धनत्रयोदशीच्या दिवशी या सात वस्तू घरात आणा, लक्ष्मी लगेच प्रसन्न होतील.

दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्णापक्षातील येणाऱ्या त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. याच दिवसापासून पुढील पाच दिवस दिवाळीचा सण चालू होतो. यादिवशी सर्वच लोक खरेदी करतात. अस मानलं जातं की, यादिवशी खरेदी केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांतता नांदते.

यंदा धनत्रयोदशीचा दिवस मंगळवार, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आला आहे. यादिवशी बहुतेक लोक सोन, चांदी अथवा भांडी अशा गोष्टी खरेदी करतात. परंतु ज्योतिष शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी या सात वस्तू खरेदी केल्यावर आपल्या घरात लक्ष्मी नांदेल.

● पितळीच्या वस्तू- धनत्रयोदशी हे भगवान धन्वंतरी अवतरित होण्याचे दिवस मानले जाते. यादिवशी भगवान समुद्रमंथन मधून भगवान धन्वंतरी अवतरले होते. तेव्हा त्यांच्या एका हातात पितळाचे कलश होते. त्यामुळे जे लोक धनत्रयोदशीला सोने किंवा चांदी विकत घेऊ शकत नाही त्यांनी पितळीचे सामान अवश्य विकत घ्यावे.

● चांदीचे नाणे :- ज्या लोकांना चांदीचे भांडे विकत घेणे शक्य होत नाही त्यांनी यादिवशी चाँदीचे नाणे विकत घ्यावे. हे आपल्याला स्वस्त ही पडेल. सोबतच या नाण्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान गणपतीचे चित्र असायला हवे, या नाण्याची आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करावी.

● झाडू :- झाडूला लक्ष्मीचे स्वरुप मानले जाते. त्यामुळे घरातील दरिद्री काढण्यास हे झाड़ू उपयुक्त ठरतो. छोट्या दिवाळीला केर काढण्यासाठी आपण या झाडूचा वापर करावा.

● अक्षत :- अक्षताला धनाचे आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आवर्जून अक्षत घरात आणावी.याने आपल्या सुख आणि वैभवामध्ये वाढ होईल.

● गोमती चक्र :- जर आपल्या घरातील सर्व सदस्य निरोगी असतील तर आपले कुटुंब सर्व दृष्टीने प्रगती करु शकतो. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र विकत घ्यावे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करावी. यानंतर पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून याला आपल्या तिजोरित ठेवावे.

● श्रीयंत्र :- माता लक्ष्मीला श्रीयंत्र अत्यंत प्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण हे श्रीयंत्र विकत घेऊन त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे. जर आपल्या घरात आधीपासून श्रीयंत्र असेल तर आपण यादिवशी गणपती आणि सरस्वतीची मूर्ती विकत घ्यावी.

● कोथींबीर :- यादिवशी आपण कोथिंबीर आपल्या घरी आणावी आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्याची पूजा करावी. यानंतर ही बियाने आपल्या घरात असलेल्या बागेत लावावी. अस मानले जाते की या कोथिंबीर सोबतच आपल्या घरात सुख-शांती वाढते.

तर मित्रांनो या ७ गोष्टी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरात आणावी. यामुळे आपल्या जीवनात सुख-शांती वाढेल आणि सोबतच आपण जीवनामध्ये मोठी प्रगती कराल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *