चुकूनही मृत व्यक्तीच्या या तीन वस्तू वापरू नका अन्यथा जीवनात घडतील गंभीर घटना!
मित्रांनो जन्म आणि मृत्यू हे एक कालचक्र आहे, आणि या कालचक्रातून प्रत्येकाला जावे लागते. असा कोणताच व्यक्ती नाही त्याला मृत्यू आलेला नाही जी व्यक्ती जन्माला आलेली आहे ती व्यक्ती करिता कधी मरण पावणार आहे आणि म्हणूनच जन्म आणि मृत्यू हे सर्वांनाच लागू आहे. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जन्म आणि मृत्यूबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा त्या व्यक्तीच्या नंतर काय घडते, याबद्दल देखील वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेल्या आहे. एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तेव्हा ती व्यक्ती आपले शरीर तर सोडते परंतु आपला जीव लवकर काही सोडत नाही, अशावेळी त्या व्यक्तीचे मन अनेक त्याच्या गोष्टीशी निगडित राहते म्हणजेच त्याचा जीव हा अनेकदा वेगवेगळ्या घटनांमध्ये अडकून राहतो, म्हणूनच अशाच मृत्यू संदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आम्ही आज या लेखांमध्ये सांगणार आहोत.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे शरीर फक्त मृत पावते परंतु त्याचा आत्मा हा अमर असतो. आत्मा हा कधीच मरत नाही. आत्मा हा एक शरीर सोडून दुसरे शरीर स्वीकारत असतो परंतु अशावेळी त्या व्यक्तीचे कर्म अत्यंत महत्त्वाचे ठरते. जर एखाद्या व्यक्तीने कर्म चांगले केले असेल तर त्याच्या कर्मानुसार त्याला पुढच्या जन्मी योग्य ते शरीर प्राप्त होत असते, मग हे शरीर कोणतेही असू शकते. प्राणी, पक्षी किंवा मनुष्य या साऱ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असतात. आत्मा हा अमर आहे आणि म्हणूनच अमर व्यक्ती कधीच नष्ट होत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा त्याचे शरीर गेल्यानंतर त्याचा जीव काही गोष्टींमुळे अडकलेला असतो त्या त्याच्या वस्तू प्रिय असतात, अशावेळी तुम्ही जर त्या वस्तू वापरल्या तर तुम्हाला भविष्यात अड’चण सहन करावी लागू शकते म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये एखादी व्यक्तिमत पावल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी वापरायच्या नाहीत हे तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अड’चणी सहन करायला लागणार नाहीत.
एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर आपण त्याची आठवण काढत असतो आणि आठवण काढताना त्या व्यक्तीच्या अनेक आठवणी जागृत घटना गोष्टी देखील आठवणीत काढत असतो अशावेळी जर आपण एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर आपण जर त्या वस्तू वापरत असू तर त्या वस्तूच्या निमित्ताने आपल्याला त्या व्यक्तीची आठवण वारंवार येत असते ,त्याचबरोबर मृत व्यक्तीची जी काही गोष्ट असते ती गोष्ट त्याने वापरलेली असते आणि म्हणूनच त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीचा जीव देखील अटकलेला असतो म्हणजेच त्या व्यक्तीची ऊर्जा त्या वस्तूमध्ये सामावलेली असते. जर तुम्ही ती वस्तू वापरली तर तुम्हाला भविष्यात अनेक अड’चणी येऊ शकतील. तुम्ही संकटामध्ये सापडू शकतात आणि म्हणूनच त्या व्यक्तीची मृत आत्मा तुमच्या मागे देखील लागू शकते कारण की एखाद्या व्यक्तीने शरीर सोडले तर त्यानंतर ती आत्मा कोणाचेच ऐकत नाही कारण की आत्म्याला ते कळत नाही. आत्म्याला फक्त त्याची वस्तू आणि त्याची घटना लक्षात राहतात. कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध लक्षात राहत नाही. आता मृत व्यक्तीचे कपडे तुम्ही कधीच परिधान करू नका.
जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा त्याचे काही कपडे घरामध्ये उरलेले असतात अशावेळी जर तुम्ही त्या व्यक्तीचे मृत कपडे परिधान केले तर त्या व्यक्तीच्या आठवणी तुम्हाला सतावतात. त्या व्यक्ती तुम्हाला आठवू लागतात आणि परिणामी त्या व्यक्तीमुळे तुम्ही भविष्यात अड’चणीत देखील येऊ शकता. जर तुमच्याकडे मृत व्यक्तीचे कपडे असतील तर अशावेळी तुम्ही ते कपडे दान देखील करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दागिने. जर एखादी व्यक्ति मृत पावलेली आहे आणि त्या व्यक्तीचे दागिने जर घरामध्ये असतील तर अशा प्रकारचे दागिने कदापी परिधान करू नका कारण की त्या व्यक्तीने ते मृत्यूपूर्वी म्हणजे जिवंत असताना घातलेले असतात आणि दागिने घातल्याने तुम्हाला त्या व्यक्तीचा त्रास देखील होऊ शकतो. जेव्हा आपण मृत व्यक्तीचे दागिने परिधान करतो तेव्हा ती आत्मा आपल्या आजूबाजूला वास्तव्य करते आणि यामुळे तुम्हाला मानसिक ताण देखील सहन करावा लागू शकतो आणि म्हणूनच चूकून देखील मृत व्यक्तीचे दागिने परिधान करू नका, अशावेळी हे दागिने मोडून नव्याने बनवा आणि ते दागिने परिधान करा यानंतर तिसरी वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ.
मित्रांनो घड्याळ ही ऊर्जा वाहक असते आणि जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावलेली असते आणि त्यानंतर आपण तिचे जर घड्याळ परिधान करत असू तर अशावेळी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहात आहेत त्या सर्वांचे साक्षीदार ती घड्याळ असते आणि म्हणूनच या घटना तुमच्या सोबत देखील भविष्यात घडण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच शक्यतो मृत व्यक्तीची घड्याळ तुम्ही परिधान करायला नाही पाहिजे अन्यथा तुम्हाला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागतील, यामुळे तुम्हाला मानसिक अशांतता लाभू शकते कारण की मृत व्यक्तीच्या जीवनातील ज्या काही सकारात्मक आणि नकारात्मक घटना असतात त्याच घटना तुमच्या सोबत भविष्यात जुळण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच मृत व्यक्तीच्या या तीन गोष्टी कदापी परिधान करू नका अन्यथा भविष्यात तुम्हाला मानसिक ताणतणावाला सामोरे जाण्याची शक्यता असू शकते.
Recent Comments