तुमची हरवलेली वस्तू अशा प्रकारे शोधा, जाणून घ्या वस्तू शोधण्याचे रहस्य !

मित्रांनो दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेकदा घाईगडबडीत असतो. घाईगडबडीत आपण एखादी वस्तू कुठेतरी ठेवून देतो आणि नंतर ते आठवत नाही, यालाच आपण वस्तू हरवले आहे असे देखील म्हणतो. जर तुमची देखील वस्तू वारंवार हरवत असेल तर आजचा लेख हा तुमच्यासाठीच आहे. हा लेख तुम्हाला पूर्णपणे वाचायचा आहे. आजच्या लेखांमध्ये आम्ही हरवलेली वस्तू नेमकी कशी शोधायची आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तसेच हरवलेल्या वस्तु मागील नेमकी रहस्य काय असते हे देखील तुम्हाला सांगणार आहोत. जर आपली एखादी मौल्यवान किंवा साधी वस्तू हरवली तर आपण विचार करत बैचेन होऊन जातो. ती वस्तू सापडेपर्यंत आपल्याला धीर काही राहत नाहीत.

आपण घरातील एकेक कोपरा शोधत राहतो त्याचबरोबर ती वस्तू कुठे ठेवली होती याचे आचरण देखील करत असतो आणि म्हणूनच संपूर्ण वेळ आपण ती वस्तू शोधण्यासाठी घालवत असतो. आपल्याकडे वेगवेगळे शास्त्र प्रचलित आहेत, अशाच एका शास्त्राच्या मदतीने आज आपण हरवलेली वस्तू शोधणार आहोत. हो, मित्रांनो तुम्हाला सर्वांना अंकशास्त्र माहिती असेल. अंकशास्त्राच्या आधारे तुम्ही तुमच्या घरातील हरवलेली वस्तू सहजरीत्या शोधू शकता. आता आपल्याला हरवलेली वस्तू शोधण्यासाठी अंकशास्त्रची मदत घेऊन आपल्या ती वस्तू शोधायची आहे त्यासाठी आपल्याला एक ते 108 पर्यंतचे अंक विचारात घ्यायचे आहेत आणि त्यांच्यातील एक संख्या मनामध्ये धरायचे आहे आणि त्यानंतर एक संख्या मनामध्ये धरली नंतर त्या संख्येला नऊ ने आपल्याला विभाजित करायचे आहे म्हणजेच नऊ ने भागायचे आहे.

भागाकार केल्यानंतर जे उत्तर तुम्हाला मिळणार आहे त्या अंकामुळे तुम्हाला तुमची वस्तू कुठे ठेवली गेलेली आहे याचा शोध सांगू शकते. जर समजा तुम्हाला मिळालेले उत्तर एक असेल तर याचा अर्थ हा अंक सूर्याचा आहे आणि सूर्याची बाजू ही पूर्व आहे. म्हणजेच तुमची जी वस्तू हरवलेली आहे ती वस्तू तुम्हाला पूर्व दिशेला सापडेल, अशी ही दिशा व अंक दर्शवतो. जर उरलेली वस्तू अंक दोन असेल तर याचा अर्थ हा अंक चंद्र प्रत्येक दर्शवतो आणि म्हणजेच ती हरवलेली वस्तू एखाद्या स्त्रीकडे असू शकते. जर भागाकार केल्यानंतर उरलेली संख्या तीन असेल तर याचा अर्थ ही गुरूचा क्रमांक आहे आणि ही वस्तू तुमच्या मित्रांकडे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडे सापडलेली असू शकते. जर भागाकार केल्यानंतर आलेला अंक चार असेल तर हा चार अंक राहू चा असतो.

आणि म्हणजेच तुमच्या निष्काळीचे मुळे ती वस्तू हरवलेली आहे असे सूचित होते आणि म्हणूनच ही वस्तू शोधण्यात वेळ व्यर्थ घालणे योग्य नाही. जर आलेला अंक पाच असेल तर हा पाच अंक बुध ग्रहाचा आहे आणि म्हणूनच हरवलेले वस्तू शोधायला तुम्हाला वेळ लागेल परंतु ती वस्तू हमखास सापडेल जर भागाकार केल्यानंतर आलेली संख्या सहा असेल तर सहा अंक शुक्राचा आहे आणि याचा अर्थ तुम्ही तुमची वस्तू स्वतःहून कोणाला तरी दिलेली आहे आणि ती वस्तू आता तुम्हाला आठवत नाही तुम्ही ती विसरून गेलेला आहात. जर भागाकार केल्यानंतर आलेली संख्या सात असेल तर ती संख्या केतूची आहे आणि हरवलेली वस्तू मिळण्याची दाट शक्यता आहे. जर उरलेले संख्या नऊ किंवा शून्य असेल तर अंक मंगळाचा आहे आणि म्हणूनच अंकशास्त्रानुसार जर वस्तू मिळाली तर तुम्हाला मिळू शकते अन्यथा ती वस्तू कायमची हरवली आहे असे समजू शकता.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *