जर तुमच्या हातावर सुद्धा “x”निशाण आहे का…. नखावर अर्धचंद्र !! पण आहे का?
नमस्कार,
ज्योतिष शास्त्रामध्ये भविष्य पाहण्याचे काही विधी सांगण्यात आले आहे, त्यामध्ये समुद्र शास्त्र अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. या बद्दल एक कथा सुद्धा चर्चेत आहे. माता महालक्ष्मी देवी यांनी हे शास्त्र श्री विष्णू यांना ऐकवले होते आणि या शास्त्राचा प्रचार म्हणूनच विष्णू देवांनी समुद्र शास्त्राचा प्रचार करू लागले यामुळे ज्योतिष शास्त्र सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाले. आपल्या हातावरील रेषा, उंचवटे, हस्तरेषा वरील वेगवेगळे भाग या सर्व गोष्टींमुळे या शास्त्राचा विकास झालेला आहे.
समुद्र शास्त्र मध्ये शरीरावरील तिळ आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर याचे खूप महत्त्व मांडण्यात आलेले आहे. तसेच हातावरील विविध रेषा म्हणजे हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, भाग्यरेषा या रेषा व्यतिरिक्त हाता वरील विविध चिन्ह तसेच की शंख ,चक्र ,मंदिर, स्वास्तिक, पर्वत इत्यादी आणि हातावरील रंग वर्ण या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्याचा भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ एवढेच नाही तर व्यक्तीचा स्वभाव व त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज सुद्धा लावला जातो त्याचबरोबर व्यक्तीच्या बोटांची संख्या, बोटांचा आकार त्यांचे लांब असणे तसेच नखावरील वेगवेगळे चिन्ह या सर्व गोष्टींमुळे व्यक्तीचा स्वभाव बदल व भविष्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा आपल्याला मिळत असते.
म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आपल्या हातावर छोट्या-छोट्या रेषा मिळून काही विशिष्ट असे चिन्ह तयार होत असतात, त्या चिन्हांना बद्दल महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तसेच आपल्या नखांवर जे अर्धाकृती चंद्र आपल्याला पाहायला मिळते त्याचे महत्त्व काय असते? त्याचे नेमके कारण काय असते ? त्याचे परिणाम जीवनावर काय काय होत असते? या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…
सर्वात आधी आपण हातांवर ज्या रेषा असतात त्यासर्व मिळून वेगवेगळे आकार तयार होत असतात त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. ज्या व्यक्तींच्या हातावर शंख चिन्हे असतात ते निश्चित स्वरूपामध्ये धनवान बनतात. या व्यक्तींना जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता भासत नाही व त्याचबरोबर या व्यक्तींचा स्वभाव दृढनिश्चयी असतो त्याचबरोबर आपल्या हातावर मासेचे चिन्ह असले तर तेसुद्धा ऐश्वर्य चे प्रतीक मानले जाते. काही लोकांच्या हातावर असे चिन्ह लहानपणापासून असते तर काही लोकांच्या हातावर हे चिन्ह अर्थ आयुष्य व्यतीत केल्यानंतर पाहायला मिळते परंतु जेव्हा हे चिन्ह आपल्या हातावर निर्माण होते तेव्हा पासून तुमचे जीवन ऐश्वर्यात सुखी समाधान यामध्ये व्यथित होऊ लागते.
ज्या व्यक्तींच्या हातावर मंदिर चिन्ह पाहायला मिळते अशा व्यक्तींना समाजामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त होत असते. अशा प्रकारच्या व्यक्ती एका ठिकाणी बसलेली असली तरी आजूबाजूला काय घडते आहे याची संपूर्ण माहिती त्यांना असते. जेव्हा एखादी व्यक्ती अडचणीमध्ये असते तेव्हा ती व्यक्ती अशा प्रकारच्या व्यक्तींकडे सल्ला घेण्यासाठी आवश्य जाते, अशा प्रकारच्या व्यक्ती ज्ञानी तर असतातच पण त्याचबरोबर मार्गदर्शक सुद्धा असतात.
