दिवाळीच्या दिवसात करा या गोष्टी माता महालक्ष्मी अशी होईल प्रसन्न की भविष्यात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही!
मित्रांनो……
दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास निर्माण करून साजरा केला जाणारा उत्सव. दिवाळीमध्ये सगळीकडे आपल्याला प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण पाहायला मिळते. दिवाळी म्हणजे वाईटावर केलेली मात. दिवाळी आणि माता महालक्ष्मी यांचे घनिष्ठ संबंध आहे. दिवाळी हा सण आनंद उत्सव निर्माण करणारा सण आहे आणि म्हणूनच माता महालक्ष्मी देखील आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव आणणारी देवी मानली जाते. जी व्यक्ती माता महालक्ष्मीची मनाभावी पूजा अर्चना करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव येत असतात आणि परिणामी जर तुमच्याकडे पैसा आला तर तुमच्या सर्व आर्थिक अ’डचणी दूर होतात. तुम्हाला येणारे मानसिक त्रास देखील लवकर दूर होऊन जातात. आजच्या लेखामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
दिवाळीच्या दिवशी आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, ज्यामुळे माता महालक्ष्मीच्या कृपा वर्षाव आपल्यावर सहजरित्या होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊया त्या नेमक्या गोष्टी कोणत्या आहेत त्याबद्दल… आपल्या सर्वांना झाडू माहिती आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी झाडू हमखास दिसतो. झाडूचा संबंध थेट माता महालक्ष्मीशी जोडला जातो, असे म्हटले जाते की ज्या घरी झाडूची विधिवत पूजा केली जाते त्या ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते. झाडू हे आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा नसते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते आणि म्हणूनच दिवाळीच्या दिवशी आपल्याला झाडू अवश्य आणायचा आहे. लक्ष्मीपूजनाला झाडू नवीन आणून त्याची पूजा करायची आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी वास्तव्य करते.
दिवाळीच्या दिवसात झाडूची विशेष पूजा केली जाते परंतु ही पूजा करत असताना काही नियम आपल्याला पाळणे गरजेचे आहे. जर आपण या नियमांची अंमलबजावणी केली तर आपल्याला माता महालक्ष्मीचा आशीर्वाद सहजरीत्या मिळू शकतो. माता महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद ज्या व्यक्तीवर असतो त्या व्यक्तीच्या जीवनात भविष्यात कधीच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी निर्माण होत नाही. दिवाळीच्या दिवसांमध्ये जर तुमच्या घरात जुना झाडू असेल तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्या ऐवजी नवीन झाडू आणायचा आहे. दिवाळीच्या दिवसात झाडू दान करणे हे देखील शुभ मानले जाते. जर तुमच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अ’डचणी निर्माण होत असतील तर अशावेळी आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तीन झाडू दान करायचे आहेत, असे केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहेत. कोणत्याही प्रकारचा आर्थिक संकट लवकरच दूर होणार आहे.
दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण जो नवीन झाडू आणणार आहोत, त्या झाडूने घराची साफसफाई करायची आहे आणि पुढील काही दिवस तो झाडू आपल्याला लपवून ठेवायचा आहे. हा झाडू अशा ठिकाणी ठेवायचा आहे जेणेकरून तो कुणाला दिसणार नाही असे करणे ज्योतिषशास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, असे केल्याने पुढील अनेक वर्ष तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मी वास्तव्य करते. झाडूशी निगडित आपल्याला एक काळजी अवश्य घ्यायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे झाडूचा संबंध थेट माता महालक्ष्मीची असतो आणि म्हणूनच झाडू हा कधीच जोरात आपटू नये किंवा झाडू फेकू देखील नाही, असे केल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते आणि आपल्या घरातून निघून जाते. घरातील केर कचरा काढल्यानंतर झाडू कधीच उभा ठेवू नये. झाडू हा नेहमी आडवा ठेवायला हवा त्याचबरोबर झाडू हा घरातील कोणाला दिसणार नाही याची काळजी देखील घ्यायला हवे आणि म्हणूनच घराच्या दरवाजामागे झाडू ठेवणे अत्यंत चांगले मानले जाते. जर तुमच्या कडून झाडूला लाथ लागली असेल तर अशावेळी काय करावे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगण्यात आलेले आहे.
जर तुमच्याकडून चुकून किंवा कळत नकळत झाडूला लाथ लागले असेल तर अशावेळी त्वरित झाडून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि माता महालक्ष्मीची माफी मागायची आहे, ज्या ठिकाणी झाडूला मुद्दामून लात मारला जातो अशा ठिकाणी आर्थिक स्थिती गंभीर होऊ लागते. आर्थिक अ’डचण या निर्माण होऊ लागतात आणि माता महालक्ष्मी रागावून घरातून कायमस्वरूपी निघून जाते आणि म्हणूनच चुकून कधीच झाडू लागू नका अशा काही गोष्टींची तुम्ही काळजी जर येणाऱ्या दिवसांमध्ये घेतली तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो म्हणूनच दिवाळीच्या दिवसांमध्ये झाडूची विशेष काळजी घ्या झाडूची पूजा करा.
Recent Comments