या काही राशींच्या मुलींचा सासरी असतो मोठा दबदबा गाजवतात हक्काने वर्चस्व !

नमस्कार मंडळी!

तुम्ही काही जणांना काही मुलींबद्दल असे बोलताना ऐकलेच असेल की, लग्नानंतर सासरच्या घरी या मुलीचा फारच दबदबा आहे किंवा ही सतत आपली मनमानी करत असते. खरंतर लग्नानंतर मुली आपल्या सासरी स्वतःच अस्तित्व स्वतःच्या जागा निर्माण करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतात. पण आम्ही ज्या राशींबद्दल सांगणार आहोत त्या राशींच्या मुली आपल्या सासरी स्वतःचा दबदबा किंवा स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात असे म्हणायला हरकत नाही. आता या राशी कोणत्या त्या पण जाणून घेऊया.

यामधील पहिले रास म्हणजे कन्या. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या मुली मोकळ्या स्वभावाच्या असतात. मोकळेपणाने बोलतात तसेच प्रत्येक काम स्वतःच्या इच्छेनुसार करतात. या राशीच्या मुली ज्या घरामध्ये लग्न करतात तिथे त्या राणीसारखे राज्य करतात आणि त्यांना त्यांच्या पतीची पूर्ण साथ मिळते. लग्नानंतर देखील या मुली आपली मते मोकळेपणाने मांडतात व कोणाच्या दबावाखाली न येता, न घाबरता राहतात. स्वतःच्या मतांवर ठाम असल्यामुळे या मुलींचा सासरी दबदबा निर्माण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पतीच्या हृदयाचा रस्ता पोटातून जातो असे म्हणतात. यामुळे या मुली सुद्धा उत्तम स्वयंपाक करतात व पतीच्या मनामध्ये स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण करतात.

यानंतरची दबदबा निर्माण करणारी रास म्हणजे वृश्चिक रास. या राशीच्या मुली अतिशय चपळ आणि चालाक असतात. आपले मत दुसऱ्यांना पटवून देण्यामध्ये या पटाईत असतात. काही करायचं ठरवले तर या मुली मागे वळून पाहत नाहीत, ते काम पूर्णच करतात. लग्नानंतर ही या मुली स्वतःच्या इच्छेप्रमाणेच जगत असतात साम, दाम, दंड, भेद हे सर्व वापरून या मुली आपले म्हणणे खरं करीत असतात. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच या राशीच्या मुली स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. यानंतरची तिसरी रास म्हणजे धनु.

या राशीच्या मुली इतर राशींपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. या मुली आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि आपुलकीने सर्वांची मने जिंकतात. या मुलींना कोणत्याही कामात निष्काळजीपणा आवडत नाही. त्यांना सर्व क्षेत्राबाबत माहिती असते, त्या कुठेहि गेल्या तरी सर्वांना एकत्र ठेवतात. त्यामुळेच या मुलींना सासरच्या घरात भरपूर मानसन्मान मिळतो. आणि आपोआपच सासरच्या घरी यांचा धबधबा निर्माण होतो. तर मंडळी या राशींपैकी तुमच्या घरी कोणत्या राशीची मुलगी आहे हे नक्की कळवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *