या तीन राशीच्या मुली असतात खूपच रागीट, जोडीदाराची एकदा जाणून घ्या माहिती!

नमस्कार!

मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला काही अशा मुलींशी भेटतो किंवा आपल्या मैत्रिणींपैकी काही मुली अशा असतात ज्या खूप रागीट स्वभावाच्या असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखीच हवी असते आणि जर का ते त्यांच्या मनासारखी झाले नाही तर ते पटवून घेत नाहीत. त्यांच्यापुढे कोणाचेही काहीही चालत नाही, त्या कोणाचच ऐकून घेत नाही. आणि आपल्या सर्वांचा स्वभाव हा आपल्या राशींवरून ठरत असतो. या, या मधली पहिली रास म्हणजे मेष. या राशीच्या मुली स्वभावाने अतिशय तापट आणि महत्त्वाकांक्षी तर असतातच तसेच कर्तबगार आणि लढवय्या वृत्तीच्या असतात. या मुली त्यांच्यासमोर आलेल्या संकटांना ठामपणे सामोरे जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे या मुली स्वतंत्र विचाराच्या असतात व त्यांच्या मतांवर ठाम असतात.

ठामपणे त्या स्वतःची मते मांडतात. याशिवाय मेष राशीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या राशीच्या मुली स्वतःवर झालेला अन्याय सहन करत नाहीत व दुसऱ्यांवर ही अन्याय होऊ देत नाहीत. जर त्यांच्यासमोर काही चुकीचे घडत असेल तर त्या आवाज उठवल्याशिवाय राहत नाहीत. आता यानंतरची पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या मुली, स्त्रिया या स्वभावाने कठोर असतात. या स्त्रिया कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या असतात, या अतिशय स्पष्टपणे बोलतात, या स्वाभिमानी तसेच निश्चयी असतात. सिंह राशीच्या स्त्रियांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याची यांना सवय असते परंतु दुसऱ्यांनी तिच्यावर गाजवलेला अधिकार तिला आवडत नाही.

यांचा हेतू शुद्ध असतो परंतु पद्धत रुक्ष असते, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला या जरा शिष्ट वाटू शकतात. या राशीच्या स्त्रिया फटकळ स्वभावाच्या असतात. या जे काही आहे ते तोंडावर बोलून टाकतात त्यामुळे समोरच्याला यांची धडके असते. या स्पष्ट पणाच्या नादात काय बोलून जातील याचा काही नेम नसतो. पुढची रास म्हणजे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या स्त्रियांचे व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीचे असते. या बोलायला फटकळ असतात आणि स्वभावाने अतिशय हट्टी असतात. त्यांना जे काही हवे आहे ते मिळवूनच राहतात. त्या हेकेखोर, तापट तसेच काहीशा भांडकुदळ असतात असे आपण म्हणू त्या. त्या जरी कष्टाळू असल्या तरी त्यांच्या मनाविरुद्ध गोष्ट झाली तर त्यांना ते आवडत नाही. आणि सिंह राशी प्रमाणेच त्यांच्यावर कोणी हक्क गाजवलेला त्यांना अजिबात आवडत नाही. तर मित्रांनो याच प्रमाणे तुमच्या मैत्रिणींपैकी असा स्वभाव असलेली कोणती मैत्रीण यापैकी कोणत्या राशीचे आहे हे नक्की कळवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *