जेवण झाल्यावर ताटामध्ये धुऊ नका हात घडतील अशुभघटना !
मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुणे अशुभ का मानले जाते त्यामध्ये नेमके कारण काय आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की, मानवाच्या काही मूलभूत गरजा आहे त्यातील एक महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. अन्न मिळवण्यासाठी मनुष्य दिवस रात्र मेहनत करत असतो. दोन वेळेचे जेवण व्यवस्थित मिळावे यासाठी तो प्रामाणिकपणे मेहनत करत असतो आणि म्हणूनच अन्न कमावण्यासाठी व पिकवण्यासाठी शेतकरी देखील जीवाचे रान करत असतो, तेव्हा आपल्या ताटामध्ये दोन वेळेचे अन्न मिळत असते. जर शेतकऱ्यांनी अन्नच पिकवले नाही तर आपल्याला अन्य देखील मिळणार नाही परंतु तंत्र मंत्र शास्त्रामध्ये अन्नाचे काही महत्त्व सांगण्यात आलेले आहे. आपल्यापैकी अनेक जण कमी जेवतात व जास्त प्रमाणात अन्न फेकत असतात, असे करणे चुकीचे आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुणे हे योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दल देखील महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.
जर तुम्हाला देखील जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुण्याची सवय असेल किंवा तुमच्या घरातील इतर सदस्य जेवण झाल्यावर ताटामध्ये हात दुखत असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे असे करणे भविष्यात चांगले ठरते की वाईट ठरते याबद्दल देखील आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक संस्कार सांगितले आहेत. 16 संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे अन्नग्रहण करणे. जन्माला बाळ आल्यानंतर चार ते पाच महिन्यानंतर मुलावर अन्नग्रहण संस्कार पार पडले जातात आणि त्यानंतरच पुढील आयुष्य तो मुलगा अन्न सेवन करण्यास पात्र ठरत असतो. अनेकजण जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुतात ते दिसायला देखील चुकीचे ठरते. जेवण झाल्यावर आपण ताट उचलून मग बेसिन मध्ये गेल्यावर हात धुतले तर काही वाटत नाही परंतु जर आपण सगळ्यांसमोर जेवणामध्ये हात घेतले तर ते दिसायला देखील चुकीचे ठरते. जर आपण चुकीच्या गोष्टी योग्य वेळेस सुधारल्या तर भविष्यात त्याचा उपयोग परिणाम आपल्यावर होणार नाही.
तसे पाहायला गेले तर अन्न सेवन केल्याने आपल्याला ऊर्जा मिळते ही ऊर्जा आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगली मानली जाते आणि म्हणूनच या ऊर्जेला माता महालक्ष्मीचे स्वरूप देखील समजले गेलेले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि म्हणूनच या पूर्ण ब्रह्मातून निर्माण झालेली चैतन्य ऊर्जा आपल्या शरीरासाठी लाभदायक ठरते. जर तुम्ही जेवण झाल्यावर ताटामध्ये खरकट्या हाताने हात धुवत असाल तर असं करणे म्हणजे माता अन्नपूर्णाचा अपमान समजला जातो. माता अन्नपूर्णाचा अपमान होतो त्या ठिकाणी प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या माता महालक्ष्मीचा देखील अपमान होत असतो आणि म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य अड’चणी निर्माण होऊ लागतात. तुमच्या जीवनातील पैसा खर्च होऊ लागतो. म्हणून शक्यतो जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुणे ही योग्य गोष्ट नाही. यामध्ये शास्त्र देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे की जेवण हे यज्ञ आहे आणि अन्न हे आहूती आहे आणि म्हणूनच “अन्न हे पूर्णब्रह्म उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म” हे स्तोत्र आपण जेवण करण्यापूर्वी म्हणत असतो याचा अर्थ आपण अन्न हे पोट भरण्यासाठी करत नाही तर आपल्या शरीरामध्ये जी अग्नी निर्माण झालेली आहे त्या अग्नीला शांत करण्यासाठी म्हणजेच ऊर्जा प्राप्त करण्यासाठी अन्न सेवन करत असतो. म्हणूनच जेवण झाल्यानंतर अनेकदा आपण थोडेसे पाणी पिऊन अग्निशांत करत असतो अनेक ठिकाणी थोडेसे हातामध्ये पाणी घेऊन आचमान देखील केली जाते आणि नमस्कार देखील केला जातो जर तुम्हाला शास्त्रक्ता माहिती असेल तर तुम्ही या गोष्टीचे पालन करू शकता अन्यथा त्याचा विपरीत परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. त्याचबरोबर अन्न सेवन करताना काही छोट्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे जेवण करण्यापूर्वी व जेवण झाल्यानंतर परमेश्वराचे आभार मानायला हवे आपल्याला गरज असेल तितकच अन्न सेवन करायला हवे जास्त अन्न वाया घालू नका कारण की अन्न वाया घातल्याने आपल्यावर देवी देवतांचा कोप होतो. ताटामध्ये जेवण उरलेले असेल तर ते फेकून न देता चिमणी कावळे यांना द्या. जेवण करताना नेहमी आसन घेऊन बसा.
Recent Comments