या चार राशीसाठी वर्ष 2023 ठरणार आहे भाग्यवान… लवकरच नशीब चमकणार !
मित्रांनो काही दिवसांमध्येच दोन हजार बावीस वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2023 सुरू होणार आहे. प्रत्येकाला नवीन वर्षापासून काही ना काही अशा अपेक्षा व इच्छा आहे. नवीन वर्ष आपले समृद्धी आणि भरभराटीचे जावो असा प्रत्येकाचा मानस आहे आणि म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. आपल्याकडे वैदिक ज्योतिषशास्त्र खूपच प्रचलित आहे. या वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये भविष्यात घडणाऱ्या ज्या काही घटना असतात त्यांच्याबद्दल सांगितले गेलेले आहे. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे भाग्य पुढील वर्षांमध्ये चमकणार आहे. आत्तापर्यंत या व्यक्तींच्या राशींमध्ये खूप सारे संकट अड’चणी आलेल्या होत्या परंतु आता येणारे दिवस हे सुखाचे राहणार आहे. यांच्या जीवनामध्ये बदल होणार आहे आणि म्हणूनच नवीन वर्ष 2023 या काही राशींसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, चला तर मग जाणून घेऊया या नेमक्या कोणत्या राशी आहेत त्याबद्दल…
आपल्या सर्वांना माहिती आहे की,ज्योतिष शास्त्रांमध्ये दोन ग्रह आहेत ते म्हणजे राहू आणि केतू. हे नेहमी वक्र चलनाने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतात. हे दोन्ही ग्रह व्यक्तीच्या राशीमध्ये दीड वर्ष तर हमखास राहतात. हे दोन्ही ग्रह जर चांगल्या म्हणजेच शुभ ठिकाणी असतील तर व्यक्तीला भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळतो तसे पाहायला गेले तर हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सप्तस्थानामध्ये वास करत असतात. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, राहू आणि केतू हे क्रूर आणि मायावी ग्रह मानले जातात. पुढील वर्षांमध्ये राहू-केतू गोचरमध्ये येणार आहे आणि म्हणूनच याचा काही फायदा होणार आहे यातील पहिली राशी आहे मिथुन. ज्या व्यक्तींची राशी मिथुन आहे अशा व्यक्तींना भविष्यात खूप सारे फायदे होणार आहेत. तुमचे आर्थिक स्थिती अगदी मजबूत राहणार आहे. भविष्यात तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. पुढील वर्ष हे तुमच्यासाठी अगदी चांगले जाणार आहे तसेच तुम्हाला नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी प्राप्त होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
फक्त तुम्हाला कामावर व्यवस्थित रित्या लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर समाजातील अनेक चांगल्या कार्यामध्ये तुमचा सहवास असेल. तुम्हाला प्रवासामध्ये भरपूर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे परंतु ते धनाचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध होत असल्याने पैसा हा येत जात राहील, त्यानंतरची राशी आहे कर्क राशि. ज्या व्यक्तींची राशी कर्क राशी आहे, यांना राहूची वक्री हे शुभ ठरणार आहे. या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या घटना घडणार आहेत. भविष्यात तुम्हाला अचानक झालेला होण्याची शक्यता जास्त आहे. कामाच्या ठिकाणी एकंदरीत जास्त काम वाढल्याने प्रेशर देखील तुमच्यावर निर्माण होणार आहे व त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार चालत असल्याने तुमचा गोंधळ देखील भविष्यात होणार आहे. कमाई चे वेगवेगळे मार्ग तुम्हाला उपलब्ध होत असल्याने भविष्यात आर्थिक अड’चण तुम्हाला निर्माण होणार नाही तसेच तुम्हाला मित्र आणि कुटुंबियातील सदस्यांची मदत होणार आहे आणि एकंदरीत वातावरण हे चांगले राहणार आहे.
कौटुंबिक पातळीवर तुम्हाला काही अड’चणी निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु या अड’चणीवर तुम्ही सहजरीत्या मात करू शकता. फक्त तुम्हाला शांत राहायचे आहे आणि संयम दाखवायचा आहे, असे केल्याने कुटुंबीयांमध्ये होणारे वाद तुम्ही नष्ट करू शकता यानंतरची तिसरी राशी आहे वृश्चिक राशी. या राशीच्या व्यक्तींना होणारे राहूचे गोचर बाकी मात्र शुभकार्यात परिणामकारक ठरणार आहे. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करणार परंतु तुम्ही त्यांच्यावर हमखास मात करू शकाल. येणाऱ्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्ही नोकरीच्या ठिकाणी व कामाच्या ठिकाणी एक वेगळीच झलक दाखवणार आहे. तुमच्या कामाच्या शैलीमुळे तुमचे भाग्य चमकणार आहे आणि सगळीकडे तुमचे कौतुक देखील होईल. तुमचे नशीब तुम्हाला आता साथ देणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला तुमचे नशीब साथ तर देणार आहे पण त्याचबरोबर तुम्ही ज्या पदाची वाट पाहत होता, ते पद आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे. मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत चांगले संबंध निर्माण होणार आहे यानंतरची पुढील राशी आहे कुंभ राशी.
ज्या व्यक्तींची राशी कुंभ आहे अशा व्यक्तीला देखील राहूचे चलन शुभदायक ठरणार आहे. तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी अनेक चांगल्या बातम्या मिळणार आहे. तुम्ही जर व्यवसायामध्ये एखादी जोखीम घेणार आहात तरी जोखीम तुमच्यासाठी भविष्यात फायद्याची ठरणार आहे कारण की यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे. करिअर संबंधित तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त होणार आहे. जर भविष्यात तुम्ही प्रवास करणार असाल तर येणारे दिवस तुमच्यासाठी चांगले ठरणार आहे. मित्रांसोबत तुमचे नातेसंबंध चांगले राहणार आहे नातेवाईक देखील तुम्हाला मदत करणार आहे. भविष्यात अनेक चांगल्या घटना तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. फक्त ऐकू गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा आणि मगच कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवा अन्यथा नातेसंबंध दुरावतील बाकी गोष्टी मुळे तुमचे वर्ष हे हमखास चांगले जाणार आहे
Recent Comments