दिवाळीच्या दिवशी जर हे काही प्राणी तुमच्या घरात आले तर मिळतील शुभ अशुभ संकेत,जाणून घ्या आत्ताच !

नमस्कार मित्रानो…..

दिवाळी काही दिवसांवर आलेली आहे. दिवाळी हा सण हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. या सणांमध्ये अनेक गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात तसेच धर्मशास्त्र अध्यात्मामध्ये देखील दिवाळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे तसे पाहायला गेले तर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक प्राणी, पक्षी, वनस्पती, झाडेझुडपे यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे स्थान आहे आणि म्हणूनच या सर्वांचा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अनेकदा मांजर, पाल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा समावेश किंवा प्रवेश झालेला पाहायला मिळतो तसेच अनेकदा आपल्याला घुबड पाहायला मिळते. वटवाघुळ पाहायला मिळते. हे पक्षी देखील अनेकदा कळत नकळत दिसून येतात परंतु प्रत्येक पक्षाचे स्वतःचे असे काही महत्त्व असते आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळीच्या सणाला जर हे काही प्राणी तुम्हाला घरामध्ये दिसले तर त्याचा नेमका अर्थ काय होतो हे सांगणार आहोत. शगुन शास्त्रांमध्ये जर आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये काही प्राणी दिसले तर त्यांचा संकेत शुभ किंवा अशुभ मानला जातो.

जर तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या घराच्या छतावर टेरेसवर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठे घुबड नजरेस पडले तर हे तुमच्यासाठी शुभ मानले जाते. आपल्या सर्वांना आम्ही सांगू इच्छितो की, दिवाळीच्या दिवशी माता महालक्ष्मी घुबडावर बसून सगळीकडे भ्रमण करत असते आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या ठिकाणी घुबड दिसले तर याचा अर्थ माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे. येणाऱ्या दिवसात तुम्हाला काहीतरी शुभ संकेत मिळणार आहे. तुमची प्रगती होणार आहे. सुख शांती वैभव मध्ये वाढ होणार आहे. काही दिवसांमध्ये दिवाळी येणार असल्याने सगळीकडे साफसफाई जोरामध्ये चालू आहे. जर साफसफाई करत असताना तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाल दिसली तर हे शुभ मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरामध्ये पाल दिसणे म्हणजे प्रत्यक्ष तुमच्यावर कुबेर देवताचा आशीर्वाद मिळण्यासारखे आहे, याचाच अर्थ तुमच्या जीवनामध्ये लवकरच धनाचा वाटा उघडणार आहे. आणि धन मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मिळणार आहे.

जर तुमच्या घराच्या पूर्व दिशेला असणाऱ्या भिंतीवर तुम्हाला पाल दिसली तर याचा शुभ संकेत मानला गेलेला आहे. जर घराच्या पश्चिम दिशेच्या भिंतीवर तुम्हाला पाल दिसली तर याचा अर्थ देखील शुभ मानला जातो, यामुळे वर्षभर तुमच्या घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभणार आहे घरामध्ये आनंदी वातावरण राहणार आहे. घरामध्ये एकही सदस्य आजारी पडणार नाही. जर दक्षिण दिशेच्या भिंतीवर पाल दिसली तर यामुळे तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे. समाजामध्ये तुमचे कौतुक होणार आहे आणि लवकरच कामाच्या ठिकाणी देखील तुमची प्रगती होणार आहे, असा शुभ संकेत मानला जातो. यानंतर पुढील प्राणी आहे चूचंद्री आपल्या सर्वांना माहितीच आहे.ज्या ठिकाणी धन पुरलेले असते अशा ठिकाणी चूचंद्री वास्तव्य करत असते किंवा आजूबाजूला फिरत असते. जर दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी ची चूचंद्री आली असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या घरामध्ये आकस्मत धन मिळणार आहे आणि धनाची वाढ देखील होणार आहे.

जर दिवाळीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये मांजर आली तर हा एक शुभ संकेत मानला जातो,याचाच अर्थ संपूर्ण वर्षभर तुमच्यावर माता महालक्ष्मीचा एक विशेष आशीर्वाद राहणार आहे. माता महालक्ष्मीच्या विशेष कृपाने तुमच्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता निर्माण होणार नाही. हे चार ही प्राणी व शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले आहे जर हे प्राणी तुम्हाला दिवाळीच्या दिवसांमध्ये कुठे नजर आले तर अशावेळी आपल्याला नमस्कार करायचा आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपली इच्छा मनोमन म्हणायची आहे, जेणेकरून त्यांच्या दर्शनाने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्हाला पूजा करणे शक्य झाली नाही तर अशावेळी तुम्ही मानसपूजा देखील करू शकता यासाठी आपल्या हातामध्ये काही अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षता जर एखादा प्राणी दिसत असल्यास त्याच्या अंगावर टाकायचे आहे, असे केल्याने देखील तुमची पूजा स्वीकारली जाते अशा प्रकारे दिवाळीच्या दिवसांमध्ये हे काही प्राणी तुम्हाला मिळाली तर व दिसले तर तुमच्या जीवनामध्ये भविष्यात सुख शांती वैभव येणार आहे हे नक्की आहे.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *