जन्मतारखेवरून या महिन्याचे भविष्य ओळखा ही जन्मतारीख सांगून जाते खूप काही !

मित्रांनो आपल्या सर्वांना ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती आहे. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये वेगवेगळे शास्त्रांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो, त्यातील एक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. ज्योतिष शास्त्रांमध्ये ग्रह, तारे, नक्षत्र ग्रहांची स्थिती या सर्वांचा अभ्यास केला जातो पण त्याचबरोबर एखादा मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याची जी वेळ असते तारीख असते व त्याचा जो काळ असतो, या सर्वांवरून भविष्यात घडणारे अनेक बदल आपल्याला सांगता येतात. याबद्दलच्या माध्यमातून मनुष्य आपली प्रगती लवकरच करू शकतो. जेव्हा एक एखाद्या व्यक्ती जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मतारीख ही अत्यंत महत्त्वाची असते. जन्म तारखे वरूनच पुढील घटना त्याच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला जन्मतारीख वरून तुमचे राशिभविष्य कसे ओळखायचे किंवा भविष्यात नेमक्या कोणकोणत्या घटना घडणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया याबद्दल….

नोव्हेंबर महिन्यामध्ये काही ग्रह आपले राशी बदल करणार आहेत, तर काही ग्रह आपले चलन बदलणार आहेत. या बदलामुळे अनेक राशींना भविष्यात सकारात्मक बदल दिसून येणार आहेत तर काही राशींना त्याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागणार आहे. ज्या व्यक्तींचा जन्म एक, दहा, तारखेला झालेला आहे अशा व्यक्तींचा मुलांक एक असतो आणि यांचा स्वामी सूर्यग्रह असतो. नोव्हेंबर महिन्यामध्ये सूर्यग्रह वृश्चिक राशि मधून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. याबद्दल यामुळे तुमचे वैवाहिक जीवन अगदी सुखी राहणार आहे त्याचबरोबर कुटुंबामध्ये अशा काही चांगल्या घटना घडणार आहेत ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहील. घरातील सगळे सदस्य शक्यतो एकत्र राहतील आणि तुम्हाला कोणतेही काम करत असताना एकटेपणाची भावना निर्माण होणार नाही. येणाऱ्या दिवसात तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगली वागणूक मिळणार आहे. आर्थिक प्रश्न सुटणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थिती येणाऱ्या दिवसात चांगली आणि सकारात्मक बनणार आहे. ज्या व्यक्तींचा जन्म 2, 11, 20 आणि 29 या रोजी झालेला आहे त्यांचा मुलांक आहे दोन आणि यांचा स्वामी आहे चंद्र.

ह्या महिन्यामध्ये तुमचे विरोधक तुम्हाला शरण येणार आहे परंतु जास्तीत जास्त भावनिक विचार तुम्हाला करायचं नाही, यामुळे तुमचा नुकसान होऊ शकते. महिन्याच्या शेवटी अशा काही घटना घडणार आहेत ज्यामुळे तुम्हाला आश्चर्यचकित व्हायला होईल परंतु या घटना तुम्हाला भविष्यात अनेक चांगले फळ देतील. जर तुम्ही साहित्य कला क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे. ज्या व्यक्तींचा जन्म तीन 12, 21, 30 या रोजी झालेला आहे त्या व्यक्तींचा मुलांक आहे तीन आणि या मुलांकांचा स्वामी ग्रह आहे गुरु. या महिन्यामध्ये गुरु स्वतःच्या राशीमध्येच म्हणजेच मीन राशि मध्ये प्रवेश करणार आहे. जर तुमचा स्वभाव हट्टी असेल तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला काही त्रास होऊ शकतो व कामाच्या ठिकाणी अड’चणी निर्माण होऊ शकतात. तुमचे विरोधक पराभूत होणार आहेत परंतु रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचे आहे.

रागामध्ये कोणतीही गोष्ट घडणार नाही याची काळजी देखील तुम्हाला घ्यायची आहे. ज्या व्यक्ती राजकारण क्षेत्रामध्ये तसेच माध्यम क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्या व्यक्तींसाठी हा महिना काही असमाधनकारक ठरणार आहेत. त्यांचा जन्म 4, 13, 22 31 या दिवशी झालेला आहे त्या व्यक्तींचा मुलांक आहे चार आणि यांचा स्वामी ग्रह आहे राहू. तुमचे दाम्पत्य जीवन सुखी राहणार आहे. तुम्हाला अनेक चांगल्या घटना घडताना पाहायला मिळणार आहे. मनो वंचित फळ मिळणार आहे. व्यापार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी हा काळ प्रतिकूल ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही कागदावर सही करण्या अगोदर ते कागदपत्र योग्य प्रकारे पडताळून पहा अन्यथा भविष्यात कोणतीही चूक होणार नाही तसेच कोणताही मनस्ताप होणार नाही याची शक्यतो दखल घ्या. 5, 14, 23 या रोजी झालेला आहे त्यांचा मुलांक आहे पाच आणि त्यांचा स्वामीग्रह बुध आहे. या मुलांकांच्या व्यक्तीने अनावश्यक वाद टाळावेत त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीशी बोलताना योग्य ती काळजी देखील घेणे गरजेचे आहे, अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या दिवसात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे आहेत.

अचानकपणे आलेल्या मानसिक तणावामुळे तुमचे नुकसान होणार नाही याची काळजी देखील घ्यायची आहे त्यानंतर ज्या व्यक्तींचा जन्म 6, 24, 15 रोजी झालेला आहे त्या व्यक्तींचा मुलांक सहा आहे. शुक्र येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या घटना पाहायला मिळणार आहे. खूप दिवसानंतर मनासारखे घटना घडत असल्याने तुम्हाला मानसिक समाधान देखील मिळणार आहे. येणाऱ्या दिवसात मनशांती देखील मिळणार आहे. येणाऱ्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या व्यक्तींचा जन्म 7,16,25 रोजी असतो त्या व्यक्तींचा मूल्यांक सात आहे आणि या व्यक्तींचा ग्रह केतू आहे म्हणूनच या नोव्हेंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींसाठी काहीतरी शुभ घटना घडणार आहे तसेच त्यांच्यासाठी येणाऱ्या काळ हा सकारात्मक असणार आहे. तुमचा ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास आहे ती व्यक्ती तुम्हाला फसवणार आहे आणि म्हणूनच व्यवहार करताना काळजी देखील घ्यायची आहे त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला मोलाची मदत प्राप्त होणार आहे.

अनावश्यक खर्च मात्र टाळा. ज्या व्यक्तींचे लग्न ठरणार आहे अशा व्यक्तींसाठी येणारा काळ हा चांगला ठरणार आहे. ज्या व्यक्तींचा जन्म 8 17 आणि 26 रोजी झालेला आहे अशा व्यक्तींचा मुलांक आहे आठ आणि यांचा स्वामी ग्रह आहे शनी. तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे जी कामे राहिलेली होती ती लवकरच पूर्ण होणार आहे. वैवाहिक जीवन सुखी राहणार आहे. व्यापार क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या लोकांसाठी येणारा काळ हा लाभदायक ठरणार आहे तसेच नोकरदार वर्गांसाठी देखील येणारा काळ हा उपयुक्त राहील. ज्या व्यक्तींचा जन्म 9 27 आणि 18 रोजी झालेला आहे त्या व्यक्तींचा मूल्यांक आहे नऊ आणि यांचा स्वामीग्रह मंगळ आहे. येणाऱ्या दिवसात काही गोष्टी नकारात्मक घडणार आहेत तुम्हाला काही मानसिक तणाव मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मानसिक गोष्टीचा आधार घेऊनच तुमचे विरोधक तुमच्यावर वरचढ होतील आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचे भावनिक निर्णय घेऊ नका. मानसिक ताण त्यांना वाढेल अशा प्रकारचे वर्तन करू नका.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *