देवासमोरचे फोडलेले नारळ खराब निघाले तर काय असते त्या मागील कारण…!
हिंदू धर्मामध्ये पुजापाठ आणि धार्मिक कार्यासाठी अनेक, प्रकारचे नियम बनवले आहेत. नवरात्री च्या किंवा कोणत्याही इतर दिवशी विशेष अशी पूजा केली जाते. ही पूजा करण्या अगोदर एक नारळ स्थापित केले जाते आणि ही पूजा संपन्न झाल्यानंतर हे नारळ फोडले जाते.
पूजा संपन्न झाल्यानंतर हे फोडलेले नारळ प्रसाद स्वरुपात वाटले जाते. अनेकदा आपण देखील मंदिरात गेल्यानंतर देवासमोर नारळ फोडतो परंतु हे नारळ आत मधून ब-याच वेळेस खराब निघत असते. अशावेळी आपल्या मनामध्ये विविध विचार येत असतात.
सर्वात पहिला विचार मनामध्ये असा येतो की आपल्या वर देव नाराज तर झाला नसेल ना. असे अनेक विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात. तसेच जीवनामध्ये काही वाईट होणार आहे का असेदेखील विचार मनामध्ये येत असतात. आज आम्ही तुम्हाला या मागे काय रहस्य आहे ते सांगणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात देवासमोरचे फोडलेले नारळ खराब निघाले तर काय असते त्या मागील कारण…!
देवासमोर फोडलेले नारळ हे कधीकधी खराब किंवा वाळलेले निघते. असे झाल्यास बरेच लोक दुखी होत असतात. परंतु यामुळे दुखी होण्याची काहीही गरज नाही. खरे तर असे झाल्यास खुश व्हायला हवे. याचा अर्थ असा होतो की तुमची पूजा सफल झाली आहे. तुम्ही केलेली पूजा देवाने स्वीकार केली आहे.
जीवनामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होणार आहे व आनंदाचे क्षण येणार आहे. यामुळे अशा व्यक्तींच्या घरांमधील सर्व व्यक्तींवर भगवंताची कृपा राहात असते. परंतु काही वेळी नारळ हे खराब निघत नाही म्हणजे, आपली पूजा सफल नाही असे नाही. तुम्ही फोडलेले नारळ इतरांना प्रसाद म्हणून वाटावे तरीदेखील भगवंताचा आशीर्वाद तुमच्यावर निरंतर राहतो.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Recent Comments