या कारणामुळे मंगळसूत्रात असतात दोन वाट्या, जाणून घ्या या मागील अध्यात्मिक शास्त्र!
हिंदू संस्कृतीमध्ये विवाह पद्धतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे, त्याचबरोबर एखादी महिला मुलगी जेव्हा लग्न करते तेव्हा तिच्या गळ्यामध्ये पती द्वारे मंगळसूत्र परिधान केले जाते. मंगळसूत्र हा हिंदू संस्कृतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा दागिना मानला गेलेला आहे आणि हा दागिना म्हणजे फक्त दागिने नाही तर यामागील एक अत्यंत महत्त्वाचे शास्त्र देखील आहे. हा दागिना म्हणजे पतीचे सहभागी आहे पतीच्या भवितव्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी परिधान केलेल्या एक दागिना मानला जातो आणि म्हणूनच मंगळसूत्र हे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. जेव्हा आपण एखाद्या मंगळसूत्र पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने काळ्या मणी असतात तसेच दोन सोन्याच्या वाटी असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये या मंगळसूत्राचा नेमका अर्थ काय असतो, या काळ्या म्हणींचा अर्थ काय असतो याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया मंगळसूत्रांमध्ये असणाऱ्या दोन वाट्या यांचा प्रामुख्याने अर्थ काय असतो..
तसे पाहायला गेले तर ज्योतिष शास्त्रामध्ये सोन्याला बृहस्पति चा कारक मानला गेलेला आहे. गुरु हे वैवाहिक जीवन स्थिर राहण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते तसेच मंगळसूत्र मध्ये जे मनी असतात ते शनीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच शनीला स्थिरतेचे प्रतिक देखील मानले जाते. अनेकदा शनि देवाच्या कृपेमुळे देखील वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता निर्माण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका असते आणि म्हणूनच एखादे वैवाहिक जोडपे त्याच्या आयुष्य स्थिरता निर्माण व्हायला हवी यासाठी शनि देवांची कृपा हमखास त्या व्यक्तीवर असायला हवी. लग्न संस्कृतीमध्ये मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले जाते. या विधी शिवाय लग्न अपूर्ण मानले जाते. अध्यात्मिक शास्त्र मध्ये देखील मंगळसूत्राचे एक वेगळेच महत्त्व आहे तसे पाहायला गेले तर मंगळसूत्रांमध्ये आपल्याला दोन वाटी व मनी पाहायला मिळतात. जेव्हा आपण वाटण बद्दल चर्चा करतो तेव्हा हे दोन वाटी म्हणजे साक्षात शिव आणि शक्ती यांचे प्रतीक मानले जाते, यातील एक वाटी शंकराची व दुसरी पार्वतीची समजली जाते.
मंगळसूत्रांमध्ये ज्या दोन वाटी असतात आणि त्या दोन वाटींना जोडणारी जी तार असते ती तार म्हणजेच आता मुलीला माहेरची कुलस्वामिनी विसरून आता सासरच्या कुलस्वामिनीची उपासना करायची आहे आणि सासरच्या मंडळी शी आपुलकीने वागायचे आहे असा संदेश देणारी ती तार असते आणि ही तार दोन्ही वाटींना म्हणजे सासर आणि माहेर यांना जोडणारी महत्त्वाची मानली जाते. मंगळसूत्रामध्ये असणाऱ्या दोन वाट्या या प्रत्येक ठिकाणी उत्तम देखील मानले जातात. एक वाटी कुंकूची असते तर दुसरी वाटी हळदीची असते. या दोन वाटी मधील एक वाटी मध्ये माहेरची म्हणजे त्यामध्ये हळद आणि सासरच्या वाटीमध्ये कुंकू टाकून कुलस्वामिनी ची पूजा केली जाते आणि त्यानंतरच मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र परिधान केले जाते. मंगळसूत्र हा दागिना प्रामुख्याने सौभाग्यवती असलेली महिलाच परिधान करते. लग्नाच्या पूर्वी मंगळसूत्र विधान केले जात नाही त्याचबरोबर मंगळसूत्र मध्ये जी हळदीची वाटी असते ती वाटी म्हणजे पतीचे प्रतीक असते.
जेव्हा पत्नीला एखादी जखम होते किंवा संसारामध्ये एखादी अड’चण येते तेव्हा त्या अड’चणीमध्ये पत्नीला नेहमी साथ देण्याचे प्रतिकात्मक सुचक म्हणून हळदीला मानले जाते, जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे जर आपण ला जखम झाली असेल किंवा काही लागले असेल तर अशावेळी हळद आपल्यासाठी औषधी ठरते त्याचप्रमाणे हळद आणि कुंकू हे पती आणि पत्नी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दर्शवणारे प्रतीक आहे. जर तुम्ही एखाद्या मंगळसूत्र व्यवस्थित पाहिले असेल तर त्याला दोन पदरी काळे मणी बांधणारी तार असते तसेच दोन वाटी आणि दोन वाट्यांना जोडणाऱ्या चार छोट्या छोट्या मन्या असतात. आता या मंगळसूत्रामधील दोन वाटी म्हणजे पती-पत्नी आणि दोन छोटी वाटीमध्ये माहेराने सासर आणि चार मनी असलेले मंगळसूत्र म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचे प्रतीक मानले जाते. या मध्ये दोन पदरी असलेले काळे मणी आपल्याला वाईट नजरेपासून मुक्तता देतात, म्हणजेच वाईट नजरेपासून आपले संरक्षण करतात अशा प्रकारे वेगवेगळ्या अर्थाने हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मंगळसूत्राचा अर्थ सांगण्यात आलेला आहे
Recent Comments