भाग्यवानच्या घरीच जन्माला येते मुली जाणून घ्या स्वामी समर्थांनी सांगितलेली ही गोष्ट !

मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला मुलगी कुणाच्या घरी जन्माला येते याबद्दलची एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत आणि म्हणूनच हा लेख तुमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल. मित्रांनो आतापर्यंत आपण वेगवेगळ्या म्हणी ऐकलेल्या असेल. मुलगी म्हणजे धनाची पेटी. मुलगी झाली म्हणजे माता महालक्ष्मी घरी आली अशा विविध वाक्यरचनांची मांदियाळी अनेकांनी ऐकलेली असेल. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का प्रत्येकाच्या घरीच मुलगी जन्माला येत नाही. जी व्यक्ती मनाने पवित्र असते मनाने चांगली असते, अशा व्यक्तीच्या घरीच मुलगी जन्माला येत असते आणि हे त्रिवार सत्य आहे. ज्या व्यक्तींचे मन वाईट असते जे लोक स्वार्थी असतात. इतरांचा विचार करत नाही अशा व्यक्तींच्या घरी भगवंत कधीच जन्माला मुली घालत नाही, उलट ज्या व्यक्तींचे मन स्वच्छ असते निर्मळ असते अशा व्यक्तींच्या घरी भगवंत मुलींचा जन्म घडवत असतो.

मुलगी का महत्त्वाची असते याबद्दल स्वामी समर्थ एक प्रसंग सांगतात. एकदा स्वामी समर्थ माता वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी जात असतात. दर्शनाला जात असताना त्यांच्यासोबत एक शेतकरी देखील असतो. तो शेतकरी आपल्या मुलीला खांद्यावर उचलतो. हे पाहत असताना श्री स्वामी समर्थ त्या शेतकऱ्याला म्हणतात की मुलीला डोक्यावर व खांद्यावर घेतल्याने तुम्हाला भार होत असेल ना?.. एक काम करा काही वेळ माझ्या खांद्यावर मुलीला द्या. मंदिर जवळ आले की मी मुलीला तुमच्याजवळ देतो, अशा वेळी शेतकऱ्यांनी स्वामी समर्थांना दिलेले उत्तर अत्यंत महत्त्वाचे होते. शेतकरी म्हणायला का मनाला बापाला आपल्या मुलीचे कधीच ओझे होत नाही. मुलगी बापाचे भार नेहमी हलका करत असते आणि ज्या व्यक्तीला आपल्या मुलीचे ओझे होते तो बाप असू शकत नाही. मुलगा आपल्या आई-वडिलांना दुःख देऊ शकतो परंतु मुलगी आपल्या आई-वडिलांना अजिबात दुःखामध्ये बघू शकत नाही.

एक वेळ मुले आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष करतात परंतु मुली अगदी काळजाप्रमाणे आपल्या आई-वडिलांची विचारपूस करत असतात. मुलगी जेव्हा घरात असते तेव्हा ती स्वच्छंदपणे हसत खेळत असते परंतु लग्न केल्यानंतर ती जेव्हा सासरी जाते तेव्हा त्याचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. जेव्हा आपले वडील कामावरून थकून भागून येतात तेव्हा सर्वप्रथम पाण्याचा ग्लास घेऊन येणारी मुलगीच असते वडील जर शांत असतील तर वडिलांची चिंता नेमकी काय आहे हे अगदी प्रेमाने विचारणारे मुलगी असते आणि म्हणूनच प्रत्येक वडिलांचे आयुष्यामध्ये मुलगी ही अत्यंत महत्त्वाचे असते. वडिलांचे आणि मुलीचे नाते अतूट असते वडिलांचे जीवन मुली शिवाय अपूर्ण असते आणि मुलीचे जीवन हे वडिलांशिवाय अपूर्ण असते आणि म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात. ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते त्या घरामध्ये साक्षात स्त्री शक्ती म्हणजेच महालक्ष्मी सरस्वती आणि माता दुर्गा जन्माला येत असते, ज्या घरामध्ये मुलगीचा जन्म झालेला असतो ते घर नेहमी पवित्र असते.

त्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदत असते कोणतीही नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये जास्त काळ वास्तव्य करत नाही परंतु ज्या घरामध्ये मुलगी नसते अशा घरात माता महालक्ष्मी लवकर प्रसन्न होत नाही म्हणून मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, ज्या घरांमध्ये मुली असतात, त्यांचा सन्मान आवश्यक करा. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल अशा प्रकारे वर्तनुक करू नका. आपल्या घरामध्ये असणारी महिला ही आई असू शकते, मुलगी असू शकते, सून असू शकते, बहीण असू शकते तिच्या सन्मान करा .तुमच्या घरामध्ये जेव्हा एखादी महिला प्रवेश करते तिचे आई-वडील सोडून तुमच्या घरी कायमस्वरूपी येते तेव्हा तिचा सन्मान करा. ज्या घरामध्ये महिलेचा सन्मान होतो त्या घरात नेहमी सुख शांती वास्तव्य करत असते. ज्या घरात महिला असतात मुली असतात असे घर नेहमी हसते असते. मुलगी घराला नेहमी आनंदी ठेवण्याचे काम करते. घरामध्ये विचारपूस करते म्हणूनच मुलगी शिकली प्रगती झाली असे देखील म्हटले जाते. एक मुलगी शिकली तर ती अख्ख्या कुटुंबाला शिकवते परंतु एक मुलगा शिकला तर तो स्वतःसाठी जीवन जगत असतो हा इतका महत्त्वाचा फरक आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि म्हणूनच मुलींना खूप शिकवा त्यांच्या स्वप्नांना बळ द्या त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *