महादेवाच्या पिंडीवर चुकूनही चढवू नका या 7 गोष्टी, अन्यथा घर बरबाद होईल..!
पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात आपण प्रत्येक जण भोले बाबांची म्हणजेच महादेवांची मनोभावे पूजा करणार आहोत. महादेवांच्या पूजेमध्ये अनेक प्रकारची सामग्री आपण वापरतो आणि महादेवांना प्रसन्न करून घेतो. महादेव हे भोलेनाथ आहेत खरोखरच भोले आहेत.अगदी साध्यासुध्या पूजेने सुद्धा ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात.
आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करतात. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना अशा सात वस्तू खरेतर नऊ वस्तू आहेत.या नऊ वस्तूंचा वापर कृपया करू नका.ही सामग्री महादेवांना अप्रिय आहेत म्हणजेच पसंत नाही आणि ही सामग्री जर महादेवांना कळत नकळत आपल्या हातून वाहिली गेली तर मात्र भोले बाबा क्रोधीत होऊ शकतात आणि महादेवांचा क्रोध आपल्या सर्वांना ज्ञात आहे म्हणूनच त्यांना रुद्र असंही म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया शिवशंकरांच्या पूजेमध्ये कोणत्या वस्तू चा वापर आपण चुकूनही करू नये त्याबद्दल…
त्यातील पहिली वस्तू आहे तुळशीपत्र. तुळशीपत्र म्हणजे तुळशीची पाने आहे. शिव शंभू च्या पूजेमध्ये या पानांचा वापर चुकूनही होणार नाही याची काळजी घ्या यामुळे भगवान शिवशंकर तुमच्यावर नाराज होतील तसेच या पुजे मध्ये तुळशी पात्र वर्ज्य आहे म्हणूनच तेव्हा शिव परिवारातील इतर देवता म्हणजेच गणपती बाप्पा, देवी माता पार्वती असेल ,कार्तिकी असेल त्यांच्या पूजेमध्ये तुळशी पत्रांचा वापर करण्यास मनाई आहे.
आपण भगवान शिव शंकर महादेव श्रावण महिन्यात यांच्यावर शंख द्वारे अभिषेक करू नका. महादेव यांनी शनखासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या भस्मातून शंखाची निर्मिती झाली आहे. आपण शंखाच्या आधारे भगवान विष्णू व माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी शंखा द्वारा आपण त्यांना प्रसन्न करू शकतो परंतु महादेवाची पूजा करत असतांना आपण आपल्याला शंख वापरायचे नाही आहे.
दुसरी वस्तू आहे खंडित झालेले तांदूळ म्हणजेच अक्षता. जे तुटले फुटले तांदूळ भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत.पूजा करताना तांदूळ अर्पण करा पण लक्षात ठेवायचे.काही तांदूळ फुटलेलेअसतात ,तुटलेले असतात त्यांची अक्षदा बनतात .ते तांदूळ अपूर्ण असतात आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांची पूजा अर्चना करताना अशा प्रकारचे तांदूळ अर्पण करणं हे सुद्धा अशुभ मानण्यात आलेले आहे.
सर्वात महत्वाची माहिती म्हणजे महादेव यांना सर्वाधिक प्रिय कोणती पत्री असेल तर ती म्हणजे बेलपत्र असतील. बेलपत्र बाबत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शिवशंकराला बेलपत्र अर्पण करताना तुटलेले, फाटलेले बेलपत्र चुकून सुद्धा वाहू नका. त्यामुळे शिवशंकर क्रोधीत होऊ शकतात ,नाराज होऊ शकतात त्यांची अवकृपा आपल्यावर होऊ शकते. मित्रांनो महादेवांना दूध अर्पण केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. आपल्यापैकी अनेकांना काही गोष्टी माहिती नसतात. अनेक जण तापवलेले ,उकळलेले ,थंड केलेले दूध महादेवांना अर्पण करत असतात परंतु अशा पद्धतीने गरम केलेले दूध महादेवांना कधीच अर्पण करू नका. नेहमी कच्चे दूध गोमाता पासून मिळवलेले दूध आपण भगवान शिवशंकर यांना अर्पण करायचे आहे.
महादेव यांचे मस्तिष्क शांत राहावे व थंड व्हावे यासाठी आपण दूध अभिषेक करत असतो. हा त्यांच्यापुढे दूध अर्पण करताना आपला उद्देश चांगला असायला हवा.जर तुमच्याकडे दूध नसेल तर केवळ गंगा जल असेल अश्या वेळी घरातले गंगा जल स्वच्छ पाणी सुद्धा शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर अर्पण करून आपण त्यांची कृपा प्राप्त करू शकतो.
मित्रांनो लाल वस्त्र संबंधी सुद्धा धर्म शास्त्रामध्ये काही उल्लेख आढळतात.आपण अनेकदा पाहतो की लाल रंगाचे वस्तु, वस्त्र अनेक देवी देवतांना अर्पण केले जातात परंतु जर तुम्ही सुद्धा महादेवांना लाल रंगाचे फूल अर्पण करत असाल तर ठीक आहे परंतु लाल रंगाचे वस्त्र महादेवांना अजिबात अर्पण करू नका. महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं व पांढ-या रंगाच्या गोष्टी वस्तू अत्यंत प्रिय आहेत म्हणून महादेवांना जर कोणत्याही रंगाचे वस्तू अर्पण करायचे असेल तर प्रामुख्याने पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा अधिक विचार करावा. केतकीची पांढरी फुले महादेवांना चुकून सुद्धा अर्पण करू नका.
महादेवांना तुम्ही उसाचा रस व फळे सुद्धा हंगामानुसार उपलब्ध असतात ती वाहू शकता परंतु आपल्यापैकी अनेक जण नारळ फोडून त्या नारळातील पाणी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत असतात जर तुम्ही असे करत असाल तर तुमचे घर बरबाद होऊ शकते. तुमच्यावर खूप मोठे संकट येऊ शकते म्हणून नारळ हे श्री विष्णू पत्नी लक्ष्मी यांना अर्पण केले जाते आणि म्हणूनच नारळाचे फोडलेले पाणी शिवपिंडीवर अजिबात शिंपडू नये त्यानंतर ची गोष्ट आहे ती म्हणजे हळद कुंकू. आपण शिवपिंडीवर हळद-कुंकू वाहू शकतो परंतु शिवपिंड वरील जो उंच भाग असतो त्यावर आपल्याला हळद कुंकू लावायचे नाही.
तर या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये विशेष करून लक्षात ठेवायचे आहे. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्यावर भोले बाबा म्हणजे महादेव यांची कृपा दृष्टी नक्की होईल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण होईल.
Recent Comments