला कमी समजू नये.
प्रत्येक व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा ती शारीरिकरित्या मानसिकरित्या व अन्य गोष्टीने देखील समृद्ध असते अशावेळी त्या व्यक्तीला ओलांडणे म्हणजे तिचा अपमान करणे असे होते. या गोष्टीचा बोध घेतल्यानंतर भविष्यात भिमाने कधीच कोणत्याही व्यक्तीला ओलांडली नाही अशा प्रकारे म्हणूनच एखादी व्यक्ती जर खाली झोपलेली असेल तर तिला ओलांडत नाही. मित्रांनो आम्ही आशा करतो की तुम्हाला आता या पौराणिक कथे मागील कारण देखील कळले असेल आणि तर्क देखील समजलेले असेल आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा खाली झोपलेल्या एखाद्या व्यक्तीला ओलांडू नका कारण की प्रत्येक व्यक्ती ही श्रेष्ठ असते. त्या व्यक्तीच्या अंगी अनेक असे काही गुणधर्म असतात, जे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आणि म्हणूनच कुणाला कधीच कमी न लेखता त्या व्यक्तीला ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.
Recent Comments