महिलांनी करावा हा एक उपाय… झोपताना उशीखाली ठेवा ही एक वस्तू, घरामध्ये पैसाच पैसा येईल !
मित्रांनो आपल्या सर्वांना वास्तुशास्त्र माहिती आहे. वास्तुशास्त्रांमध्ये घरातील प्रत्येक गोष्ट कुठे असावी याबद्दल सविस्तर सांगण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्र हे असे शास्त्र आहे जे आपल्या वास्तूशी निगडित असलेले आहे. यामध्ये घरामध्ये असणाऱ्या वस्तू व त्या वस्तू ठेवण्याची जागा दिशा या सर्वांबद्दल एक विशेष माहिती सांगण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आजच्या लेखांमध्ये देखील आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरी बेडरूम असतो. या बेडरूम मध्ये कोणती गोष्ट कुठे असावी हे देखील तितकेच गरजेचे असते. जर एखादी वस्तू योग्य जागेवर नसेल तर त्या गोष्टीचा नकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट जागेवर असणार अत्यंत गरजेचे आहे.
आपल्यापैकी अनेक जण आपल्या बेडरूममध्ये अशा काही गोष्टी भिंतीवर लावत असतात किंवा आपल्या उशीच्या आजूबाजूला ठेवत असतात ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या शरीरावर तर होतोच पण त्याचबरोबर आपल्या कामावर होत असतो. अनेकदा आपण सकाळी उठल्यावर नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबतच कायमस्वरूपी वास्तव्य करते आणि म्हणूनच अनेकदा सगळ्या गोष्टींचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. जर तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये अशा काही महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकेल, असे केल्याने तुमच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडू शकतील. आजच्या या लेखांमध्ये आपण अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत जे विशेषतः आपल्या बेडरूम मध्ये असणे गरजेचे आहे त्याचबरोबर महिलांनी झोपताना आपल्या उशीखाली एक वस्तू नेहमी ठेवायची आहे, असे केल्याने माता महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि माता महालक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये वास्तव्य देखील करणार आहे.
रात्री झोपताना महिलांनी आपल्या आयुष्याच्या खाली एक तुळशीचे पान ठेवायचे आहे. तुळशी ही पवित्र मानले गेलेले आहे. तुळशीचे अनेक उपयोग अध्यात्म शास्त्रांमध्ये देखील सांगण्यात आलेले आहे. हे उशीखाली ठेवलेले पान तुम्हाला सकाळी उठल्यावर सेवन करायचे आहे असे केल्याने तुळशीच्या पानांमध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ती तुमच्या शरीरामध्ये निर्माण होईल आणि तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर होऊन जाईल. दुसरी गोष्ट आहे मोरपीस. मोरपिसाचे अनेक दाखले वास्तुशास्त्रांमध्ये देण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रामध्ये मोराचे पिसे सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत मानण्यात आलेले आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मोरपीस ठेवत असाल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त वास करते त्याच बरोबर नजर दोष देखील लागत नाही. तुम्हा सर्वांना माहितीच असेल की अनेक जण आपल्या वही पुस्तकांमध्ये मोरपीस ठेवत असतात परंतु मोरपीस उशीखाली ठेवले तर यामुळे आपल्या कुंडलीतील दोष दूर होतात आणि तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होते.
तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उशीखाली झोपताना एक रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. हे नाणे सकाळी उठल्यावर आपल्याला एखाद्या व्यक्तीला दान करायचे आहे, असे केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाते आणि तुमच्या घरामध्ये वास्तव्य करते त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे धार्मिक वस्तू. जर तुम्ही रात्री झोपताना उशीखाली एखादी धार्मिक वस्तू म्हणजे ओम, स्वस्तिक किंवा अन्य वस्तू जर झोपायच्या ठिकाणी ठेवल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे वाईट स्वप्न पडणार नाही त्यानंतरची वस्तू म्हणजे लोखंडाची चावी. चावी हे आपल्या घरामध्ये अनेकदा पाहतो परंतु चावी ही अशी वस्तू आहे जी तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवते. तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जेमुळे कोणते संकट निर्माण होणार नाही अशा प्रकारे प्रत्येक महिलेने रात्री झोपताना जर या उपायांपैकी एखादी वस्तू जर आपल्या उशाखाली ठेवली तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाते आणि घरामध्ये माता महालक्ष्मीची पावले येऊ लागतात आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते तेथे माता महालक्ष्मी नेहमी निवास करते.
Recent Comments