मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापनाची माहिती आत्ताच घ्या जाणून कोणत्याही प्रकारची चूक करू नका ..
मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मार्गशीर्ष महिन्यात माता महालक्ष्मीची पूजा मोठ्या प्रमाणावर केले जाते. अनेक जण कळशाची पूजा करत असतात आणि गुरुवार आणि मार्गशीर्ष यांचे संबंध अतिशय घनिष्ठ आहे प्रत्येक भक्त माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी कळस पूजन करत असतात आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारच्या व्रतांना खूपच महत्त्व आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप सारे अड’चणी संकटी वारंवार येतात, या व्यक्तींनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अवश्य व्रत धारण करायला हवे, असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अड’चणी लवकरच दूर होऊन जाणार आहेत. माता महालक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे.
अनेक जण गुरुवारचा उपवास आवर्जून करत असतात परंतु या गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातील व्रताचे उद्यापन कसे करायचे याबद्दल अनेकांना माहिती नसते आणि जर चुकीच्या पद्धतीने उद्यापन केले तर आपल्याला उपवासाचे फळ देखील प्राप्त होत नाही, म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रतांचे उद्यापन कसे करायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये साधारणतः चार गुरुवार येतात. कधी तरी पाच गुरुवार येतात. पूजा केल्यानंतर चौथा किंवा पाचव्या गुरुवारी माता महालक्ष्मीच्या व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापन करण्याआधी प्रत्येक गुरुवारी माता महालक्ष्मीची स्थापना केली जाते. मनोभावे पूजा अर्चना केली जाते. सकाळी हळद-कुंकू वाहून संध्याकाळी नैवेद्य दाखवला जातो आणि विविध अलंकार वेशभूषा आणि माता महालक्ष्मीला सजवले जाते.
जेव्हा आपण माता महालक्ष्मीच्या वताचे उद्यापन करतो तेव्हा गुरुवारच्या दिवशी घराच्या शेजारी ज्या काही सुवासिनी असतात त्यांना माता महालक्ष्मी यांचे समान रूप मानून आपण त्यांना घरी बोलवायचे आहे आणि त्यांना हळद-कुंकू व्हायचे आहे त्यांना हातामध्ये एक फळ द्यायचे आहे. फळांमध्ये तुम्ही एक केळी दिली तरी चालेल त्यानंतर त्यांची ओटी भरायची आहे आणि एक माता महालक्ष्मीची व्रताची पुस्तिका द्यायची आहे आणि काहीतरी गोड पदार्थ हातामध्ये द्यायचा आहे आणि त्यांचा नमस्कार करायचा आहे तसेच तुम्ही या दिवशी शक्य झाल्यास नवकन्या पूजन देखील करू शकता त्यानंतर दुसरा दिवशी आपल्याला आंघोळ केल्यानंतर माता महालक्ष्मीला हळद कुंकू व्हायचे आहे माता महालक्ष्मी व्रताचे पुस्तक वाचायचे आहे. आरती करायची आहे आणि मनापासून माता महालक्ष्मीला शरण जायचे आहे आणि नमन करायचे आहे आणि म्हणायचे आहे की जर माझी पूजा करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिलेली असेल तर मला क्षमा कर.
तुझ्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव आर्थिक संपत्ती नांदू दे. माता महालक्ष्मी तुझा आशिर्वाद नेहमी आमच्या सोबत राहू दे, अशी भावना मनात ठेवून प्रार्थना करायची आहे आणि आपण जी काही पूजा मांडलेली आहे ती पूजा आता आपल्याला उचलायची आहे. ही पूजा उचलल्यानंतर तुम्ही नारळ फोडून देखील घरामध्ये प्रसाद वाटू शकता किंवा काहीजण लाल कपड्यांमध्ये नारळाचे बांधून दरवाज्याजवळ अडकवतात त्याचबरोबर काही जण फळ वाटून खातात तसेच हळदीकुंकू चा वापर आपल्याला देवांच्या पूजा करण्यासाठी नाही तर स्वतः कपाळावर लावण्यासाठी करायचा आहे, त्याचबरोबर कळशातील पाणी आपल्याला तुळशीला वाहायचे आहे अशा प्रकारे तुम्ही गुरुवारी केलेल्या व्रताचे उद्यापन सहजरीत्या करू शकता.
Recent Comments