दुर्लक्ष करू नका,आणा बाप्पांची अशी मूर्ती आणि पाळा हे नियम, व्हाल मालामाल…
महाराष्ट्रात प्रत्येक हिंदूच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होईल.कुठे १०दिवस,कुठे ७ दिवस, कुठे ५ दिवस, तर कुठे ३ दिवस बाप्पांची प्रतिस्थापना केली जाते. यावेळी आपण घरात बाप्पांची कशी मूर्ती आणावी, याविषयी अनेक प्रश्न असतात.जसे की ऊंची किती असावी, सोंड कोणत्या बाजूला हवी, मूर्ती बसलेली हवी की उभी तसेच मूर्ती जवळ उंदिरमामा असायला हव की नको यांसारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील.याचसंबंधी आपण आज बघणार आहोत :-
१)शास्त्रानुसार कुठल्याही बाजूला सोंड असलेली मूर्ती शुभ मानली जाते.डावी बाजू असो की उजवी बाजू , दोन्ही बाजू असलेल्या सोंड शुभ असते. डाव्या बाजूला सोंड असलेल्या बाप्पाला वक्रतुंड म्हटले जाते तर उजव्या बाजूला सोंड असणाऱ्या बाप्पाला सिद्धिविनायक म्हटले जाते. फक्त यादोन्ही मुर्तीमध्ये फर्क एवढेच आहे की या दोन्ही मूर्तीची पूजापद्धती वेगळी आहे. उजव्या बाजूला सोंड असणाऱ्या मूर्तीची पूजापद्धती थोडी कठीन आहे.
२)मूर्तीची ऊंची एक फुटापेक्षा ऊंच नसावी. ३) अथर्वशीर्षात सांगितले आहे की मूर्ती ही एकदंत असलेली असावी आणि तसेच चतुर्भुज असावी म्हणजे बाप्पाला ४ हाथ असावे. शक्यतो गणपती च्या हातात पाश, अंकुश आणि मोदक असावा. विश्रात करत असलेली मूर्ती उत्तम मानली जाते.मूर्ती ही प्रसन्नमुख असायला हवी.
४)मूर्ती ही नेहमी आशीर्वाद मुद्रेत असावी म्हणजे बाप्पाचा उजवा हात हा आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत असावा. ५)मूर्तीजवळ गणपती चे वाहन मूषक असावे.चित्रविचित्र आकाराची मूर्ती विकत घेऊ नये.
६) शिवपार्वती सोबत असणारी मूर्ती कधीही घेऊ नये कारण त्यांची पूजापद्धती पूर्णपणे वेगळी आहे.तसेच इतर देवतांसोबत असलेली मुर्तीदेखिल घेऊ नये.
७) मूर्ति विकत घेतांना आपण गणपती बाप्पाच्या मूळ स्वरूपातील मूर्ती घ्यावी,इतर देविदेवतांची प्रतिकृती असलेली मूर्ती घेऊ नये.
८)एखाद्या वेळेस जर चुकीने आपल्याकडून मूर्ती भंग पावली तर घाबरु नये अशावेळी त्या मूर्तीला नैवेद्य दाखवून विसर्जन करावे. परंतु आधिपासुन भंग पावलेली मूर्ती कधीही विकत घेऊ नये.
तर अशाप्राकरे आम्ही सांगितलेले नियम पाळून आपण बाप्पांची मूर्ती आणावी. यामुळे आपल्यवर नेहमीच बाप्पाची कृपा राहील आणि जीवन सुखी-समृद्ध , आनंदित होईल.
Recent Comments