दिवाळीच्या दिवसात सुपारीचा उपाय एकदा करून पहा पैसा असा जवळील की पुन्हा कधीच आर्थिक अडचणी जाणवणार नाही !
नमस्कार, तुमचे स्वागत आहे..
मित्रांनो प्रत्येक जण दैनंदिन जीवनामध्ये कोणती ना कोणती पूजा करत असतो. प्रत्येक जण परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करत असतो. प्रत्येकाला आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असते आणि म्हणूनच दिवसभरातून एकदा का होईना प्रत्येक जण देवापुढे नतमस्तक होत असतो. प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा असावा. आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव असावे. आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असावी आणि आपल्या आरोग्य चांगले राहावे असे वाटत असते आणि यासाठी प्रत्येक जण मेहनत देखील करत असतो. प्रत्येक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घेत असतो परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना अनेकदा आपण कमावलेला पैसा हा काही पुरत नाही आणि अशावेळी आपले मन नाराज होते. भरपूर पैसा कमवून देखील पैसा हा टिकत नाही, अशावेळी मानसिक अशांती निर्माण होते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने माता महालक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल.
आपल्या सर्वांना सुपारी माहिती आहे. सुपारी ही अशी एक वस्तू आहे ती प्रत्येक पूजेमध्ये आवर्जून वापरली जाते. सुपारीला श्री गणेश यांचे रुप देखील मानले गेले आहे आणि म्हणूनच प्रत्येक पूजा विधी मध्ये सुपारीला श्री गणेशाचे स्थान प्राप्त असते. सुपारी शिवाय आपण केलेली पूजा अपूर्ण मानली जाते. याच सुपारीचा वापर करून आपण आज एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत आणि हा उपाय जर आपण दिवाळीच्या दिवसात केला तर तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मी आपोआप प्रवेश करेल. सुपारी ही जरी छोटी असली तरी तिचे मूल्य मात्र खूपच मोठे आहे म्हणूनच आज आपण दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीपूजन करण्यात येणारी सुपारी उपाय महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत.आपल्याला या सुपारीचे पूजन करायचा आहे. आपल्याला एक सुपारी आणायची आहे आणि ती गणेश स्वरूप पूजन करून हळकुंकू वाहायचे आहे आणि ही सुपारी नंतर आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये रक्षासुत्राने बांधायचे आहे आणि ज्या ठिकाणी पैसा जास्त असतो अशा ठिकाणीही सुपारी ठेवायचे आहे, असे केल्याने भविष्यात कधीच तुमची तिजोरी रिकामी राहणार नाही.
तिजोरी मध्ये नेहमी पैसा राहील. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर शनिवारच्या दिवशी सूर्यास्त पूर्वी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली सुपारी आणि एक सिक्का ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्या झाडाचे एक पान तोडायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये सुपारी व शिक्का व्यवस्थित रित्या बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे, असे केल्याने कामाच्या ठिकाणी लवकरच सकारात्मक बदल दिसून येईल. जर खूप दिवसापासून तुमचे एखादे काम अर्धवट राहिलेले असेल कामांमध्ये पूर्णता येत नसेल तर अशावेळी आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये दोन लवंग ठेवायचे आहेत आणि एक सुपारी ठेवायची आहे जेव्हा आपण काम करू तेव्हा दोन लवंग आपल्याला तोंडामध्ये ठेवायचे आहेत आणि एक सुपारी देवालयात अर्पण करायचे आहे, असे केल्याने तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. कामांमध्ये झालेल्या सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल.
जर तुम्हाला लग्न करायचे असेल परंतु लग्न जमताना खूप सारे अडचण येत असतील लग्न वेळेवर जमत नसेल तर अशावेळी देखील सुपारीचा उपयोग महत्त्वाचा मानला जातो, अशावेळी आपल्याला सुपारीला अबिर लावायचे आहे आणि त्यानंतर चंदनाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहे व पौर्णिमेच्या दिवशी ही सुपारी आपल्याला देवाला अर्पण करायची आहे, असे केल्याने देखील लग्न लवकर जुळते. जर दिवाळीच्या दिवसात तुम्हाला धनवर्षाव व्हायला पाहिजे असे जर वाटत असेल तर सुपारीचा उपाय करून अत्यंत गरजेचा आहे म्हणूनच यंदाच्या लक्ष्मीपूजनाला आपल्याला कुबेर यंत्राची देखील पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे कुबेर मूर्ती नसेल तर अशावेळी तुम्ही सुपारी ला कुबेर संबोधन पूजन करायचे आहे असे केल्याने तुम्हाला लवकरच लाभ मिळेल. आपल्या सर्वांना माहितीच आहे की धनाची देवता म्हणून कुबेरांना मानले जाते आणि ज्या व्यक्तींवर कुबेर देवता प्रसन्न होतात त्या व्यक्तीच्या जीवनात कधीच धनाची कमतरता राहत नाही. भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी येत नाहीत, म्हणूनच आपले जीवन समृद्ध आणि संपन्न अशील बनवायचे असेल तर दिवाळीच्या दिवशी सुपारी चा उपाय अवश्य करा…
Recent Comments