मार्गशीर्ष महिन्यात ही एक वस्तु आपल्या देवघरात ठेवा, अपूर्ण असलेल्या सर्व इच्छा होतील पूर्ण
नमस्कार. ॐ नमः शिवाय.
मार्गशीर्ष महिन्यात ही एक वस्तु आपल्या देवघरात ठेवा, घरात असलेली दरिद्रता, गरीबी आणि कटकट कायमची निघून जाईल. हे केल्याने जीवनात आनंदाचे आणि सुखाचे दिवस येतील. मार्गशीर्ष महीना हा माता लक्ष्मीचा आवडता महीना मानला जातो. या महिन्यात माता लक्ष्मीची व्रत- वैकल्य केले जातात. त्यामुळे जर आपण या महिन्यात व्रत आणि पूजा करत असतांना, आपल्या देवघरामध्ये जर ही एक वस्तु ठेवली तर माता लक्ष्मी आपल्यावर विशेष प्रसन्न होतील. ही वस्तु ठेवल्याने माता लक्ष्मी आपल्यावर विशेष प्रसन्न होतील आणि घरामध्ये असलेली गरीबी, दरिद्रता, वादविवाद आणि कटकट कायमची दूर जातील.
तर आपल्याला संपूर्ण महीनाभर देवघरामध्ये जी वस्तु ठेवायची आहे, ती म्हणजे नारळ. आपण हा नारळ मार्गशीर्ष महिन्यात कधीही घरी आणू शकता, ५ तारखेपासून हा महीना सुरुवात झाला आहे आणि जर आपण हे गुरुवारी आणले तर अतिउत्तम ठरेल. नारळ आणल्यानंतर तो नारळ हातात घेऊन देवघरासमोर बसायचे आहे आणि आपल्या मनात असलेली सर्व ईच्छा देवासमोर बसून त्यांना सांगायची आहे. तसेच घरात असलेली कटकट, गरीबी, दरिद्रता निघून जावी आणि त्याजागी सुख-समृद्धी, पैसा जीवनात यावे यांसाठी कामना करावी.
त्यानंतर हे नारळ देवघरात ठेवून द्यायचे आहे आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला संपूर्ण महीना य नारळाची पूजा करायची आहे आणि आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. जर आपल्या देवघरामध्ये नारळ ठेवायला जागा नसेल तर मंदिराच्या शेजारी एखादे पाट ठेवा आणि त्यावर एखादे स्वच्छ कापड अंथरुण त्यावर नारळ ठेवावे.
यानंतर जेव्हा मार्गशीर्ष महीना संपल्यावर हा नारळ आपल्याला फोडायचा आहे आणि त्यामधून जे पाणी निघेल, ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे आहे. यानंतर उरलेला नारळ घरामधील सर्व लोकांनी प्रसाद म्हणून खायचे आहे. तर असा हा अत्यंत साधा आणि सरळ उपाय एकदा आपण करून बघायलाच पाहिजे. याने आपल्या सर्व ईच्छा पूर्ण होतीलच सोबत खुप पैसा मिळेल.
Recent Comments