नवीन वर्ष २०२२ मध्ये घरामध्ये आणून ठेवा फक्त या ५ वस्तु, घराकडे आपोआप पैसा आणि ऐश्वर्य होईल आकर्षित…
नमस्कार मित्रांनो..!
श्री स्वामी समर्थ..!
नवीन वर्ष सुरु होण्याआधी घरामध्ये आणा चांदीच्या या वस्तु. घरात एवढी वैभवता आणि धनसंपत्ती येईल की मोजता मोजता थकून जाल. जवळपास प्रत्येकालाच वाटते की त्याच्या जीवनामध्ये सुख-शांती असावी, वैभवता असावी आणि हे मिळवण्यासाठी प्रत्येकजण जीवनामध्ये झटत असतो. परंतु अनेकवेळा काम करून देखील आपल्याला हवे तसे, मनासारखे यश मिळत नाही किंवा प्रगती होत नाही आणि मग आपण म्हणतो की आमचे नशीबच खराब आहे. परंतु जर आपल्याला जीवनामध्ये यश, सुख शांती आणि प्रगती हवी असेल तर घरामध्ये चांदीच्या या पाच वस्तुंपैकी कोणतेही एक वस्तु आणून ठेवा.
यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे चांदीचा एखादा चौकोनी तुकडा, जर आपण आपल्या घरामध्ये चांदीचा तुकडा आणून ठेवला तर आपल्याला नोकरी आणि उद्योगामध्ये यश मिळू शकते. सोबतच देवी लक्ष्मीचे पाऊले घराकडे आकर्षित होतील आणि घरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येईल. हा तुकडा आपण आपण ज्याठिकाणी पैसे ठेवतो तिकडे किंवा तिजोरी मध्ये ठेवावे.
जर अनेक प्रयत्न करूनही आपले लग्न होत नसेल तर चांदीच्या चेन मध्ये चांदीची एक भरीव गोळी टाकून ती चेन कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये पहिल्या सोमवारी ही चेन अवश्य धारण करा, यामुळे काही दिवसांमध्येच तुमचे विवाहाचे योग जुडून येतील. तसेच जर आपल्या जीवनामध्ये काही ना काही समस्या सुरु असतील तर या प्रयोगामुळे सर्व समस्या दूर होतील.
जर आपल्याला नोकरी-व्यावसायामध्ये प्रगती करायची असेल, सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेमध्ये वाढ करून घ्यायची असेल तर आपण घरामध्ये चांदीचा हत्ती आणून ठेवावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश या दोघांची कृपा आपल्यावर बरसते. जेव्हा या दोन्ही देवतांची कृपा आपल्यावर बरसते तेव्हा ऐश्वर्य आणि धनसंपत्ती आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हत्ती लहान असला तरी चालेल परंतु पोकळ असता कामा नये आणि त्याची सोंड खाली असावी
यासोबतच आपण एखादी चांदीची डबी घ्यावी आणि त्यामध्ये पाणी भरून, ती डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी. जेव्हा जेव्हा त्यामधील पाणी संपेल, तेव्हा पुन्हा त्यामध्ये पाणी भरून ठेवावे. यामुळे घरामध्ये ऐश्वर्य येईल आणि तिजोरीमध्ये पैसांची कधीही कमी पडणार नाही. तसेच जर आपल्या राशीमध्ये राहू दोष असेल तर डबी मध्ये मध भरून, ती डबी घराच्या अंगणामध्ये गाडून ठेवा.
चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पीने अत्यंत शुभ मानले जाते. जर आपण चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलो तर घरामध्ये सकारात्मक वातावरण असते. तर मित्रांनो तुम्ही या पाच मधून कोणतेही एक किंवा पाचही उपाय करु शकता, हे उपाय केल्यानंतर आपल्याला याचा फायदा नक्कीच दिसून येईल.
Recent Comments