मार्गशीर्ष महिन्याच्या विशेष गुरूवाराला दिवसभरात म्हणा हा विशेष मंत्र, माता लक्ष्मी आपल्यावर होईल विशेष प्रसन्न

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा आणि उपवास करण्याचा नियम आहे. तसे तर देवीची पूजा शुक्रवारी केली जाते, परंतु मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. या दिवशी देवीच्या कृपेने धनवर्षाव होतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते. मार्गशीर्ष महिन्यात देवीचे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व दुःख दूर होतात.

याचसोबत जर आपण या महिन्याच्या गुरुवारी देवीची उपासना केली तर तुमच्या संपत्तीमध्ये खुप वाढ होईल. या उपासनेने आणि व्रताने रोजगार, संकट आणि धनाशी संबंधित प्रत्येक संकट दूर होते. तसेच सोबत आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचे आहे. ते मंत्र पुढीलप्रमाणे.

नमस्तेस्तू महामाये श्रीपिठे सूरपुजिते ।
शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तूते ॥१॥
नमस्ते गरूडारूढे कोलासूर भयंकरी ।
सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥२॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी ।
सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥३॥
सिद्धीबुद्धूीप्रदे देवी भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।
मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ४ ॥

आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी ।
योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ५ ॥
स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे ।
महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तूते ॥ ६ ॥

पद्मासनस्थिते देवी परब्रम्हस्वरूपिणी ।
परमेशि जगन्मातर्र महालक्ष्मी नमोस्तूते ॥७॥
श्वेतांबरधरे देवी नानालंकार भूषिते ।
जगत्स्थिते जगन्मार्त महालक्ष्मी नमोस्तूते ॥८॥

महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं यः पठेत् भक्तिमान्नरः ।
सर्वसिद्धीमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनं ।
द्विकालं यः पठेन्नित्यं धनधान्य समन्वितः ॥१०॥

त्रिकालं यः पठेन्नित्यं महाशत्रूविनाशनं ।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥

हा मंत्र आपण दिवसभरात कधीही म्हणू शकता. याचे पठन केल्याने जीवनात सूरु असलेली सर्व दुख आणि समस्या संपतील.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *