दसऱ्याला १०० वर्षानंतर बनत आहे हा महायोग, हा मंत्र बनवेल रोडपतीला करोडपती..

कुठलेही नवीन कार्य सुरु करण्याच्या आधी शुभ मुहूर्त बघितला जातो,जसे की घर विकत घेणे असो, नवीन घराचे वास्तु असो किंवा एखादी नवीन गाडी किंवा मौल्यवान वस्तु विकत घेणे असो. असाच काहीसा शुभ मुहूर्त उद्याला येत आहे.

उद्या १५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दसरा हा मुहूर्त नसलेला मुहूर्त आहे, म्हणजे यादिवशी आपण दिवसभरात कधीही नवीन कार्याची सुरुवात करु शकतो. दसऱ्याच्या दिवशी सहसा मुहूर्त काढला जात नाही. हा दिवस पंचांगशास्त्रानुसार अतिशय शुभ दिवस मानला जातो. यादिवशी केलेली कामे १००% सफल होतात. त्यामुळे नवीन घराचे वास्तु, नवीन गाडी विकत घेणे किंवा एखादे नवीन कार्य सुरु करण्यासाठी दसरा हा दिवस प्रामुख्याने निवडला जातो.

परंतू विजयादशमीच्या दिवशी मध्ये अजुन एक शुभ मुहूर्त असतो. या मुहूर्ताचे नाव विजय मुहूर्त असे आहे, हा मुहूर्त संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर आणि तारे उगवतांना असतो. यामध्ये जर आपण या एक मंत्राचा जप केला तर आपल्याला आध्यात्मिक, दैविक आणि लौकिक शक्ती प्राप्त होईल.

या मुहूर्ताला हाती घेतलेली कामे नक्कीच पूर्ण होतात. त्यामुळेच या मुहूर्ताला विजय मुहूर्त असे म्हणतात. या मुहूर्ताच्या वेळी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र आहे :- “ॐ अपराजिताय नमः, ॐ अपराजिताय नमः” या मंत्राचा आपल्याला १०८ वेळा जप करायचा आहे.

या मंत्राचा जप झाल्यावर आपल्याला हनुमान चालीसा मधील एका चौपाई चा जप करायचा आहे :-
पवन तनय बल पवन समाना।
बुद्धी बिबेक बिग्यान निधाना।।
कवन सो काज कठीन जग माहीं।
जो नहिं होई तात तुम पाहीं।।

या चौपाई च देखील १०८ वेळा जप करायचे आहे.

आश्विनस्य सिते पक्षे दशम्यां तारकोदये ।
स कालो विजयो ज्ञेयः सर्वकार्यार्थसिद्धयः।।

अर्थात :- अश्विन शुक्ल पक्षात दशमी च्या दिवशी सायंकाळी तारे उगवतांना विजय मुहूर्त असतो,या मुहूर्त मध्ये केलेले कोणतेही काम पूर्णत्वास जातात.
या मंत्राचा देखील जप करावा.

बरेच लोक दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी फिरायला बाहेर जातात, परंतु जर आपण देखील बाहेर जाणार असाल तर आम्ही सांगितलेले या तिन्ही मंत्राचा जप करूनच बाहेर पडावे. हा योग पुन्हा पुन्हा येत नाही.त्यामुळे त्याचा शक्य असेल तेवढा फायदा घ्यावा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *