मांजराने रस्ता कापणे शुभ आहे की अशुभ?? कृष्ण उपदेश ..भगवद्गीता..!!
नमस्कार..
अनेकदा आपण कुठे बाहेर जात असताना अचानकपणे मांजर आपला रस्ता आडवा करून जाते म्हणजे रस्ता कापून जाते, अशावेळी आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागतात पण खरंच मांजराने रस्ता कापला तर वाईट असते का? ते शुभ अशुभ असते? याचे खरच आपल्यावर काही परिणाम होतात का ? असे अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
खरंतर मांजरीने रस्ता कापला तर आपल्या सोबत वाईट होते असे सर्वसाधारणपणे बोलले जाते आणि आपल्यापैकी अनेक जण असे सुद्धा आहे की कुठे बाहेर जाताना मांजरीने रस्ता कापला तर थोड्या वेळ आपण तिथेच थांबून राहतो आणि मग पुढच्या प्रवासाला लागतो. मग तो व्यक्ती हिंदू असुदे मुसलमान असू दे किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो ते मांजर आडवी गेल्यावर काही काळ तो व्यक्ती थांबतो आणि दुसऱ्या व्यक्तीस आधी आपल्या पुढे जाईल याची वाट पाहत असतो. यामुळे अशुभ तेचे प्रमाण कमी होते. हे जरी खरे असले तरी आज आम्ही काही अशा महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, हे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही हे आश्चर्याचा धक्का बसेल.
मांजराचा रस्ता कापणे जेव्हा अशुभ मानले जाते तेव्हा मांजर डावीकडून उजवीकडे जात असते. अन्य परिस्थितीमध्ये मांजरा द्वारे रस्ता कापणे अशुभ मानले जात नाही. असे म्हणतात की कुत्र्याप्रमाणे मांजराचे सुद्धा सहावे इंद्रिय खूपच मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मांजर अनेक संकेत द्वारे त्याची जाणीव करुन देत असते. आपणास सांगू इच्छितो की तंत्र व मंत्र शास्त्रामध्ये मांजरीला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे.
जर एखादी मांजर आपल्या घरामध्ये येऊन रडू लागली तर याचा अर्थ घरामध्ये काहीतरी वाईट घडणार आहे. मांजराचे एकमेकांसोबत भांडण करणे याचा अर्थ घरा मध्ये काहीतरी भांडण होणार आहे की वाद ,धन हानी होणार आहे तसेच आपल्या कानावर एखाद्या व्यक्तीचे मृत्यूची बातमी पडणार आहे असा याचा अर्थ होतो.
मांजराचे येणे कधीकधी धर्माशी ,धनाशी संबंधित असते. दिवाळीच्या रात्री जर मांजर तुमच्या घरी येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरा मध्ये धन येणार आहे आणि हे धन वर्षभर राहणार आहे. ज्या घरामध्ये मांजर बाळाला जन्म देते त्या घरांमध्ये सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर अनेकदा मांजर आपल्या घरामध्ये लपून येते आणि आपल्या घरातील दूध पिते असे केल्यानंतर आपण अनेकदा मांजरला हाकलून देतो परंतु जर तुमच्या लक्षात येत नसेल तर मांजर आणि आपल्या घरातील दूध लपून पिऊन जाणे हे सुद्धा धन आगमनाचे एक लक्षण मानले जाते.
शास्त्रानुसार मांजरांनी सारखे सारखे आपल्या घरामध्ये येणे हे अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये मांजरीला राहूचे सवारी म्हटले गेले आहे आणि त्याचबरोबर ग्रह दोष पासून सुद्धा मांजर आपले संरक्षण करत असते. ज्या व्यक्तींचा कुंडली मध्ये राहू दोष आहे. राहू स्थान कमजोर आहे अशा व्यक्तीने मांजरीला खायला प्यायला घालायला पाहिजे असे केल्याने तुमच्या राहू बळकट होतो आणि तुमच्या जीवनातील सगळी संकटे दूर होऊ लागतात.आम्ही आशा करतो की या लेखामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेली माहिती नक्कीच आवडली असेल आणि आता तुमच्या मनामध्ये जर कोणत्याही प्रकारची शंका असेल ती सुद्धा दूर झालेली असेल म्हणून मांजराने रस्ता कापला तर काही वेळा ते अशुभ असते पण काही वेळा शुभ सुद्धा मानले जाते.
Recent Comments