मंगळवारी करा स्वामींची ही सेवा, 21 वेळा फक्त मंत्र बोलल्याने सगळ्या स’मस्या होतील दूर!

श्री स्वामी समर्थ!

स्वामी समर्थ यांची पूजा आराधना भक्त करत असतात. स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक भक्तांचे संकट दूर करत असतात. प्रत्येकाला आपल्या प्रेमाने प्रसन्न करत असतात आणि आपल्या चांगल्या नजरेने भक्तांच्या जीवनावर प्रभुत्व निर्माण करत असतात. स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष दत्तरूप अवतार आहे आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की दत्त म्हणजे विष्णु, ब्रह्मा आणि शिवशंकर यांचे स्वरूप आहे. या त्री शक्तीचा उगम म्हणजेच दत्तस्थान आहे आणि दत्ताचा अवतार हेच स्वामी समर्थ आहे. ज्या भक्तांवर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो त्या भक्तांवर तीन देवतांचा प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या आशीर्वाद मिळत असतो आणि म्हणूनच मंगळवारचा दिवस हा स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

जर आपण मंगळवारच्या दिवशी स्वामी समर्थांचे काही उपाय जाणून घेतले तर तुमच्या जीवनातील अनेक संकटे लवकरच दूर होतील. शिवशंकराचा तुमच्यावर आशीर्वाद प्राप्त होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की, शंकर हे साधे भोळे आहेत. जे भक्त महादेवांची मनापासून पूजा अर्चना करतात त्यांच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात. मंगळवारच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थांची पूजा करायची आहे. यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. स्नान विधी करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवाऱ्यांमध्ये स्वामी समर्थांचा फोटो किंवा शिवशंकराचा फोटो असेल तर त्यासमोर पाट मांडून बसायचे आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र स्वामी बीज मंत्र आहे. या मंत्राचा 21 वेळा उच्चार केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहे.

21 पेक्षा जास्त व 21 पेक्षा कमी आपल्याला या मंत्राचा जप करायचा नाही. फक्त 21 वेळा जरी मंत्र जप केला तरी तुमच्या जीवनातील सर्व संकटे लवकरच दूर होऊ शकते. मंत्र पुढील प्रमाणे आहे महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ… या मंत्राचा आपल्याला जयघोष करायचा आहे या मंत्राने तुमच्या आजूबाजूला असणारे नकारात्मक वातावरण पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. या मंत्राच्या जपा ने तुमच्या शरीरातील सगळ्या वाईट शक्ती दूर होऊन जाणार आहेत व नवचैतन्य शरीरामध्ये संचारणार आहे, अशा प्रकारे जीवनातील संपूर्ण नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय आवश्य करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *