जर तुम्ही देखील रोज आंघोळ करत नसेल तर जाणून घ्या की एक माहिती भविष्यात कधीच अशी चूक करणार नाही!
मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात, यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळ. अंघोळ ही दैनंदिन जीवन जगत असताना एक महत्त्वाची विधी मानली जाते. आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्यावर आंघोळ आवर्जून करत असतात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने विचारले तर तू रोज आंघोळ करतो का? अशावेळी आपण त्या व्यक्तीकडे संशयित नजरेने पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो हा व्यक्ती वेडा आहे का? आपल्याला असा प्रश्न विचारत आहे.. अगदी बरोबर.. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येतो परंतु मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे देखील लोक आहेत जे रोज आंघोळ करतात, त्याचबरोबर असे देखील काही लोक आहेत ज्यांना आंघोळ करायला कंटाळा येत असतो. काही जणांना सकाळी उठल्यावर आंघोळ करायला आवडत नाही. काहीजण दुपारी आंघोळ करतात तर काहीजण सकाळी आंघोळ करतात. जर शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेले तर सकाळी लवकर आंघोळ केल्याने आपले शरीर निरोगी राहते व मन देखील प्रसन्न राहते.
आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना सकाळी आंघोळ करायला कंटाळा येतो आणि म्हणून हे लोक कधीही दिवसभरातून आंघोळ करत असतात परंतु असे करणे योग्य आहे का? आंघोळ करण्याची योग्य वेळ नेमकी कोणती आहे? अंघोळ करण्याचे नेमके कोणकोणते फायदे आपल्या शरीराला होत असतात? आंघोळ करण्याचे प्रकार कोणते आहेत आज यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत, यामुळे तुम्हाला भविष्यात आंघोळ करण्याचे फायदे देखील कळणार आहे आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आंघोळ करणार करत असाल तर त्यामध्ये सुधारणा करण्याची संधी देखील तुम्हाला या लेखामुळे मिळणार आहे. मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला जातो, त्यातील एक शास्त्र म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराणांमध्ये अनेक अशा काही महत्त्वाच्या माहिती सांगण्यात आलेल्या आहे जर मनुष्याने या माहितीचे पालन केले तर मनुष्याचे जीवन अगदी समृद्ध बनू शकते.
जर आपण गरुड पुराणांमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला भविष्यात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकते. जी व्यक्ती सकाळी लवकर उठते म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर उठते त्या व्यक्तीला जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त होतात, असे ब्रह्म म्हणजेच गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेले आहे म्हणूनच सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र जलाने अंघोळ करायला हवे. असे केल्याने आपले मन पवित्र होते व शरीरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करू लागते तसेच गरुड पुराणांमध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती रात्री झोपतो तेव्हा त्याचे शरीर शांत असते आणि अशावेळी शरीरातून घाम तोंडातून लाळ तसेच अशुद्ध गोष्टी बाहेर पडत असते, अशावेळी जर सकाळी आपण आंघोळ केली आणि धार्मिक कार्य करण्याआधी आपण स्नान केले तर आपले शरीर शुद्ध होते मन पवित्र होते आणि यामुळे अनेक अपवित्र गोष्टींपासून आपले शरीर मुक्त होते.
म्हणूनच शरीराची अपवित्रता व अशुद्धता जर आपल्याला काढून टाकायचे असेल तर अंघोळ करणे अत्यंत गरजेचे आहे. गरुड पुराणा मध्ये असे देखील म्हटले गेले आहे की, जी व्यक्ती आंघोळ न करता एखादी धार्मिक कार्य करते त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक अड’चणी निर्माण होतात व ती व्यक्ती पापकर्मास कारणीभूत ठरते आणि म्हणूनच चुकून देखील आंघोळ केल्याशिवाय कोणताही प्रकारचे धार्मिक कार्य करू नका जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अड’चणी निर्माण होणार नाही. जर एखादी व्यक्ती सकाळी आंघोळ केल्यानंतर एखादे कार्यकरते तेव्हा ते कार्य पूर्ण होत नाही याचाच अर्थ जी व्यक्ती सकाळी लवकर उठून आंघोळ करत नाही त्या व्यक्तीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा वास्तव्य करत असते. नकारात्मक ऊर्जेच्या वलयामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक घटना नकारात्मक घडू लागतात आणि म्हणूनच जी व्यक्ती सकाळी उठल्यावर आंघोळ न करता बाहेर कोणत्याही प्रकारचे कार्य करते त्या व्यक्तीचे कार्य पूर्ण होत नाही.
Recent Comments