पूजा करताना पूजेमध्ये घंटी अवश्य ठेवा घंटा नादामुळे घडतात या काही गोष्टी !

मित्रांनो देवपूजा करत असताना प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. देवपूजा करत असताना लागणारी गोष्ट ही देवपूजेसाठी अत्यंत महत्त्वाची असते पण त्याचबरोबर वातावरण निर्मितीसाठी देखील अत्यंत उपयुक्त ठरत असते. आजच्या लेखांमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या वस्तू शिवाय पूजा अपूर्ण मानली जाते ती वस्तू म्हणजे घंटी होय. प्रत्येक देवघरामध्ये आपल्याला एक छोटीशी घंटी पाहायला मिळते. या घंटीच्या मदतीने आपण घंटा नाद करत असतो. प्रत्येक देवपूजा करत असताना व देवाला जागरण करत असताना आपण घंटीचा नाद करूनच देवपूजा सुरुवात करत असतो म्हणूनच देवपूजा करत असताना घंटीचे महत्व नेमके काय काय असते व का आपण देवघरांमध्ये घंटी ठेवतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते.

या देवघरांमध्ये विविध देवतांच्या मुर्त्या, हळद – कुंकू ठेवण्यासाठी असलेले भांडे, कळस आणि एक छोटीशी घंटी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वस्तूचे एक त्याचे वेगळे महत्त्व आहे, याशिवाय देवघर अपूर्ण मानले जाते. देवघरात पूजा करण्यापूर्वी आपण देवांची स्नान विधी करत असतो त्यानंतर देवा पुढे दिवा प्रज्वलित करतो. दिवाप्रज्वलित झाल्यानंतर आपण शंखा मध्ये पाणी ठेवतो आणि त्यानंतर घंटीनाद करत असतो. अनेकदा घंटी ही फक्त आरती करताना वाजवली जाते परंतु असे नाही. घंटी वाजवण्याचे व घंटी नाद करण्याचे अनेक वेळा देखील सांगण्यात आलेले आहेत. या वेळांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये घंटी नसते, अशा ठिकाणी राक्षस असुर वास्तव्य करत असतात.

म्हणूनच प्रत्येकाने आपल्या देवघरांमध्ये घंटी अवश्य ठेवायला हवी. त्याचबरोबर जेव्हा आपण देवपूजा करणार आहोत त्यापूर्वी घंटी अवश्य वाजवायला हवी यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर वास्तव्य करत असेल तर ते निघून जाते त्याचबरोबर जर तुम्ही देवांना स्नान घालत असाल तर अशावेळी घंटी वाजवावी, धूप दाखवताना घंटी वाजवावी जेव्हा आपण पूजेच्या आधी घंटी नाद करत असतो तेव्हा अशावेळी आपण देवांना आवाहन करत असतो आणि पूजा करत असताना देव स्वतः पूजेला उपस्थित असतात असे म्हटले जाते. जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करत असतो तेव्हा सुरुवातीला घंटी नाद करायलाच हवा यामुळे घरामध्ये एक वेगळीच वातावरण तयार होत असते. घंटीनाद केल्यामुळे जी व्यक्ती देवपूजा करत आहे ती सकारात्मक तर होते पण त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अजून भक्तिभाव जागृत होतो त्याचबरोबर घरातील इतर सदस्य देखील सकारात्मक भावनेने प्रेरित होत असतात.

आपल्याला देवपूजा करत असताना, देवांना स्नान विधी करताना, घंटी नाद करायची आहे. देवाला चंदन लावताना घंटा नाद करायचा आहे त्यानंतर नैवेद्य दाखवताना घंटी नाद करायचा आहे. आरतीला तर आपण घंटीनाद करत असतो परंतु अन्य वेळी देखील आपल्याला घंटी नाद करायचा आहे जर तुम्ही सकाळी संध्याकाळी घंटी नाद केली तर तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वास्तव करू लागेल. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक मन तुमच्या घरामध्ये वास्तव्य करणार नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी नास्तिक व्यक्ती असते, ज्या व्यक्तींची देवावर श्रद्धा नसते ती व्यक्ती देखील घंटा नादी मुळे प्रेरित होऊन जाते. घंटा नाद मुळे आपल्या घरामध्ये एक वेगळाच प्रकारच्या लहरी निर्माण होत असतात आणि या लहरीमध्ये एक वेगळे संगीत लपलेले असते या संगीताच्या उगमामुळे आपल्या घरातील वातावरण देखील सुंदर होते.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *