नवीन वर्षातील पहिल्या २७ दिवस करा हा तंत्र मंत्र उपाय.. पैसा येईल खूप..
नमस्कार मित्रांनो
श्री स्वामी समर्थ..
जर तुमच्या घरात पैसा येता येता थांबत असेल, एखादे काम पूर्ण होणार असताना किंवा ज्या मार्गे आपल्याला पैसा मिळणार असतो तो येता येताच थांबतो, व तो पैसा आपल्या हातात पडत नाहीआपल्या घरात येत नाही अशा वेळेस या पैशाच्या मार्गातील बाधा, अडचणी, समस्या दूर कश्या कराव्या त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.. हिंदूधर्म शास्त्रात व जोतिष शास्त्रात धन प्राप्तीच्या आणि विशेष करून धन मार्गातील बाधा दूर करणारा अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय इतका सोपा आणि एवढा सरळ आहे की याला करण्यासाठी तुम्हाला दिवसातील फक्त 10 ते 15 मिनिटे लागणार आहेत. हा उपाय धन अधिपती कुबेर यांच्याशी संबंधित आहे आणि हा उपाय सलग 27 दिवस केल्याने तुम्हाला याचा अद्भुत चमत्कार बघायला मिळेल. मित्रांनो या ब्रम्हांडात जितके धन, संपत्ती आहे त्या सर्वांचे कोषाध्यक्षधन अधिपती कुबेर आहेत आणि त्यांनाच प्रसन्न करणारा हा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुमच्या घरात कुबेर देवतांची फोटो किंवा मूर्ती असेल तर अति उत्तम आणि जर तुमच्याजवळ यापैकी काहीच नसेल तर तो तुम्हाला बाजारात किंवा फोटोशॉपमध्ये तो सजह उपलब्ध उपलब्ध होईल असा हा फोटो तुम्ही घरामध्ये आणू शकता जर तुम्हाला ते करणे देखील शक्य नसेल तर तुम्ही घरातील एका पाठावर वस्त्र हंतरुन त्या ठिकाणी फक्त एक दिवा जरी प्रजवलीत केला तरी चालेल…! हा दिवा धन अधिपती कुबेरांचे प्रतिनिधत्व करेल. मित्रांनो आशा प्रकारे देव कुबेरांचे पूजन तुम्ही देवघरात दुसऱ्या पाठावर केले तरी चालेल. मित्रांनो सलग 27 दिवस सकाळी व सायंकाळी आपण कुबेर देवांचे पूजन कराचे आहे. कुबेर देवांचा एक मंत्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या मंत्राचा तुम्ही श्रद्धापूर्वक, शुद्ध अंतकरणापासून सलग 27 दिवस रोज 108 वेळेस जप करा.. महत्वाचे म्हणजे जप करायला बसण्यापूर्वी आम्ही सांगितल्या प्रमाणे एक दिवा नक्की लावा. जप करून झाल्यानंतर तुम्ही श्री कुबेर देवांची चालीसा पाठ करा ज्यांना त्या कुबेर चालीसेचे पाठ करणे शक्य होणार नाही त्यांनी मोबाईलवर श्री कुबेर चालीसा लावून ती शांतपणे ऐकू शकता.
मित्रांनो तुम्ही जर कुबेर चालीसेचे फक्त श्रवण जरी केले तरी चालेल ते पठन केलेच पाहिजे असे काही नाही. हे सर्व झाल्यानंतर त्या दिव्यासमोर हात जोडून आपल्या ज्या काही धन समस्या आहेत, पैसा येता येता थांबत आहे, कोणतेच काम पूर्ण होत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कुबेर देवाकडे पार्थना करा. मित्रांनो जर तुमच्याकडे मोत्याची माळ असेल किंवा लाला चंदनाची माळ असेल तर अति उत्तम आहे कारण या मोत्याच्या किंवा चंदनाच्या माळेवर केलेला कुबेर मंत्राचा जप हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो मित्रांनो जोतिष शास्त्रात अनेक मंत्र सांगितले आहेत व त्या मंत्रांचा विशिष्ट समस्येवर किंवा विशिष्ट प्रकारच्या इच्छापूर्तीसाठी वापर केला जातो. धन प्राप्तीसाठी ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी एक कुबेर मंत्र दिला आहे तो कुबेर मंत्र तुम्ही सकाळ संध्याकाळ सलग 27 दिवस 108 वेळा मनोभावे याचा जप करा व तो कुबेर मंत्र असा आहे की “ओम कुबेराय नमः…!”
मित्रांनो वरती सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि या मंत्राचा जप करा तुम्हाला धन प्राप्ती नक्की होईल. व तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही, हिंदू धर्म शास्त्र, ज्योतिष शास्त्रानुसार सांगितलेले उपाय आम्ही तुमच्या पर्यंत पोहीचवत असतो.
Recent Comments