भारताने गमावला महान खेळाडू, महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
महान धावपटू आणि अनेक स्पर्धांमध्ये भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करणारे मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झालं त्यांची कोरोणाशी झुंज अपयशी ठरली वयाच्या एक्यानवव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आजारी असल्यामुळे अलीकडेच त्यांना चंदीगडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले . मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1928 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता.
एका महिन्यासाठी कोरोनाशी झुंज दिल्यानंतर भारताचा महान स्पिरिंटर मिल्खा सिंग शुक्रवारी मरण पावले तत्पूर्वी, त्यांची पत्नी आणि भारतीय व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल कौर यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले. पद्मश्री मिल्खा सिंह 91 वर्षांचे होते.
त्यांचा मुलगा गोल्फर जीव मिल्खा सिंग आणि तीन मुली असा परिवार आहेत. त्यांच्या कुटूंबाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “त्यांनी रात्री ११. ०० वाजता अखेरचा श्वास घेतला.” त्यांची प्रकृती संध्याकाळपासूनच गंभीर झाली होती आणि तापाबरोबर ऑक्सिजनही कमी झाला होता. त्यांना जीआयएमआरच्या आयसीयूमध्ये दाखल केले.
कोरोना झाला असे समजले पण बुधवारी त्यांचा अहवाल नकारात्मक आला. त्यानां जनरल आयसीयूमध्ये हलविण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती स्थिर झाली होती असे समजले व त्यानंतर त्याच्या पत्नी निर्मल यांचे रविवारी खासगी रुग्णालयात निधन झाले.
चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकनाऱ्या मिल्खाने 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले होते आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी मात्र 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये झाली होती ज्यामध्ये 400 मीटरच्या अंतिम फेरीत ते चौथ्या स्थानावर होता. 1956 Olymp आणि 1956 आणि 1964 ऑलिम्पिकमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. 1959मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
Recent Comments