ज्या व्यक्तींच्या हातावर त्रिशूल व स्वास्तिक चिन्ह पाहायला मिळते अशा प्रकारची व्यक्ती सात्विक देवपुजा व अध्यात्मिक जीवनामध्ये रस घेणाऱ्या असतात, अशा प्रकारच्या व्यक्तींचा स्वभाव खूपच चांगला असतो आणि अशा प्रकारच्या व्यक्ती सर्वांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे येत असत. ज्या व्यक्तींच्या हातावर भाला, त्रिशूल यासारखे चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारच्या व्यक्ती वीर आणि साहसी स्वभावाचे असतात प्रत्येक परिस्थितीमध्ये साहसी गुण त्यांच्या अंगी भिनलेला असतो आणि कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आता आपण आपल्या हातावरील वेगवेगळे जे पर्वत असतात त्या पर्वतं बद्दल आपण जाणून घेऊया. तसे पाहायला गेले तर आपल्या हस्तरेषा आपले जन्मकुंडलीतील ग्रह मजबूत असतात ,त्या ग्रहांच्या परिस्थितीनुसार आपल्या हातावर पर्वत निर्मिती होत असते आणि जे ग्रह सध्याच्या परिस्थितीमध्ये मजबूत असतात त्या हातावरील ठिकाणावर आपल्या बोटाचे आकार सुद्धा लांब होऊन जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या बोटांची उंची जर लांब असेल तर त्याच्या हातावरील रवी ग्रहाचा पर्वत सुद्धा उंच असतो. अशा प्रकारच्या व्यक्ती प्रसिद्ध आणि गुणवान असतो.
ज्या व्यक्तींच्या हातावर शनी पर्वत उंच असतो अशा प्रकारच्या व्यक्ती न्यायी शिस्त बद्ध असतात. जर तुमच्या हातावर गुरु पर्वत उंच असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तीला राजकारणामध्ये, शिक्षणामध्ये व नोकरीच्या ठिकाणी यश प्राप्त होते व या क्षेत्रांमध्ये सफलता नेहमी त्यांच्या जीवनामध्ये येत असते. ज्या व्यक्तीच्या हातावरील शुक्र पर्वत उंच असतो अशाप्रकारच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संगीत, कला खूप मोठ्या प्रमाणावर बहरत असते अशा प्रकारच्या व्यक्ती कला क्षेत्रामध्ये मोठी प्रगती करत असतात. बुध ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्ती बौद्धिक क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात. मंगळाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्ती प्रशासकीय सेवेमध्ये जास्त कार्यरत होताना आपल्याला पाहायला मिळतात.
चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या नखांवर जे अर्धाकृती चंद्र असतो त्या चंद्राचा नेमका अर्थ काय असतो त्याबद्दल. आपल्या नखावर अशा प्रकारचे आकार प्रत्येक बोटावर पाहायला मिळत नाही म्हणून प्रत्येक बोटानुसार त्याचा अर्थ सुद्धा वेगवेगळा असतो. ज्योतिष शास्त्रानुसार आपल्या बोटांवर पांढऱ्या रंगाचे अर्धाकृती आकार असतो तो अत्यंत शुभ मानला जातो. तुमच्या अनामिका बोटावर जर पांढरा रंगाचे अर्धाकृती चंद्र तयार झालेले असेल तर त्या व्यक्तीला समाजामध्ये खूपच मानसन्मान मिळतो. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळते आणि त्याचबरोबर मोठे पुरस्कार सुद्धा प्राप्त होण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तीच्या मध्यमा बोटावर पांढ-या रंगाचे चंद्राकृती आकार तयार होते अशा प्रकारची व्यक्ती व्यापार क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रगती करत असते. विशेष करून कारखाना संदर्भातील कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त होत असते.हे बोट शनीचे बोट मानले जाते. ज्या व्यक्तीच्या तर्जनी बोटावर पांढरा आकाराचे चंद्र तयार होते त्यावेळी भरपूर प्रमाणावर धन प्राप्त होत असते. ज्या व्यक्तीच्या आणि त्याच्या बोटावर अर्धाकृती चंद्र तयार होत असते अशा प्रकारच्या व्यक्ती भविष्यामध्ये लीडर बनण्याची क्षमता ठेवत असतात अशा प्रकारचे लोक भविष्यामध्ये चांगले वक्ता होतात आणि लोकांना मार्गदर्शन करत असतात.
ज्या व्यक्तींचा हातावरसर्वात छोटे जे बोट असते त्या बोटावर जर पांढऱ्या आकाराचे चंद्राकृती चिन्ह असते अशा व्यक्ती खूपच साहसी मानले जाते. कोणतीही परिस्थिती जरी आली तरी त्या परिस्थितीवर मात करत असतात अशा प्रकारे आज आपण या लेखामध्ये आपल्या हातावर वेगवेगळ्या चिन्ह तसेच नखावरचे अर्धाकृती चिन्ह तयार होत असते त्या बद्दल महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे ,लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Recent Comments