दारात कोहळा बांधण्याचा हा आहे परिणाम, जाणून घ्या नक्की कोहळा कुठे बांधावा ?
मानवी जीवनामध्ये उत्कर्ष आणि प्रगती होण्यासाठी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो. काही उपाय जर आपण केले तर त्या उपायामुळे आपल्या जीवनात खूप सारे प्रगती होत असते आणि मनुष्य जीवन लवकरच सुखी होत असते. प्राचीन काळापासून मनुष्य आपले जीवन सुकर समृद्ध बनवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा उपयोग करत आलेला आहे. या वस्तू अनेकदा आपण अंगणामध्ये देखील बांधत असतो. या वस्तूच्या उपयोगाने आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न देखील करत असतो आणि म्हणूनच आपले घर सुख शांती वैभव आणि भरलेले असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशीच एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. आपल्यापैकी अनेक जण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ एक फळ लावतात. या फळाला अध्यात्म शास्त्रांमध्ये तसेच तंत्र मं’त्र शास्त्रामध्ये खूप महत्त्व देण्यात आलेले आहे, हे फळ नेमके कोणते आहे याबद्दल चला तर मग जाणून घेऊया…
आतापर्यंत आपल्यापैकी अनेकांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक कोहळा पाहिलेला असेल. हा कोहळा एक वनस्पती फळ आहे. प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये अहूती देण्यासाठी केला जात असे. असे म्हटले जाते की या कोहळ्याच्या उपयोगाने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करते. जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला न’जर लागलेली असेल, एखादी व्यक्ती आ’जारी पडत असेल, व्यवसाय उद्योगधंदा ठप्प झालेला असेल तर अशावेळी कोहळ्याच्या मदतीने आपण सगळी नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर करू शकतो अशी मान्यता आहे. म्हणूनच आपल्यापैकी अनेक जण घरांचा बाहेर व दुकानाच्या प्रवेशद्वारा जवळ हा कोहळा लावत असतात. कोहळा लावण्याची एक पद्धत आहे. एक रीत आहे आणि म्हणूनच या पद्धतीचा प्रत्येकाने अवश्य वापर करायला पाहिजे. जेव्हा आपण कोहळा विकत घेतो तेव्हा हा कोहळा देठ असलेला असावा. हा कोहळा घरी आणल्यावर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि त्यानंतर देवा समोर एक पाट मांडायचा आहे त्यावर एक वस्त्र ठेवायचे आहे आणि मगच कोहळा ठेवायचा आहे. कोहळ्याच्या एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूला स्वास्तिक काढायचा आहे. ओम काढण्यासाठी आपल्याला अष्टगंधाचा वापर करायचा आहे आणि स्वस्तिक हे आपल्याला कुंकवाच्या मदतीने काढायचे आहे.
त्यानंतर आपल्याला कोहळ्याच्या देठापासून ते खाली पर्यंत एक काजळाने उभी रेष मारायची आहे. आता हा कोहळा पूजा करण्यासाठी तयार आहे. आता हा कोहळा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे आणि हळद-कुंकू ने आपल्याला पूजा करायची आहे आणि सर्व देवी देवतांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. या कोहळ्या द्वारे देवी देवतांनी आपले संरक्षण करावे अशी प्रार्थना देखील करायची आहे त्यानंतर हा कोहळा आपल्याला आपल्या प्रवेशद्वारा जवळ बांधायचा आहे. जर तुम्ही बाहेर कोहळा टांग ल्यानंतर आठ ते दहा दिवसांमध्ये या कोवळ्यातून जर पाणी येऊ लागले किंवा हा कोहळा सडला असेल तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता संपलेली आहे, अशावेळी घाबरून जाऊ नका. हा कोहळा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आणि पुन्हा नव्याने कोहळा बाजारातून विकत घेऊन यायचा आहे. आपण जो कोळहा बाहेर लटकवलेला आहे आणि तो जर खराब झालेला असेल तर चुकून देखील घरामध्ये आणू नका कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषलेली असते, अशावेळी जर तुम्ही कोहळा घरामध्ये आणला तर सगळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल आणि त्याचा नकारात्मक परिणाम घरातील सदस्यांवर होईल.
आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की हा कोहळा आपल्याला कधी लावायचा आहे आणि कोहळा लावायचा आहे तर अशावेळी जेव्हा आपण पहिल्यांदा कोहळा लावणारा असो किंवा हा कोहळा शनिवारच्या दिवशी सूर्यास्त आधी दरवाजासमोर लटकवायचा आहे आणि जर खराब देखील झाला असेल तर शनिवारच्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी आपल्याला हा कोहळा दारासमोर लावायचा आहे. हा कोहळा घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ लावताना सर्वांना दिसेल, या पद्धतीने लावायचा आहे आणि विशेष करून तुमच्या घरात येणारा सदस्य या कोहळ्या खालूनच घरामध्ये प्रवेश करेल याची देखील आपल्याला खबरदारी घ्यायची आहे, कारण की आपल्या घरामध्ये येताना वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती घरामध्ये प्रवेश करत असतात. काही लोक सकारात्मक विचार करून आपल्या घरात येतात तर काही लोक नकारात्मक विचार करून घरामध्ये प्रवेश करत असतात,अशावेळी जर एखादी व्यक्ती घरामध्ये नकारात्मक विचार करून प्रवेश करत असेल तर ते सारे विचार या कोहळा मध्ये शोषून घेतले जातात आणि म्हणूनच हा कोहळा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ लावायचा आहे जेणेकरून कोणतेही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही.
Recent Comments