दत्त जयंतीला अशाप्रकारे करा पूजा, नैवेद्य आणि पारायण… श्री गुरुदत्त यांचा आशीर्वाद करेल सर्व संकटातून मुक्ती !

मित्रांनो 30 नोव्हेंबर पासून गुरुदत्त नवरात्र सुरू झालेली आहे आणि सात डिसेंबरला श्री दत्त जयंती आहे. या सप्ताहामध्ये प्रत्येक जण गुरुचरित्र म्हणजेच या अध्यायाचे पारायण करत असतात. श्री गुरु चरित्र मध्ये गुरुदत्त यांची लिहिला सांगण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना श्री गुरुदेव दत्त माहिती आहेत. श्री गुरुदेव दत्त म्हणजे ब्रह्म, विष्णू, आणि महेश यांचे रूप आहे. या तिघांची शक्ती गुरुदत्तांच्या रूपाने पृथ्वीतलावावर वास्तव्य करत आहे. जी व्यक्ती श्री गुरुदेव दत्तांना मनापासून शरण जाते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होत असतो आणि गुरुदेव दत्त प्रत्येक भक्ताच्या संकटांना धावून जातात. आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव आणतात म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये येणाऱ्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला श्री गुरुदेव दत्ताची पूजा कशी करायची आहे ? नैवेद्य नेमका काय काय दाखवायचा आहे तसेच गुरुचरित्राचे पारायण आपल्याला कशाप्रकारे करायचे आहे याबद्दल सांगणार आहोत.

जर तुम्ही आजच्या लेखांमध्ये सांगितलेली माहिती जर प्रत्यक्ष जीवनामध्ये वापरली तर तुम्हाला नक्कीच श्री गुरुदेव दत्त चा आशीर्वाद मिळेल. आपल्यापैकी अनेकांनी श्री गुरुदेव दत्ताची मूर्ती किंवा फोटो पाहिलेला असेल. या फोटोमध्ये गुरु दत्तांच्या पाठी गाय आहे, ती गाय कामधेनू गाय आहे. ती मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते तसेच श्री गुरुदेव दत्त हे त्रिमुखी आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये ब्रह्म, विष्णू, महेश यांचा साक्षात अवतार असलेले श्री दत्ता आपल्याला दिसतात तसेच श्री गुरुदेव दत्त यांच्या हातामध्ये वेगवेगळे अस्र देखील आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये एका हातामध्ये कमांडलु, दुसऱ्या हातामध्ये त्रिशूल तिसऱ्या अन्य हातामध्ये डमरू एका हातामध्ये एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये सुदर्शन चक्र अशा प्रकारचे वेगवेगळे आयुध शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे मुख्य नेहमी प्रसन्न असते कारण की श्री गुरुदेव यांच्या चेहऱ्यावर जी ऊर्जा आहे ती अवर्णनीय आहे तसेच श्री गुरुदेव दत्त हे ब्रह्मचारी आहे आणि म्हणूनच श्री गुरुदेव दत्त आपल्याला भगवे वस्त्र परिधान केलेले अनेकदा पाहायला मिळतात व अशा अनेक प्रतिमा आपण त्यांच्या पाहत असतो.

श्री गुरुदेव तृणात्मक म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश यांच्या ऊर्जेचे प्रतीक आहे आणि जी व्यक्ती त्यांना शरण जाते त्यांची पूजा करते त्या व्यक्तीची सारी चिंता हरली जाते आणि म्हणूनच श्री गुरुचरित्रामध्ये श्री गुरुदेव दत्ताचे अनेक उपासना करण्याचे मार्ग सांगण्यात आलेले आहे. दत्त नवरात्र मध्ये श्री गुरुदेव दत्ताची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा अर्चना केली जाते या नऊ दिवसांमध्ये श्री गुरुदेव दत्त यांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो तसेच नव दिवस नव घरी भिक्षा मागितली जाते आणि या भिक्षेतून मिळालेले अन्न श्री गुरुदेव दत्त यांना नैवेद्य म्हणून बनवले जाते. दत्त नवरात्र मध्ये नऊ दिवस गुरुचरित्राचे पारायण देखील केले जाते व त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी दत्ताच्या मूर्तीवर अभिषेक करून दोन्ही वेळेस उपवास देखील ठेवला जातो. दत्त जन्माचे किर्तन ऐकले जाते दत्त चरित्र ऐकवले जाते त्याचबरोबर सुंठ्याचा प्रसाद हा भक्तांना वाटला जातो. अनेक ठिकाणी दत्त बावनी व दत्ताचा झरा हा वाचला जातो आणि दत्तांना प्रसन्न केले जाते. त्यानंतर दत्ताचा पाळणा म्हटला जातो व आरती करून मंत्रपुष्पांजली देखील म्हटली जाते.

दत्त पूजा झाल्यावर ज्येष्ठ मंडळी व भगिनी दत्तमूर्तीची नजर देखील काढतात. अनेकजण गुरु भक्ती मध्ये इतके बुडून जातात की त्या व्यक्तींना काही दिसत नाही तसेच गुरुचरित्राचा महिमा इतका अपार आहे की भक्तांना पावलंपावली प्रचिती येत असते. गुरुचरित्रामुळे भक्त कोण आणि गुरुकुल यांच्यातील नाते एक साम्य होऊन जाते आणि म्हणूनच जो व्यक्ती श्री गुरुदेव दत्त यांना शरण जातो त्याच्या जीवनातील सर्व अड’चणी लवकरच नष्ट होतात. गुरुचरित्राचे पारायण केल्याने मनुष्याला मुक्ती मिळते मोक्ष मिळतो तसेच गतजन्मी सेव या जन्मीचे जे काही पाप आहे ते पूर्णपणे नष्ट होऊन जाते. मानवी जीवनाचा जो हेतू असतो, तो साध्य होऊन जातो तसेच भविष्यात त्याला अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. दत्त नवरात्र मध्ये साधारणपणे शूर देवदत्त यांचा मंत्र जप करायला हवा व त्याचबरोबर नऊ दिवसांमध्ये श्री गुरुदेव दत्त यांचे वेगवेगळे मंत्र जप देखील करायला हवे असे केल्याने आपल्याला मनशांती तर मिळते पण त्याचबरोबर गुरुजपाचा फायदा देखील मिळतो व याचे पुण्य देखील प्राप्त होते.

श्री गुरुदेव दत्त पूजा करत असताना आपल्याला आहार देखील सकस ठेवायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. गुरु पूजा पालन करत असताना व गुरुची पूजा करत असताना कोणतेही पवित्र अभंग होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायचे आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला कोणाशीच वाद घालायचा नाही जितके मन तुमचे निर्मळ आणि स्वच्छ राहील तितकेच तुम्ही परमेश्वराचा जवळ पोहोचतात आणि परमेश्वरांचा आशीर्वाद देखील तुम्हाला लागतो तसेच गुरुदत्तांना नैवेद्य अर्पण करत असताना घेवड्याची भाजी व अन्य पदार्थ अवश्य द्या. तुम्ही तुमच्या कृतीनुसार व इच्छेनुसार श्री गुरुदेव दत्त यांना कोणतेही पदार्थ नैवेद्य म्हणून देऊ शकता अशा प्रकारे गुरुदत्त जयंतीची माहिती तुम्हाला प्राप्त करून घेतल्यावर नक्कीच भविष्यात लाभ होऊ शकतो व म्हणून येणाऱ्या दत्त जयंतीला अगदी मनापासून श्री गुरुदेव दत्त यांना शरण जा व आपल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करून घ्या.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *