मकर संक्रांतीला वाहत्या पाण्यात टाका ही १ वस्तू जे मागाल ते मिळेल
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 14 जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे ‘मकर संक्रांत’..
मित्रांनो या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाच्या पूजनाचे, स्नान आणि दानधर्माचे खूप महत्व आहे. म्हणूनच आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे काही विशेष उपाय पाहणार आहोत.. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवाची आराधना केल्याने सुख-समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते.
तसेच आपल्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल, साडेसाती असेल, महादशा असेल तसेच शनिदोषाचा पराभव कमी करण्यासाठी देखील या दिवशी आपण काही उपाय नक्की करू शकतो. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला तिळाचा अधिकाधिक प्रयोग करावा, तीळ युक्त जलाने पितरांना तर्पण करावे, अग्निमध्ये तीळ टाकून हवन करावे, तीळ खावेत तसेच तीळ दान देखील करावे.
या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. अंघोळीच्या आधी तिळाचे उटणे लावून अंघोळ केल्याने सर्व पापांचा नाश होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण गोर-गरिबांना अन्नदान केले, तिळाचे गुळाचे दान केले तर यामुळे आपल्या घरामध्ये अन्न धान्याची कधीही कमतरता भासत नाही, आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहते.
आता जाणून घेऊया आजचा विशेष उपाय मित्रांनो हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह हा मजबूत होतो आणि ज्यांच्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीला सर्व कार्यामध्ये सफलता निश्चित मिळते…! समाजामध्ये मान सन्मान मिळतो, त्या व्यक्तीने कोणतेही कार्य हाती घेतले तर त्यामध्ये त्यांना अपयश कधीच येत नाही. याच बरोबर अनेक शुभ फळांची प्राप्ती होते.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांब्याच्या धातू पासून बनलेला एक “शिक्का” घ्यायचा आहे, तांब्याचा शिक्का नसेल तर तुम्ही तांब्याच्या धातूचा एखादा तुकडा देखील घेऊ शकता. तर असा तांब्याचा शिक्का घेऊन वाहत्या पाण्याजवळ जा, नदी असेल, समुद्र असेल त्या ठिकाणी जावे, जर तुमच्या जवळपास नदी आणि समुद्र नसेल तर एखाद्या तलावात देखील तुम्ही हा उपाय करू शकता.
तर हा तांब्याचा शिक्का या तलावामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा. याच बरोबर थोडेसे काळे तीळ देखील प्रवाहित करा, आणि हा तांब्याचा शिक्का आणि काळे तीळ प्रवाहित करताना “।। ओम गृहनी सूर्याचे नमः ।।” हा मंत्र ७ वेळा बोलायचा आहे. नंतर हात जोडून तुमच्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल, मनोकामना असेल ती त्या वाहत्या शिक्क्यासमोर बोलावी.. आपल्या जीवनातील दुःख, समस्या, दारिद्र्य कायमचे नष्ट होण्यासाठी प्रार्थना करावी.
तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता, फक्त सुर्यास्त होण्याआधी हा उपाय करावा. जर शक्य असेल तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा उपाय केला तर अतिउत्तम, मित्रांनो तुम्ही जे काही उपाय करता त्यावेळी कोणतीही शंका कुशंका मनामध्ये आणू नका..! आपला उपाय सिद्ध होईल की नाही, आपली मनोकामना पूर्ण होईल की नाही, अशी कोणतीही शंका आणू नका..
पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय करत चला, या उपायांचा फायदा तुम्हाला नक्की होईल.. आजची माहिती आवडली असेल तर आमच्या पेजला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये ।। ओम सुर्याय नमः ।। असे नक्की लिहा.
Recent Comments